जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test 


    जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test मध्ये एकच संयुक्त प्रश्नपत्रिका असते. जी १०० गुणासाठी असते. जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा पेपर Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test सोडविण्यासाठी २ तासाचा वेळ असतो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये JNV Selection Test दिल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकेत Question paper मध्ये एकुण तीन विभाग असतात.
अ) विभाग अः- 
                    नवोदय परीक्षेमध्ये विभाग अ मध्ये 'मानसिक क्षमता चाचणी' या विषयातर्गत ४० प्रश्न ५० गुणासाठी विचारलेले असतात. सर्व प्रश्नाचे स्वरूप हे आकृत्यांवरचे असते. यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासाठी वेगवेगळ्या स्वरूपातील सूचना दिलेल्या असतात.
ब) विभाग बः- 
                नवोदय परीक्षेमध्ये विभाग ब मध्ये 'अंकगणित' या विषयातर्गत २० प्रश्न २५ गुणासाठी विचारलेले असतात. सर्व प्रश्नाचे स्वरूप हे अंकगणितावरील क्षमता तपासण्यासाठीचे असते. यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा मुख्य उद्देश हा मुलांच्या गणितातील मूलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकर , भागाकार व संख्यावरील क्रिया तपासणे हा असतो.
क) विभाग कः- 
                    नवोदय परीक्षेमध्ये विभाग क मध्ये 'भाषा' या विषयातर्गत २० प्रश्न २५ गुणासाठी विचारलेले असतात. सर्व प्रश्नाचे स्वरूप हे भाषा विषयातील क्षमता तपासण्यासाठीचे असते. यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा मुख्य उद्देश हा मुलांच्या भाषा विषयातील मूलभूत क्षमता जसे वाचन, लेखन, आकलन, उपयोजन इ. तपासणे हा असतो. या मध्ये चार परिच्छेद दिलेले असतात. प्रत्येक परिच्छेदाखाली पाच-पाच प्रश्न दिलेले असतात. विद्यार्थांना परिच्छेदाचे वाचन आकलन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्यावयाची असतात. 
                आजच्या या भागात आपण विभाग तीन (क) मधील भाषा विषयातील उतारा व त्यावरील प्रश्न कसे सोडवायची व कांही नमूना उतारे पाहणार आहोत. साधारणपणे उतारा व त्यावर आधारीत प्रश्न सोडवत असताना खालिल गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

उतारा सोडवताना कोणती काळजी घ्यावी- 

            १) प्रशम दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचन करावा.
        २) उताऱ्यामध्ये दिलेले महत्वाचे मुद्दे, घटना, क्रम, मध्यवर्ती कल्पना समजून घ्यावी.
        ३) उतारा वाचन करताना उताऱ्यामध्ये असलेले महत्वाचे मुद्दे अधोरेखित करावेत.
        ४) विचारलेल्या प्रश्नांचे काळजीपूर्वक वाचन करावे.
        ५) प्रत्येक प्रश्नाला अनुसरून दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत.
        ६) एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसेल तर तो प्रश्न व त्याचे पर्याय काळजीपूर्व वाचावेत व त्या प्रश्नाला अनुसरून उताऱ्यामध्ये आलेला घटक परत वाचन करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. 
        ७) शेवटी अचूक उत्तराची निवड करावी. 

नमूना प्रश्न (परीक्षेत प्रश्न कसा विचारतात?)

नमूना प्रश्न-  सूचना: या खंडात चार उतारे आहेत. प्रत्येक उताऱ्यानंतर पाच प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरिता (A), (B), (C) आणि (D) अशी चार संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. यांपैकी केवळ एकच बरोबर आहे. बरोबर उत्तर शोधा आणि ओ. एम. आर. उत्तरपृष्ठामध्ये प्रश्नक्रमांकाशी संबंधित वर्तुळ काळे करा. उतारा ।
(सन २०२० परीक्षेतील प्रश्न )

प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. युरोपमध्ये एखादया तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल, तरच तो पूर्णतः शिक्षित मानला जातो. प्राचीन भारतात देखील आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागांत असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. भारतीयांमध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली.


प्र.1. जर एखाद्याला खरे शिक्षण हवे असेल तर ------- महत्त्वाचे आहे.

(A) अभ्यास करणे

(B) काम करणे

(C) प्रवास करणे

(E) ध्यान करणे

 

प्र.२.  खालीलपैकी कोणता शब्द 'मनोरंजक' या शब्दाचा समानार्थी आहे ?

(A) शैक्षणिक

(B) सनसनाटी

(C) दमवणारे

(D) दृश्यावलोकन

 

प्र.३. -------भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाई.

(A) शिक्षणसंस्थेला

(B) तीर्थस्थळाला

(C) शहराला

(D) व्यापाराला

 

प्र.४. लोकांनी जर --------- भरपूर केला, तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते.

(A) प्रवास

(B) वादविवाद

(C) खेळ

(D) प्रश्नोत्तर प्रकार

 

प्र.५. ऋषी म्हणजे---- माणूस होय.

(A) विद्वान

(B) चतुर

(C) मुक्त 

(D) धूर्त

             अगदी अशाच स्वरूपाचे प्रश्न विचारलेले असतात. आपणास फक्त उतारा काळजीपूर्वक वाचन करावा लागतो. उताऱ्याचे आकलन करावे लागते मग त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. आपण अधिक सराव करून हे सहज साध्य करू शकता. अधिक मार्गदर्शनासाठी खालील व्हिडिओ पहा.

मार्गदर्शक व्हिडिओ- 



सरावासाठी खालिल प्रश्नपत्रिका सोडवा. आपणास किती गुण मिळाले ते खाली कमेंट करून आवश्य कळवा.