उतारा व त्यावर आधारीत प्रश्न Utara va tyavara adharita prasna Puppss exam शिष्यवृत्ती परीक्षा
Scholarship Exam Question Paper
Sub विषय- मराठी Marathi
घटक - वाचून कल्पना व सकल्पना स्पष्ट करणे.
उपघटक- उतारा व त्यावर आधारीत प्रश्न
भारांश २४ %
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये वाचून सकल्पना स्पष्ट करणे घटकामध्ये उतारा व त्यावर आधारीत प्रश्न या घटकावर प्रश्न विचारलेले असतात. या घकासाठी २४ % इतका भारांश देण्यात आलेला आहे. आपणास एक उतारा दिला जातो. त्या उताऱ्याचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सांगितले जाते. हा घटक आपणास सहज गुण देणारा आहे. थोडा सराव केला की आपण सर्व गुण प्राप्त करू शकतो. आपणास दिलेला उतारा प्रथम वाचन करावा नंतर त्यावर विचारलेले प्रश्न वाचन करून प्रश्न सोडवावीत. एक उतारा व त्यावर आधारीत तीन प्रश्न विचारलेले असतात.
उतारा व त्यावरील प्रश्न सोडवताना - (प्रश्न कसा सोडवावा?)
१) प्रशम दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचन करावा.
२) उताऱ्यामध्ये दिलेले महत्वाचे मुद्दे, घटना, क्रम, मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी.
३) उतारा वाचन करताना उताऱ्यामध्ये असलेले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत.
४) विचारलेल्या प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
५) प्रत्येक प्रश्नाला अनुसरून दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत.
६) एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल तर तो प्रश्न व त्याचे पर्याय काळजीपूर्व वाचावेत व त्या प्रश्नाला अनुसरून उताऱ्यामध्ये आलेला घटक परत वाचन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा.
७) शेवटी अचूक उत्तराची निवड करावी.
नमूना प्रश्न (परीक्षेत प्रश्न कसा विचारतात?)
Scholarship Exam Question Paper Sub विषय- मराठी Marathi घटक - वाचून कल्पना व सकल्पना स्पष्ट करणे. उपघटक- उतारा व त्यावर आधारीत प्रश्न यावर खालील प्रमाणे एक उतारा दिला जातो व त्यावर तीन प्रश्न दिलेले असतात. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणासाठी म्हणजेच ३ प्रश्न ६ गुणासाठी असतात.
प्रश्न- प्रश्न १ ते ३ साठी सूचना- खालील उतारा काळजीपूर्व वाचा व त्यावर आधारीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
१. पारध्यांनी कोणती शपथ घेतली?
(1) सश्याला त्रास देणार नाही
(२) सतपुरूषांची क्षमा मागू.
(३) सश्याला जंगलात पाठवू
(४) यापुढे प्रण्यांची हत्या करणार नाही.
२. 'मित्र' या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उताऱ्यात आलेला आहे?
(१) वात्सल्य
(२) सवंगडी
(३) सुर्य
(४) सत्पुरूष
३. ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही?
(१) गवतपाला खातो.
(२) ओढ्याचे पाणी पितो.
(३) सर्वांना त्रास देतो.
(४) हसत बागडत असतो.
अशाप्रकारे उतारा व त्यावर आधारीत प्रश्न विचारले जातात. आपण वरील प्रमाणे उतारा वाचन करून वरील सूचनांचे पालन करून प्रश्न सोडवला तर आपणास सर्व गुण नक्की मिळतील. आपला एक ही प्रश्न चुकणार नाही. आशा करतो आपणास हा घटक समजला असेल. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा.
मार्गदर्शक व्हिडिओ-
Scholarship Exam Question Paper घटक - वाचून कल्पना व सकल्पना स्पष्ट करणे. उपघटक- उतारा व त्यावर आधारीत प्रश्न सराव प्रश्नपत्रिका-
1 Comments
Harshad
ReplyDelete