वचन vachan Scholarship Exam std 5th शिष्यवृत्ती परीक्षा मराठी व्याकरण घटक वचन
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) परीक्षेमध्ये वचन या घटकावर एक प्रश्न विचारलेला असतो. अतिशय सोपा हा घटक आपणास सहज गुण देणारा आहे. फक्त थोडा सराव व प्रश्न कश्या प्रकारे विचारतात याविषयी आपणास माहिती झाली की आपण सहज या घटकावर आधारीत विचारलेल्या प्रश्नांचे गुण मिळवू शकता. चला या घटकाविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया.
----------------------------------------------
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका
विषयः- मराठी
घटक- कार्यात्मक व्याकरण
उपघटक- वचन
प्रश्न 20 गुण 40
-----------------------------------------
प्रश्न १ ला –पुढील शब्दाचे अनेकवचन कोणते येईळ त्याचे पर्यायी उत्तर शोधा ?
१) भोवरा
२) भोवऱ्या
३) भोवरे
४) भोवरी
उत्तर- पर्याय क्रमांक ३
प्रश्न २ रा- खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला पर्याय कोणता?
1) भाषा
२) दिशा
३) सभा
४) वेळ
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न २ रा- खालीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी असलेला पर्याय कोणता?
१) मैना
२) सुना
३) दाणा
४) कणा
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न ३ रा- ‘डोळे’ या अनेक वचनी शब्दाचा एकवचनी शब्द कोणता ?
१) डोळे
२) डोळी
३) डोळा
४) डोळ्या
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न ४ था- पुढील वाक्यातील कंसातील शब्दाचे अनेकवचन कोणते ?
शिंपल्यात सुंदर(मोती) तयार होतात.
१) मोते
२) मोती
३) मोत्या
४) मोतीया
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न ५ वा- पुढील पर्यायातील उभयवचनी शब्दाचा पर्याय कोणता ?
१) माळा
२) फळा
३) शाळा
४) वाळा
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न ६ वा- खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला पर्याय कोणता?
१) विळी
२) कळी
३) नळी
४) तळी
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न ७ वा- खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी असलेला पर्याय कोणता?
१) नाके
२) नखे
३) डोके
४) बाके
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न ८ वा- पुढील शब्दाचे वचन बदलून योग्य पर्याय शोधा. पोते
१) पात्या
२) पाती
३) पोते
४) पाते
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न ९ वा- दिलेल्या पर्यायातून वचनानुसार विसंगत शब्द ओळखा.
१) ओठ
२) माठ
३) काठ
४) गाठ
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न १० वा- पुढील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा.
१) केळे- एकवचन
२) खेडे – अनेकवचन
३) भांडे- एकवचन
४) पाखरे- अनेकवचन
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न ११ वा- ‘समया’ या शब्दाचा एकवचनी शब्द कोणता?
१) समयी
२) समया
३) समई
४) समय
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न १२ वा- पुढील पर्यायातील उभयवचनी नसलेला पर्याय कोणता ?
१) डॉक्टर
२) पाटील
३) वकील
४) इंजिनिअर
उत्तर- पर्याय क्रमांक 2
प्रश्न १३ वा- ‘बेडूक’ या नामाचे अनेकवचनी रूप कोणते?
१) बेडकी
२) बेडके
३) बेडूक
४) बेचकीत
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न १४ वा- गटात न बसणारा पर्याय शोधा.
१) खेडे- खेडी
२) केळे-केळी
३) मडके-मडके
४) कुत्रे-कुत्री
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न १५ वा- गटात न बसणारा पर्याय निवडा.
१) विळी-विळे
२) मोती-मोत्ये
३) मिरी-मिऱ्ये
४) कळी-कळ्या
उत्तर- पर्याय क्रमांक 1
प्रश्न १६ वा- पुढील पर्यायातील एकवचन-अनेकवचन असणारा पर्याय निवडा.
१) लिंबू – लिंबे
२) जळू-जळे
३) ऊ-ऊवे
४) गळू-गळू
उत्तर- पर्याय क्रमांक 1
प्रश्न १७ वा- पुढीलपैकी चुकीचा पर्याय शोधा.
१) फुल-फुले
२) घर-घरे
३) मूल-मले
४) चूल-चुले
उत्तर- पर्याय क्रमांक 4
प्रश्न १८ वा- पुढीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा.
१) शाळा
२) विद्या
३) बिया
४) गंगा
उत्तर- पर्याय क्रमांक 3
प्रश्न १९ वा- पुढीलपैकी स्त्रीलिंगी नामाचे एकवचनाचे अनेकवचन असणारी जोडी कोणती ते ओळखून अचूक पर्याय निवडा.
१) कळी- कळ्या
२) गाय-गाय
३) लांडोर-लांडोऱ्या
४) म्हैस-रेडी
उत्तर- पर्याय क्रमांक 1
प्रश्न २० वा- पुढील स्त्रीलिंगी शब्दांच्या नामाचे अनेकवचनी शब्द ओळखून त्याचा योग्य पर्याय शोधा.
१) वेळी
२) वेळा
३) वेळो
४) वळा
उत्तर- पर्याय कर्मांक 2
3 Comments
Adarsh Vilasrao thool
ReplyDeletePallavi
ReplyDelete