Scholarship exam Syllabus Subject mathematics शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय गणित स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी
स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी Scholarship Exam Syllabus Subject Maths
Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चार विषयावर प्रश्न विचारले जातात यासाठी दोन पेपर मध्ये हे विषय विभागलेले असतात पेपर १ व पेपर २ पेपर एक मध्ये प्रथम भाषा (मराठी) आणि गणित तर पेपर २ मध्ये तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी या विषयाचा समावेश असतो. दोन्ही पेपर मध्ये ७५ प्रश्न असतात व गुण १५० असतात.
प्रश्नांची काठिण्यपातळी -
Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चारही विषयासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारले जातात.
विषय गणित शिष्यवृत्ती अभ्यासक्रम (Scholarship exam Syllabus Subject mathematics) -
गणित mathematics विषयामध्ये एकूण ७ घटक आहेत. या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. हे सात घटक व त्यामधील उपघटक तसेच त्याचा भारांश खालिलप्रमाणे असतो. यानुसार कोणता घटक अधिक अभ्यासावा. कोणता घटक आपण सहज सोडवू शकतो याची आपणास कल्पना येईल. त्याप्रमाणे आपण नियोजन करून अभ्यास करावा.
१) संख्याज्ञान - A) आंतराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे B) दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन C) अंकाटी स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व विस्तारीत मांडणी D) मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे E) संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना G) १ ते १०० संख्यावर आधारीत प्रश्न H) सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या , संयुक्त संख्या , त्रिकोणी संख्या , चौरस संख्या भारांश १२ %
2) संख्याविरील क्रिया - अ) बेरीज (सात अंकी संख्यापर्यंत ) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे आ) वजाबाकी (सात अंकी संख्यापर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दीक उदाहरणे इ) गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत) ई) भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्यापर्यंत) उ) पदावली व अंकक्षरांचा उपयोग ऊ) संख्यांचे विभाजन (अवयव) विभाज्य ( एक ते १० पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या) भारांश २०%
3) अपूर्णांक - १) व्यवहारी अपूर्णांक - अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता -उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ब) अंशाधिक , छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक - परस्पर रूपांतर क) समतूल्य अपूर्णांक २) दशांश अपूर्णंक - अ) वाचन, लेखन ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग क) बेरीज वजाबाकी.
४) मापन/महत्त्वमापन - १) लांबी, वस्तुमान धारकता (दशमान परिमाण) - परस्पर रूपांतर बेरीज , वजाबाकी, व शाब्दिक उदाहरणे २) कालमापन ः घड्याळ (मध्यान्हपूर्व व माध्यान्होत्तर ) तास, मिनिटे, सेकंद - परस्पर रूपांतर, बेरीज वाजबाकी व शाब्दिक उदाहरणे. ३) दिनदर्शिका ४) कालमापन (रीम, दस्ता) ४) नाणी नोटा (रुपये-पैसे) परस्पर रूपांतर मुलभूत क्रियावर आधारीत खरेदी विक्री संबंधित उदाहरणे.
५) व्यवहारीक गणित - नफा-तोटा, शेकडेवारी , सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारीत उदाहरणे)
६) भूमिती- १) कोन व कोनाचे प्रकार २) समांतर व लंब रेषा ३) त्रिकोण, चौरस , बाजू, शिरोबिंदू ४) वर्तूळ - त्रिज्या, व्यास, केंद्र, परिघ, आंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळकंस ५) परिमिती - त्रिकोण, आयात, चौरस, बहूभूजाकृती ६) क्षेत्रफळ- आयात चौरस ७) त्रिमिती वस्तू व घडणी ८) आकृतीबंंध ९) इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू , पृष्टे)
७) चित्रालेख - चित्ररूप माहितीचे आकलन
अशा प्रकारे शिष्यवृत्ती परीक्षा स्क़लरशिप परीक्षा Scholarship Exam 5 th Class मध्ये गणित विषयाचा अभ्यासक्रम देण्याच आलेला आहे. या वरील घटकावर दिलेल्या भारांशावर आधारीत Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी प्रश्नाचे स्वरूप हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारले जातात. आपणास कोणता घटक कठिण व कोणता घटक कठिण जातो ते मला कमेंट करून कळवा.
2 Comments
Premraj Raosaheb Londhe
ReplyDeleteRajvardhan phandu patil
ReplyDelete