शिष्यवृत्ती परीक्षा घटक शब्दसंपत्तीवरील प्रश्न समानार्थी शब्द samanarthi shabd मराठी व्याकरण
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी /
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी
Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
मराठी व्याकरण समानार्थी शब्द samanarthi shabd -
आपण भाषेमध्ये बोलताना शब्दाचा वापर करत असतो. आपल्या शब्दांची रचना जितकी प्रभावी असते तेवढे बोलणे श्रवणीय होत असते. मराठी भाषेत पुष्कळदा एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो. त्यामुळे आपल्या शब्दसंपत्तीमध्ये भर पडते. अशा समानार्थी शब्दांचा स्वतंत्र संग्रह करून ठेवण्याची सवय शालेय वयात लावून घ्यायला हवी. यामुळे आपली शब्दसंपत्ती वाढून आपण भाषा प्रभुत्व साधू शकाल.
समानार्थी शब्द- एका शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरला जातो. अशा शब्दाला समानार्थी शब्द किंवा समान अर्थाचा शब्द असे म्हणतात.
- अनाथ = पोरका
- अनर्थ = संकट
- अपघात = दुर्घटना
- अपेक्षाभंग = हिरमोड
- अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
- अभिनंदन = गौरव
- अभिमान = गर्व
- अभिनेता = नट
- अरण्य = वन, जंगल, कानन,
विपिन
- अवघड = कठीण
- अवचित = एकदम
- अवर्षण = दुष्काळ
- अविरत = सतत, अखंड
- अडचण =समस्या
- अभ्यास = सराव, परिपाठ, व्यासंग
- अन्न = आहार, खाद्य
- अग्नी = आग, अनल, विस्तव, वन्ही, अंगार, पावक, हुताशन, शिखी
- अना = आणि
- अगणित = असंख्य, अमर्याद
- अचल = शांत, स्थिर
- अचंबा = आश्चर्य, नवल
- अतिथी = पाहुणा .
- अत्याचार = अन्याय
- अपराध = गुन्हा, दोष
- अपमान = मानभंग
- अपाय = इजा
- अही = साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी
- अश्रू = आसू
- अंबर = वस्त्र
- अंधार = काळोख, तिमीर, तम
- अमृत = पीयूष, सुधा
- अहंकार = गर्व
- अंक = आकडा
- आई = माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
- आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, अंतराळ, वियत, वितान
- आठवण = स्मरण, स्मृती, सय
- आठवडा = सप्ताह
- आनंद = हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
- आजारी = पीडित, रोगी
- आयुष्य = जीवन, हयात
- आतुरता = उत्सुकता
- आरोपी = गुन्हेगार, अपराधी
- आश्चर्य = नवल, अचंबा, विस्मय,
अचरथ, आचोज
- आसन = बैठक
- आदर = मान
- आवाज = ध्वनी, रव
- आवाजमां = आवाजात
- आज्ञा = आदेश, हुकूम
- आपुलकी = जवळीकता
- आपत्ती = संकट
- आरसा = दर्पण, मुकुर, आदर्श
- आरंभ = सुरवात
- आशा = इच्छा
- आस = मनीषा
- आसक्ती = लोभ
- आळशी = कुजर, निरुद्योगी, आळसट
- आशीर्वाद = शुभचिंतन
- ओंजळभर =अंजूरभर
- ओझे = वजन, भार
- ओढा = झरा, नाला
- ओळख = परिचय
- औक्षण = ओवाळणे
- अंत = शेवट
- अंग = शरीर
- अंघोळ = स्नान
- अंधार = काळोख, तिमिर
- अंगण = आवार
- अंगार = निखारा
- अंतरिक्ष = अवकाश
- इलाज = उपाय
- इशारा = सूचना
- इंद्र = सुरेंद्र, नाकेश, वसाव,
सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
- इहलोक = मृत्युलोक
- ईर्षा = चुरस
- इच्छा = आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा,
अपेक्षा
- ईश्वर = देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर,
विभूध, अलख, प्रभू,
त्रिदश
- उत्सव = समारंभ, सण, सोहळा
- ॠण = कर्ज
- ऋषी = तपस्वी, मुनी,
साधू, तापस
- कथा = गोष्ट, कहाणी,
हकिकत
- कमळ = पंकज, अंबुज,
नलिनी, अळत, पद्म,
सरोज, अंभोज, अरविंद,
राजीव, अब्ज
- कपाळ = ललाट, भाल,
कपोल, निढळ, अलिक
- काठ = किनारा, तीर,
तट
- काळ = समय, वेळ,
