Pages

Marathi Vakyaprachar मराठी वाक्यप्रचार अर्थासहित महत्वाचे मराठी वाक्प्रचार

 Marathi Vakyaprachar  मराठी वाक्यप्रचार अर्थासहित महत्वाचे मराठी वाक्प्रचार 


आपण सतत वाक्यप्रचार,मराठी वाक्यप्रचार,marathi vakyaprachar,vakyaprachar,Marathi Vakyaprachar  मराठी वाक्यप्रचार अर्थासहित महत्वाचे मराठी वाक्प्रचार याविषयी शोधत असता आपण कांही महत्वाचे वाक्यप्रचार व त्यावर विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न अभ्यासणार आहोत.
                वाक्यप्रचार हा असा शब्द समुह आहे की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. वाक्यप्रचाराच्या वापरामुळे भाषा परिणामकारक होते, भाषेला सौदर्य प्राप्त होते.

  • संकटाला आमंत्रण देणे- संकट येईल अशी स्थिती निर्माण होणे..
  • पोटापलीकडे पाहणे-  सांस्कृतीक गरजा लक्षात घेणे.
  • पाठीवर शाबासकी देणे- प्रोत्साहन देणे.
  • कंबर कसणे- जिद्दीने सिद्ध होणे.
  • शब्दांकित करणे- शब्दात व्यक्त करणे.
  • फळ मिळणे- हेतू पूर्ण होणे.
  • येरझारा घालणे- अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घालणे
  • हरी हरी करणे- झालेल्या नुकसानीबद्दल पुन्हा पुन्हा खंत व्यक्त करणे.
  • शून्यातून विश्व उभारणे- प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे.
  • मोहरून जाणे- मोहून जाणे, आकर्षिले जाणे.
  • कानावर येणे- कोणाकडून तरी कळणे.
  • कानात प्रण आणून ऐकणे- अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे.
  • बांध घालणे- मज्जाव करणे.
  • खोडी काढणे- कुरापत काढणे, मस्करी करणे.
  • गट्टी जमणे- मैत्री जमणे.
  • तोंड वासून पडणे- अत्यंत निराशेने चेहरा निश्चल ठेवून पडून राहणे.
  • कांहीतरी करून दाखवणे- चाकोरीबाहेरील एखादे नवीन कृत्य असे काम करणे.
  • आकांताने प्रयत्न करणे- जिवाची पर्वा न करता प्रयत्न करणे.
  • असाध्य असणे- मिळत नसणे, न लाभणे.
  • उणे नसणे- कमतरता नसणे.
  • दुःख वारणे- दुःख दूर करणे.
  • तहानभूक विसरणे- एखाद्या विषयात पूर्ण गढून जाणे.
  • आपल्या मागे ठेवून जाणे- मृत्यूनंतर शिल्लक राहणे.
  • भ्रमण करणे- सर्वत्र फिरणे.
  • डोळ्याखालून घालणे- स्वतः तपासून पाहणे.
  • समर्पित करणे- अर्पण करणे.
  • चाहूल लागणे- सुगावा लागणे,कोणीतरी येत, असल्याचे जाणवणे
  • अठराविश्वे दारिद्र्य असणे- आत्यांतिक दारिद्र्य असणे.
  • खाईत पडणे- चितेवर पडणे, मृत्यूसारखी परिस्थिती निर्माण होणे.
  • मनावर मळभ पसरणे- मन चिंतेने, निराशेने दुःखाने व्यापणे.
  • उकल होणे- कोडे सुटणे, समजणे.
  • आरोळी मारणे- मोठ्याने हाक मारणे.
  • पोट भरणे- अन्न खाणे.
  • आळा तुटणे- जीवन विस्कटणे
  • हातावर हात ठेवून बसणे- काम असताना कोणतेही काम न करणे.
  • पांग फेडणे- उपकार फेडणे, उतराई होणे.
  • मनात काहूर उठणे – मनात विचारांचे, वादळ येणे.
  • गहिवरून येणे – कंठ दाटून येणे.
  • मती कुंठित होणे – विचार प्रक्रिया थांबणे.
  • तरतरी पेरणे – उत्साह निर्माण करणे.
  • तांबडं फुटणेः-पहाट होणे.
  • थंडीने अंग काकडणेः- थंडीने अंग गारठणे.
  • दिवस माथ्यावर येणेः- टळटळीत दुपार होणे.
  • हबकून जाणेः- घाबरणे.
  • मनात उलघाल होणेः- मनाची चलबीचल होणे, अस्वस्थ होणे.
  • वाटेला लागणेः- मार्गाने जाणे.
  • खुटून बसणेः- रूसून बसणे.
  • नजर खिळणेः-नजर एका जागी स्थिर होणे.
  • उलघडा न होणेः- न समजणे.
  • हातभार लावणेः- मदत करणे.
  • गाडी रूळावर येणेः-पूर्ण व्यवस्थित होणे.
  • माघारी फिरणेः- परत फिरणे.
  • मानेला झटका देणेः- नाराजी व्यक्त करणे.
  • साद घालणेः- हाक मारणे.
  • नजर लावणेः- एकटक पाहणे.
  • साथ देणेः-सोबत असणे.
  • आबाळ होणेः- नीट देखभाल न होणे.
  • स्तुती करणेः- प्रशंसा करणे, कौतुक करणे.
  • मान फिरवणेः- नाराजी व्यक्त करणे.
  • तोंड उघडणेः- बोलायला सुरवात करणे.
  • उभारी येणेः- उत्साह वाटणे, उमेद येणे.
  • आडवे येणेः- बंधन घालणे, नकार देणे.
  • आनंदाला पारावर न राहणेः- खूप आनंद होणे.
  • डोळे पाण्याने भरणेः- रडू येणे, रडवेले होणे.
  • विराजमान होणेः- आसणावर ऐटीत बसणे, स्थानापन्न होणे.
  • मान डोलावणेः- संमती देणे, होकार देणे.
  • प्रसार करणेः- सर्वांना माहिती देणे, प्रचार करणे.
  • खिशाला परवडणेः- खर्च करण्याची ऐपत असणे.
  • आभार मानणेः- धन्यवाद देणे.
  • खलबते चालणेः- दीर्घकाळ चर्चा होणे, मसलत होणे.
  • डावपेच आखणेः- आराखडा तयार करणे.
  • लढा देणेः- संघर्ष करणे, झुंज देणे, संग्राम करणे.
  • मनोमन ठरवणेः- स्वतःच्या मनाशी पक्के करणे.
  • मन वळवणेः- एखाद्या गोष्टीसाठी मन तयार करणे.
  • पर्वणी वाटणेः- भरपूर आनंददायी मनःस्थिती असणे.
  • अनुमती दर्शवणेः- परवानगी असणे.
  • टक्कर देणेः- सामना करणे, तोंड देणे.
  • सल्ला देणेः- मार्गदर्शन करणे, उपदेश देणे.
  • दाखल होणेः- प्रवेश घेणे.
मार्गदर्शक व्हिडिओ  - 

