Marathi Grammer vyaakaran कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण. क्रियापद Sabdancya jati- nam, sarvanam, visesan. Kriyapada Puppss 



Scholarship Exam Question Paper 
Sub विषय- मराठी Marathi
घटक - कार्यात्मक व्याकरण
उपघटक- शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण. क्रियापद
भारांश २० %
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) परीक्षेमध्ये 
कार्यात्म व्याकरण या घटकाला २०% भारांश देण्यात आलेला आहे. कार्यात्मक व्याकरण यामध्ये  १) शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण. क्रियापद, २) लिंग ३) वचन, ४) काळ ५) विरामचिन्हे ६) वाक्यांचे भाग ७) शुध्द/अशुध्द शब्द हे घटक येतात. आपण Marathi Grammer vyaakaran कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण. क्रियापद Sabdancya jati- nam, sarvanam, visesan. Kriyapada या विषयी माहिती घेणार आहोत.
शब्द- शब्द हा वाक्यातील महत्वपूर्ण घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. उदा- म + ग + र = मगर ,, र ही अक्षरे क्रमाने आली आहेत त्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आहे.

शब्दांच्या जाती-  शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार होय. वाक्यात जे शब्द येतात त्यांची वेगवेगळ्या प्रकारची कार्ये असतात त्यांच्या कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत त्याला शब्दांच्या जाती असे म्हणतात.

शब्दांच्या जाती - शब्दांच्या जातीचे मुख्य प्रकार अ) विकारी शब्द आ) अविकारी शब्द

अ) विकारी शब्द - वाक्यात उपयोगात येतांना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात – विकारी म्हणजे बदल घडणारे

अ) विकारी शब्दांच्या जाती  - 1)  नाम  2) सर्वनाम 3) विशेषण 4) क्रियापद

आ) अविकारी शब्द – वाक्यात उपयोगात येतांना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. थोडक्यात – अविकारी म्हणजे बदल न घडणारे

आ) अविकारी शब्दांच्या जाती  - 1) क्रियाविशेषण अव्यय 2) शब्दयोगी अव्यय 3) उभायन्वयी अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय

नाम - प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्या वस्तूच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला व्याकरणात नामअसे म्हणतात.

उदा- गोपाल, सिता, नदी, पर्वत, अमृत, स्वर्ग, धैर्य, कीर्ती, आनंद

सर्वनाम- नामाचा पुन्नरूच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

उदा ते, त्यांनी, त्यांना, तो ती ते त्या

विशेषण- नाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

उदा चांगला, हिरवा

क्रियापद- क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय.

अ) भारताने क्रिकेट मॅच जिंकली.

आ) गाय दूध देते.

क्रियाविशेषण अव्यय- क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

उदा – राधिका मोठ्याने बोलते

शब्दयोगी अव्यय- शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यये म्हणतात. शब्दयोगी अव्यये स्वतंत्र येत नाहीत. मुळची ही क्रियाविशेषणे असतात शब्दाला जोडून आल्यास शब्दयोगी अव्यये होतात.

उदा- पक्षी झाडावर बसला.

उभयान्वयी अव्यय- उभय म्हणजे दोन. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.

उदा- पहाट झाली आणि रस्त्यावर माणसे धावू लागली.

केवलप्रयोगी अव्यय- मनातील आनंदाच्या, दुखाच्या, आश्चर्याच्या तिरस्काराच्या इ. प्रकारच्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.

उदा- ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!

मार्गदर्शक व्हिडिओ- 


                    ------------------------------------------------------------------

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 

विषयः- मराठी 

घटक- कार्यात्मक व्याकरण

उपघटक- शब्दांच्या जाती

प्रश्न 25 गुण 50

----------------------------------------------------------------

प्रश्न १ ला – आमच्या शाळेत अनेक खेळाडू, गायक व लेखकही आहेत. या वाक्यात एकूण किती सामान्यनामे आली आहेत ?

१) तीन

२) चार

३) दोन

४) पाच

उत्तर- पर्याय क्रमांक २

प्रश्न २ रा – (प्रामाणिकपणा)हा कुत्र्याचा गुण आहे. कंसातील शब्दाचा नाम प्रकार ओळखा ?

१) विशेष नाम

२) सामान्य नाम

३) भाववाचक नाम

४) धातूसाधित नाम

उत्तर- पर्याय क्रमांक ३

प्रश्न ३ रा – (शहाण्याला) शब्दाचा मार. कंसातील शब्दाची जात कोणती ?

         १) विशेषण

         २) नाम

         ३) सार्वजनिक विशेषण

         ४) सर्वनाम

         उत्तर-  पर्याय क्रमांक २

प्रश्न ४ था –मीठामुळे जेवणाची रूची वाढते. दिलेल्या वाक्यात किती नामे आहेत ?

         १) चार

         २) तीन

         3) दोन

         4) एक

         उत्तर- पर्याय क्रमांक2

प्रश्न ५ वा –खालीलपैकी कोणते नाम ‘धर्मवाचक’ नाम आहे ?

         1) कृष्ण

         २) नदी

         ३) हिंदू

         ४) गुलामगिरी

         उत्तर- पर्याय क्रमांक 4

प्रश्न ६ वा  - (कोण) ही गर्दी! या वाक्यातील कंसातील शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता ?

         १) धातूसाधित सर्वनाम

         २) प्रश्नार्थक सर्वनाम

         ३) दर्शक सर्वनाम

         ४) सामान्य सर्वनाम

         उत्तर- पर्याय क्रमांक 4

प्रश्न ७ वा – त्याने (आपण) होऊन चूक कबूल केली. दिलेल्या वाक्यातील कंसातील सर्वनामाचा प्रकार कोणता?