अवधी
- कावळा = काक, एकाक्ष, वायस
- कासव = कूर्म, कामट,
कमठ, कच्छप, कच्छ
- कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण,
हुशार
- कारागृह = कैदखाना, तुरुंग
- कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
- कोळिष्टक = जळमट
- खल = नीच, दुष्ट,
दुर्जन
- खग = पक्षी, विहंग,
व्दिज, अंडज, शकुन्त
- ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
- गरुड = खगेंद्र, खगेश्वर,
तार्क्ष्य, वैनतेय
- गणपती = लंम्बोदर, गजानन, हेरंब,
लक्षप्रद, निधी, धरणीधर, वक्रतुंड
- घर = सदन, गृह,
निकेतन, आलय, भवन, निवास,
धाम,
- घोडा = अश्व, हय,
वारू, तुरंग, वाजी
- चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
, सुधाकर, निशानाथ, हिमांशू, शशांक,
नक्षत्रेष, विधू, सोम
- चांदणे = कौमुदी, चंद्रप्रकाश, चंद्रिका,
ज्योत्स्ना
- जमीन = भूमी, धरती,
भुई
- जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
- झाड = वृक्ष, तरू,
पादप, द्रूप, गुल्म,
अगम, विटप, शाखी
- डोळा = नेत्र, नयन,
लोचन, चक्षु, अक्ष,
आवळू, अंबक
- ढग = मेघ, जलद,
पयोधर, अभ्र, अंबूद,
निरद, पयोद, अब्द,
घन
- तोंड = तुंड, वक्र,
आनन, वदन, मुख
- देह = तनु, तन,
काया, वपू, शरीर
- नदी = सरिता, तटिनी,
तरंगिणी, जलवाहिनी
- नवरा = भ्रतार, वल्लभ,
पती, कांत, नाथ,
दादला, धव, अम्बुला, कवेश
- पर्वत = डोंगर, गिरी, अचल,
शैल, अद्री
- पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी,
अर्धागी, भार्या, कांता, दारा,
जाया, सहधर्मचारिणी
- पाणी = जल, नीर, तोय, उदक,
जीवन, सलिल, पय,
अंबू, अंभ, वारी
- पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी,
प्रश्न १ ला - ‘वनिता’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
१) स्वामिनी
२) कामिनी
३) मानिनी
४) यामिनी
प्रश्न २ रा – खालील पर्यायातील ‘नृप’ या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
१) नरेश
२) भूपाळ
३) महिपती
४) महेश
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न ३ रा – खालील वाक्यातील अधोरेखीत
शब्दाला समानार्थी शब्द पर्यायतून शोधा. मालकाने नोकरावर भरवसा
ठेवून आज दिवसभर दुकानाचा कारभार त्याच्यावर सोपविला.
१)
कवडसा २) विश्वास
३)
मनसुबा ४) लालसा
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न ४ था – पुढील पर्यायातील ‘हरिण’ या शब्दासाठी असलेले दोन पर्याय कोणते?
१) कुंजर
२)
कुरंग
३)
सारंग
४)
गज
उत्तर- पर्याय क्रमांक 2 व 3
प्रश्न ५ वा – 'हात’ या
शब्दासाठी पुढीलपैकी कोणते दोन पर्याय समानार्थी आहेत?
१) पाणि
२)
व्रण
३)
दिनकर
४)
कर
उत्तर- पर्याय क्रमांक 1 व 4
प्रश्न ६ वा
- खालील पर्यायातील ‘अगाध’ या
शब्दासाठी समानार्थी असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा .
१)
ज्येष्ठ
२)
श्रेष्ठ
३)
अमर्याद
४)
अवेळी
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न ७ वा – ‘अद्री’ या
शब्दासाठी समानअर्थाचा शब्द पर्यायातून
निवडा.
१)
पृथ्वी
२)
गिरीधर
३)
शहर
४)
पर्वत
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न ८ वा – खालील पर्यायातील गटात
न बसणारे पद ओळखा.
१)
पत्र
२)
पल्लव
३)
पल्लवी
४)
पर्ण
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न ९ वा- खालीलपैकी विसंगत जोडी
ओळखा.
१)
शैली - छटा
२)
नौबत – डंका
३)
खुबी – खुमारी
४)
रोकडा – रोख
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न १० वा- वेगळ्या अर्थाचा शब्द
ओळखा.
१)
अभिवादन
२)
प्रणिपात
३)
वंदन
४)
संबोधन
उत्तर- पर्याय क्रमांक 4
मार्गदर्शक व्हिडिओ
0 Comments