 

नमुना प्रश्न 

पुढील आकृतीत लपलेली म्हण ओळखून त्या म्हणीतील आठवे अक्षर ओळखा ?

१) ली

२) ला

३) व

४) टा

प्रश्न ला - ‘विडा उचलणेया वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा ?

१)  प्रारंभ करणे

२) शक्ती दाखवणे

३) प्रतिज्ञा करणे

४) पान खाणे

प्रश्न रा- पुष्कळ द्रव्य मिळवणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता?

               १) आकाश ठेंगणे होणे

               २) उखळ पांढरे होणे

               ३) मोक्ष मिळणे

               ४) परिधान करणे

प्रश्न रा- खालीलपैकी वाक्प्रचार अर्थ यांची चुकीची जोडी ओळखा.

               १) मुसंडी मारणेधडक मारणे

               २) वठणीला आणणे- ताळ्यावर आणणे

               ३) आटापिटा करणे- खूप प्रयत्न करणे

               ४) आडाखे बांधणे- तंतोतंत जुळणे

प्रश्न था- पारा चढणे’  या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायांतून निवडा.

               १) घर डोक्यावर घेणे

               २) तोंडसुख देणे

               ३) पहारा देणे

               ४) रुद्रावतार धारण करणे

प्रश्न वा- खालीलपैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

               १) खडे चारणे

               २) पाणी पाजणे

               ३) धूळ चारणे

               ४) कणीक तिंबणे

प्रश्न वा- खणखणीत आवाजाच्या भाषणाने मी सभा-----

               १) उथळून लावली

               २) बेचैन केली

               ३) दणाणून टाकली

               ४) हवावदिल केली

प्रश्न वा- पोबारा करणेया वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायांतून निवडा.

               १) नाश करणे

               २) मर्दुमकी गाजवणे

               ३) कानाडोळा करमे

               ४) धूम ठोकणे

प्रश्न वा- परावृत्त होणेया वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायांतून निवडा.

               १) पलायन करणे

               २) उपरती होणे

               ३) परमार्थ साधणे

               ४) उपकार स्मरणे

प्रश्न वा- सव्यापसव्य करणेया वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून निवडा.

               १) सतत त्रास देणे

               २) यातायात करणे

               ३) उसने अवसान आणणे

               ४) अतिशय काळजी घेणे

प्रश्न १० वा- पाय रोवणेहा वाक्प्रचार खालीलपैकी कोणत्या वाक्यासाठी अधिक योग्य होईल ?

               १) पाऊस पडल्यामुळे राघवचा----

               २) बागेत खेळणाऱ्या रोहीतचा -----

               ३) महेशने पुण्यात हॉटेल व्यवसायात ----

               ४) जंगलातील लोखंडी सापळ्यात वाघाचा----

 

Post a Comment

1 Comments

  1. पोटा पलीकडे पाहने

    ReplyDelete