         १) पुरूषवाचक सर्वनाम

         २) द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम

         ३) आत्मवाचक सर्वनाम

         ४) अनिश्चित सर्वनाम

         उत्तर- पर्याय क्रमांक 3

प्रश्न ८ वा –(ज्याने) करावे त्यानी भरावे. दिलेल्या वाक्यातील कंसातील शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.

         १) दर्शक सर्वनाम

         २) संबंधी सर्वनाम

         ३) आत्मवाचक सर्वनाम

         ४) पुरूषवाचक सर्वनाम

         उत्तर- पर्याय क्रमांक 2

प्रश्न ९ वा- पुढीलपैकी कोणत्या वाक्यात कंसातील शब्दाची जात सामान्य नाम आहे ?

         १) आता मी (काय) बोलावे  ?

         २)मी (काय) करणार आहे ते आता सांगणार नाही.

         ३)तुम्ही बाजारातून (काय) आणले?

         ४) तुला (काय) हवे ते सांगणार केव्हा?

         उत्तर- पर्याय क्रमांक 2

प्रश्न १० वा- पुढीलपैकी कोणते सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम व अनिश्चित सर्वनाम या दोन्ही प्रकारात वापरतात ?

         १) तू

         २) आम्ही

         ३) कोणी

         ४) मला

         उत्तर- पर्याय क्रमांक ३

प्रश्न ११ वा- पुढीलपैकी कोणते सर्वनाम ‘पुल्लिंगी’ व ‘स्त्रिलिंगी‘ दोन्हीसाठी वापरू शकतो ?

         १) तो

         २) त्याने

         ३) तू

         ४) तिला

         उत्तर- पर्याय क्रमांक ३

प्रश्न १२ वा- (माझे) पेन हरवले आहे. कंसातील विशेषणाचा प्रकार ओळखून पर्याय क्रमांक निवडा ?

         १) संख्या विशेषण

         २) धातुसाधित विशेषण

         ३) सार्वनामिक विशेषण

         ४) गुणविशेषण

         उत्तर- पर्याय क्रमांक 3

प्रश्न १३ वा- खालीलपैकी कोणते संख्याविशेषण नाही ?

         १)  थोडी मुले

         २) पाचपट रूपये

         ३) कोणता गाव

         ४) सहावे पुस्तक

         उत्तर- पर्याय क्रमांक ३

प्रश्न १४ वा- खालीलपैकी कोणत्या वाक्यात अधिविशेषण आले नाही ?

         १) फुले सुंदर आहेत.

         २) गौरीचे अक्षर छान आहे.

         ३) कडू काकडी कोणालाच आवडत नाही.

         ४) ग्रंथ मोठा होता.

         उत्तर- पर्याय क्रमांक ३

प्रश्न १५ वा- खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते ?

         1) काळा फळा

         २) पेटती काडी

         ३) दहा वह्या

         ४) सुंदर गुलाब

         उत्तर- पर्याय क्रमांक 2

प्रश्न १6 वा-  खालीलपैकी कोणते वाक्य प्रयोजक क्रियापदाचे आहे ?

         १) आईने मला जेवू घातले.

         २) आई जेवन करते.

         ३) आईला हे काम करता येते.

         ४) आई मुलाला चालविते.

         उत्तर- पर्याय क्रमांक 4

प्रश्न 17 वा- खालीलपैकी सहायक क्रियापद कोणते ?

         १) मारून ये.

         २) येऊन कर.

         ३) पळायला जा.

         ४) जाऊन खा.

उत्तर- पर्याय क्रमांक 3

प्रश्न १८ वा – शिवाय मजेत बाहेर पडला. या वाक्यात कोणते क्रियापद आले आहे?

         १) संयुक्त क्रियापद

         २) सहायक क्रियापद

         ३) सकर्मक क्रियापद

         ४) अकर्मक क्रियापद

उत्तर- पर्याय क्रमांक 4

प्रश्न १९ वा-पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

         १) उद्या

         २) जलद

         ३) नेहमी

         ४) भरपूर

उत्तर- पर्याय क्रमांक १

प्रश्न २० वा- खालील चार पर्यायातून संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययाचा पर्याय कोणता ?

         १) सालोसाल

         २)किंचित

         ३)इकडून

         ४) मागून

         उत्तर- पर्याय क्रमांक 2

प्रश्न २१ वा-‘तो झटकन उठला.’ या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता ?

         १) कालवाचक

         २) संथलवाचक

         ३) रीतीवाचक

         ४) संख्यावाचक

         उत्तर- पर्याय क्रमांक 3

प्रश्न २२ वा- खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते ?

         १)वारंवार     

२) पटपट

         ३)खाली

         ४) नेहमी

उत्तर- पर्याय क्रमांक ३

प्रश्न २३ वा- पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?

         १)तो जवळ येऊन बसला.

         २)ते पुस्तक समोरच होते.

         ३)पावसाळ्यापूर्वी पेरणीची कामे झाली.

         ४)त्याचा पतंग वर गेला.

         उत्तर- पर्याय क्रमांक 3

प्रश्न २४ वा- पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही ?

         १) त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.

         २) मृग निघाला आणि पाऊस सुरु झाला.

         ३) सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात आले.

         ४) एक तास म्हणजे साठ सेकंद.

         उत्तर- पर्याय क्रमांक 3

प्रश्न २५ वा- ‘वाहवा’ या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ?

         १)आश्चर्यकारक

         २)प्रशंसादर्शक

         ३) मौनदर्शक

         ४) हर्षदर्शक

उत्तर- पर्याय क्रमांक 2