Pages

Scholarship Exam Std 8th Syllabus Subject Marathi शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी स्कॉलरशिप परीक्षा

 Scholarship Exam Std 8th Syllabus Subject Marathi शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी स्कॉलरशिप परीक्षा  


कोणत्याही स्पर्धा परीक्षासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसे आहे? कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात? अभ्यासक्रम कसा आहे? प्रश्नपत्रिका स्वरूप कसे असते ? घटक उपघटक व त्यांना असलेला भारांश याविषयी माहिती असणे आवश्यक असते. आपणास जर यश संपादन करावयाचे असेल तर योग्य नियोजन व आभ्यासक्रम या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. आपण Scholarship Exam Std 8th शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी ची तयार करणार असाल अथवा करत असाल तर प्रथम Scholarship Exam Std 8th शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ८ वी चा आभ्यासक्रम माहिती करून घेणार आहोत. प्रथम शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती घेऊया.

Scholarship Exam 8 th शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप- 

                                                                    इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन पेपर असतात. पेपर पहिला व पेपर दूसरा. पेपर एक मध्ये प्रथम भाषा व गणित विषय असतो तर पेपर दोन मध्ये तृतीय भाषा (इंग्रजी) व बुध्दि्मत्ता विषयाचा समावेश होतो. पेपर एक मध्ये भाषा विषय म्हणजेच मराठी विषयावर आधारीत प्रश्न विचारलेले असतात. भाषा विषयाचे २५ प्रश्न ५० गुणासाठी असतात. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)
Scholarship Exam 8 th शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असते.

Scholarship Exam 8 th शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम - 

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मराठी विषयावर आधारीत खालिल घटक व उपघटक यावर प्रश्न विचारले जातात. घटक उपघटक व भारांश खालिलप्रमाणे.
१) आकलन- १) उतारा व त्यावर आधारीत प्रश्न २) कविता व त्यावर आधारीत प्रश्न ३) सुसंगत वाक्याचा परिच्छेद ४) संवाद व त्यावर आधारीत प्रश्न भारांश २४ % 

2) शब्दसंपत्ती - १) समानार्थी शब्द २) विरूध्दार्थी शब्द ३) शुध्द-अशुध्द शब्द ४) अलंकारीक शब्द ५) शब्द समुहाबद्दल एक शब्द ६) वाक्यप्रचार ७) म्हणी ८) पारिभाषिक शब्द भारांश २४%

३) कार्यात्मक व्याकरण -१) वर्ण विचार २) संधी- स्वर संधी , व्याजन संधी , विसर्ग संधी , पूर्वरूप संधी, पररूप संधी , ३) शब्दांच्या जाती - विकारी अविकारी शब्द ४) लिंग ५) वचन ६) विभक्ती, कारक अर्थ व शब्दाचे सामान्य रूप  ७) प्रयोग - सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग  कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग व त्याचे प्रकार ८) वाक्याचे प्रकार - केवल वाक्य, मिश्र वाक्य संयुक्त वाक्य ९) विरामचिन्हे १०) काळ व काळाचे प्रकार व क्रियापदाचे अर्थ ११) समास - अव्ययीभाव, तत्पुरूष , द्वद्व, बहूव्रीही समास १२) अलंकार- यमक अलंकार, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार १३) वृत्ते- मालिनी वृत्त, वसंततिलका वृत्त, भुजंगप्रयात वृत्त भारांश ४४%

४) इयत्ता १ ली ते ८ वी मराठी विषयाशी संबंधित सामान्यज्ञान- सामान्यज्ञान -साहित्य व साहित्य प्रकार लेखक कवी व त्याची टोपन नावे. भारांश ०८%
वरील घटक व उपघक यावर आधारीत भारांशानुसार शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आपणास कोणता घटक उपघटक सोपा व कठिण वाटतो ते मला कमेंट करून आवश्य कळवा.





Post a Comment

2 Comments