विरुद्धार्थी शब्द मराठी virudharthi
shabd marathi opposite words शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका shishyavrutti Exam
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये virudharthi shabd marathi opposite words विरुद्धार्थी शब्द मराठी व्याकरण या घटकावर आधारीत प्रश्न विचारलेले असतात. या घटकावर विचारलेला प्रश्न सोडवण्यासाठी आपणास विरुद्धार्थी शब्द माहिती असायला हवेत. सरावासाठी आपणास कांही विरुद्धार्थी शब्द virudharthi shabd देत आहे त्याचे वाचन करावे.
अ) विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
आ) दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
इ) विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी निवडा.
ई) विरुद्धार्थी शब्द यांच्या जोड्या लावा.
उ) उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
ऊ) अधोरेखीत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
अशा प्रकारे एक किंवा अनेक प्रश्न विरुद्धार्थी शब्द या घटकावर विचारलेले असतात. आपणास या घटकाचे गुण मिळवायचे असतील तर अधिकाधिक शब्द वाचन करावे लागतील व विरुद्धार्थी शब्द या घटकावरील प्रश्नांचा सराव करावा लागेल.
विरुद्धार्थी शब्द (virudharthi shabd) .
- अथ x इति
अजर x जराग्रस्त
- अमर x मृत्य
- अधिक x उणे
- अलीकडे x पलीकडे
- अवघड x सोपे
- अंत x प्रारंभ
- अचल x चल
- अचूक x चुकीचे
- अडाणी x शिक्षित
- अटक x सुटका
- अतिवृष्टी x अनावृष्टि
- अती x अल्प
- अर्थ x अनर्थ
- अनुकूल x प्रतिकूल
- अभिमान x दुरभिमान
- अरुंद x रुंद
- अशक्य x शक्य
- अंधकार x प्रकाश
- अस्त x प्रारंभ
- अडचण x सोय
- अपेक्षित x अनपेक्षित
- अशक्त x सशक्त
- अर्धवट x पूर्ण
- अमूल्य x कवडीमोल
- असतो x नसतो
- अपेक्षाभंग x अपेक्षापूर्ती
- अंथरूण x पांघरूण
- अग्रज x अनुज
- अनाथ x सनाथ
- अतिवृष्ट x अनावृष्टि
- अधोगती x प्रगती, उन्नती
- अबोल x वाचाळ
- अब्रू x बेअब्रू
- अल्लड x पोक्त
- अवखळ x गंभीर
- अवजड x हलके
- आरंभ x शेवट
- आठवण x विस्मरण
- आशा x निराशा
- आता x नंतर
- आत x बाहेर
- आनंद x दु:ख
- आला x गेला
- आहे x नाही
- आळशी x उद्योगी
- आकर्षण x अनाकर्षण
- आकाश x पाताळ
- आतुरता x उदासीनता
- ओबडधोबड x गुळगुळीत
- आदर्श x अनादर्श
- आवडते x नावडते
- आवश्यक x अनावश्यक
- आज्ञा x अवज्ञा
- आधी x नंतर
- आघाडी x पिछाडी
- आजादी x गुलामी
- आशीर्वाद x शाप
- आस्था x अनास्था
- आदर x अनादर
- आडवे x उभे
- आयात x निर्यात
- आंधळा x डोळस
- ओला x सुका
- ओली x सुकी
- ओळख x अनोळख
- इकडे x तिकडे
- इथली x तिथली
- इष्ट x अनिष्ट
- इमानी x बेइमानी
- इच्छा x अनिच्छा
- इलाज x नाइलाज
- इहलोक x परलोक
- उघडे x बंद
- उच x नीच
- उजेड x काळोख
- उदासवाणा x
- उल्हासित
- उभे x आडवे
- उमेद x मरगळ
- उंच x बुटका
- उच्च x नीच
- उतरणे x चढणे
- उत्तम x क्षुद्र
- उत्कर्ष x अपकर्ष अधोगती
- उचित x अनुचित
- उदघाटन x समारोप
- उदास x प्रसन्न
- उदार x अनुदार
- उधार x रोख
- उधळ्या x कंजूष
- उपकार x अपकार
- उपदेश x बदसल्ला
- उपयोगी x निरुपयोगी
- उपाय x निरुपाय
- उलट x सुलट
- ऊन x सावली
- उगवणे x मावळणे
- उशिरा x लवकर
- उत्तेजन x विरोध
- उत्साह x निरुत्साह
- उद्धट x नम्र
- उदार x कंजूष
- उन्नती x अवनती
- एकदा x अनेकदा
- ऐटदार x केविलवाणा
- ऐच्छिक x अनैच्छिक, अपरिहार्य
- कर्कश x संजुळ
- कडक x नरम
- कळस x पाया
- कच्चा x पक्का
- कबूल x नाकबूल
- कडू x गोड
- कर्णमधुर x कर्णकटु
- कठीण x सोपे
- कल्याण x अकल्याण
- कष्टाळू x कामचोर
- कंटाळा x उत्साह
- काळा x पांढरा
- काळोख x प्रकाश, उजेड
- कायदेशीर x बेकायदेशीर
- कौतुक x निंदा
- क्रूर x दयाळू
- कोरडा x ओला
- कोवळा x जून, निबर
- किमान x कमाल
- कीव x राग
- कृतज्ञ x कृतघ्न
- कृत्रिम x नैसर्गिक, स्वाभाविक
- कृश x स्थूल
- कृपा x अवकृपा
- कीर्ती x अपकीर्ती
- खरे x खोटे
- खंडन x मंडन
- खात्री x शंकाखाली x वर
- खादाड x मिताहारी
- खुळा x शाहाणा
- खूप x कमी
- खरेदी x विक्री
- खोल x उथळ
- गरम x थंड
- गमन x आगमन
- गढूळ x स्वच्छ
- गंभीर x अवखळ, पोरकट
- गद्य x पद्य
- गाव x शहर
- गारवा x उष्मा
- ग्राहक x विक्रेता
- ग्रामीण x शहरी
- ग्राह्य x त्याज्य
- गुरु x शिष्य
- गुण x अवगुण
- गुप्त x उगड
- गुळगुळीत x खरखरीत, खडबडीत
- गुणी x अवगुणी
- गुणगान x निदा
- गोड x कडू
- गोरा x काळा
- गौण x मुख्य
- घट्ट x सैल
- घाऊक x किरकोळ
- जन्म x मृत्यू
- जवळची x लांबची
- जबाबदार x बेजबाबदार
- जागणे x झोपणे
- जागृत x निद्रिस्त
- झोपडी x महाल
- टंचाई x विपुलता
- टिकाऊ x ठिसूळ
- ठळक x पुसट
- डौलदार x बेढप
- शेवट x सुरवात
- ज्ञान x अज्ञान
- क्षमा x शिक्षा
- होकार x नकार
- हुशार x मठ्ठ
- हिशेबी x बेहिशेबी
- हित x अहित
- हिरमुसलेला x उत्साही
- हिंसक x अहिंसक
- हिम्मत x भय
- हार x जीत
- हसतमुख x रडततोंड
- हजर x गैरहजर
- हलके x जड
- हळू x जलद
- सौजन्य x उद्धटपणा
- सोय x गैरसोय
मार्गदर्श व्हिडिओ-
आपणास कांही विरुद्धार्थी शब्द माहिती असतीस तर मला खाली कमेंट करून कळवू शकता. पुढच्या पोस्टमध्ये त्यांचा समावेश करूया.
2 Comments
सर , इयत्ता आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका पुस्तकाचे PDF प्राप्त होईल का?
ReplyDeleteHo
Delete