Pages

Scholarship exam Syllabus Subject Marathi शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी ८ वी अभ्यासक्रम विषय मराठी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी

 Scholarship exam Syllabus Subject Marathi शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी अभ्यासक्रम विषय मराठी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी

कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना त्या परीक्षेचा अभ्यासक्रम syllabus आपणास माहिती असणे आवश्यक असते. अभ्यासक्रम माहिती इयत्ता पाचवी स्कॉलरशिप अभ्यासक्रम  असेल तर आपण त्या नुसार आपल्या आभ्यासाचे नियोजन करून आपण यश संपादन करू शकतो. अगदी याचप्रमाणे Scholarship exam Std 5th and 8th शिष्यवृत्ती परीक्षेचे देखील आहे. आपणास शिष्यवृत्ती परीक्षेत Scholarship Exam मध्ये यश मिळवायचे असेल तर त्या परीक्षेचे स्वरूप कसे असते, अभ्यासक्रम कसा असतो, किती विषय असतात, प्रत्येक विषयातील एकूण घटक किती असतात, उपघटक कोणते असतात, कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जातात. याविषयी माहिती असणे आवश्यक असते.

स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी Scholarship Exam Syllabus Subject 

   Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चार विषयावर प्रश्न विचारले जातात यासाठी दोन पेपर मध्ये हे विषय विभागलेले असतात पेपर १ व पेपर २ पेपर एक मध्ये प्रथम भाषा (मराठी) आणि गणित तर पेपर २ मध्ये तृतीय भाषा व बुध्दीमत्ता चाचणी या विषयाचा समावेश असतो. दोन्ही पेपर मध्ये ७५ प्रश्न असतात व गुण १५० असतात.


प्रश्नांची काठिण्यपातळी - 

            Scholarship Exam शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी साठी चारही विषयासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप हे सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारले जातात.

महत्वाचे - 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)  (इयत्ता ८ वी) साठीच्या पेपरमध्ये कमाल २० % प्रश्नाच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायापैकी २ दोन पर्याय अचूक असतील. हे दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असते

.

विषय मराठी इयत्ता ५ वी  subject Marathi ५th

१) वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे  उपघटक- A) उतारा व त्यावरील प्रश्न B) वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरील आधारीत प्रश्न C) कविता व त्यावर आधारीत प्रश्न (भारांश २४ %) 

2) कार्यात्मक व्याकरण - १) शब्दांच्या जाती- नाम, सर्वनाम, विशेषण. क्रियापद, २) लिंग ३) वचन, ४) काळ ५) विरामचिन्हे ६) वाक्यांचे भाग ७) शुध्द/अशुध्द शब्द (भारांश २०%)

3) भाषेचा व्यवहारात उपयोग -  १) वाक्प्रचार २) म्हणी ३) संवादावर आधारीत प्रश्न ४) निर्देश-  शब्दांचा वापर , सुसंगत वाक्याचा परीच्छेद, वाक्यातील चूक ओळखणे, सर्वोत्कष्ट विकल्प निवडणे  ५) माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शबंदांना पर्यायी मराठी शब्द शोधणे.

४) शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व-  १) समानार्थी शब्द २) विरूध्दार्थी शब्द ३) शब्दकोडी ४) जोडशब्द ५) आलंकारीक शब्द ६) शब्दसमूहाबद्दल एक शब्द ७) समूहदर्शक शब्द ८) पिलूदर्शक शब्द ९) घरदर्शक शब्द १०) अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे ११) वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे १२) एकाच शब्दाचे भिन्न  अर्थ शोधणे  १३) भाषा विषयक सामान्य ज्ञान

    अशाप्रकारे वरील घटकांवर आधारीत ७५ प्रश्न १५० गुणासाठी विचारले जातात. स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारले जातात. यासाठी आपणास भारांशावर आधारीत घटकावर अधिक लक्ष देऊन भरपूर सरावा करणे आपेक्षित असते. आापणास मराठी विषयातील कोणत्या घटक सोपा व कोणता घटक अवघड जातो ते मला खाली कमेंट करून कळवा. 

Post a Comment

3 Comments