7 vi Marathi kavita इयत्ता सातवी मराठी विषयातील सर्वच कविता Seventh Standard Marathi Poems

आपण सतत 7 vi kavita, 7 vi kavita Marathi 7 vi marathi kavita shravan maas, 7 vi kavita jay jay maharashtra maza, eyata 7 vi kavita Marathi, 7 vi marathi kavita swadhyay, iyatta 7 vi marathi kavita swadhyay, 7 vi chi kavita shravan maas, iyatta 7 vi chi kavita Marathi शोधत असता. आपण खालील लिंकवरून सर्व कविता पाहू शकता.

7-vi-Marathi-kavita-इयत्ता-सातवी-मराठी-विषयातील-सर्वच-कविता

Jay Jay Maharashtra maza 7th class जय जय महाराष्ट्र माझा ७ वी मराठी कविता Marathi Kavita

Jay Jay Maharashtra maza 7th class जय जय महाराष्ट्र माझा ७ वी मराठी कविता Marathi Kavita


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।धृ.।।
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।१।।
भीति न आम्हां तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला, जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरींतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।२।।
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवा साठी झिजला
दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ।।३।।

Mazi Marathi 7 vi marathi Kavita माझी मराठी इयत्ता ७ वी मराठी कविता mazi marathi kavita 7th

Mazi Marathi 7 vi marathi Kavita माझी मराठी इयत्ता ७ वी मराठी कविता mazi marathi kavita 7th


७. माझी मराठी माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न-कांचनाचे मोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजाभाव असो कोणताही पंथ . माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूर देशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी

गोमू माहेरला जाते हो नाखवा मराठी कविता ७ वी Gomu Maherla Jate Marathi Kavita Std 7 th


गोमू माहेरला जाते हो नाखवा मराठी कविता ७ वी Gomu Maherla Jate Marathi Kavita Std 7 th



१०. गोमू माहेरला जाते
गोमू माहेरला जाते हो नाखवा ।
तिच्या घोवाला कोकण दाखवा ।।
दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ।।१।।
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ।।२।।
सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शीर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ।।३।।

अनाम वीरा इयत्ता ७ वी विषय- मराठी Anamveera kavita Std 7Th इयत्ता सातवी अनाम वीरा कविता

अनाम वीरा इयत्ता ७ वी विषय- मराठी Anamveera kavita Std 7Th इयत्ता सातवी अनाम वीरा कविता



अनाम वीरा इयत्ता ७ वी मराठी
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
धगधगतां समराच्या ज्वाला या देशा काशीं
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा-
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रिया सतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुशें यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

असे जगावे गुरु ठाकूर मराठी कविता गायन इयत्ता सातवी Ase jagave kavita marathi |Ase jagave kavita 7th

असे जगावे गुरु ठाकूर मराठी कविता गायन इयत्ता सातवी Ase jagave kavita marathi |Ase jagave kavita 7th


१५. असे जगावे
असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये , आयुष्याला द्यावे उत्तर!
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये , आयुष्याला द्यावे उत्तर!
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना
संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये , आयुष्याला द्यावे उत्तर!
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरेमध्ये , आयुष्याला द्यावे उत्तर!

Them aaj ha panyacha थेंब आज हा पाण्याचा | them aaj ha panyacha Kavita | 7 वी मराठी कविता

Them aaj ha panyacha थेंब आज हा पाण्याचा | them aaj ha panyacha Kavita | 7 वी मराठी कविता

१७. थेंब आज हा पाण्याचा
शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।धृ.।।
मोती बनुनी सरसर येती, वर्षे मधल्या सरीतुनी
माळ ओवते, निसटुन जाते, बावरते जणू परी कुणी
या मोत्यांचा संचय कर तू, प्रश्न तुझ्या रे जीण्याचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।१।।
आभाळातिल ह्या मोत्याने, मातीमधुनी पिकती मोती
निसर्ग जाणी मोल तयाचे, तुम्ही माणसे का मग कोती?
संचय करता तिजोरीतल्या, खणखणत्या त्या नाण्यांचा
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।२।।
कशास ऐसा वेडाचाळा, स्वत: होऊनी ठगण्याचा
दृष्टिकोन तू बदल आता रे, निसर्गास ह्या बघण्याचा
तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?
आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा ।।३।।