NMMS Scholarship Exam 2022-23 School Registraction राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा शाळा नोंदणी (NMMS) २०२२-२३
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्याथ्र्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्याची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट ठेऊन दरवर्षी परिक्षा घेण्यात येते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक
विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३
परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेची
नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१. शाळा नोंदणी करणे व शाळा संलग्नता शुल्क ऑनलाईन भरणे.-
१. शाळा नोंदणी करणे व शाळा संलग्नता
शुल्क ऑनलाईन भरणे.
२. School Profile भरणे.
३ विद्यार्थ्याची नोंदणी करणे व ऑनलाईन
अर्ज भरणे
४ विद्यार्थ्याचे परीक्षा शुल्क ऑनलाईन
भरणे.
A. शाळा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची
आवश्यकता आहे
परिषदेच्या www.mscepune.in व http://nmmsmsce.in या
संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या उपक्रम
मधील शाळा नोंदणी (School Registration) या Tab
वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून
शेवटी असलेल्या नवीन नोंदणीला जा (Click here to Register) व अर्ज भरा या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवरील Click
here to Register या Tab वर
क्लिक करा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
१. शाळेचा युवायस (UDIES) नंबर अचूक नमूद
करणे.
२ शाळेचा युडायस (UDIES) नंबर नमूद केल्यानंतर SARAL वरुन
आलेली (Auto generate झालेली) शाळेची सर्व माहिती अचूक आहे
याची खात्री करावी. जी माहिती आलेली नसेल/ अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर
माहिती Edit करून अचूक नमूद करावी.
३. शाळेचा पूर्ण पता ठिकाण/ लैंडमार्क,
रस्ता, पेठ, गाव
या क्रमाने अचुकपणे नमूद करा.
४ जर माहिती अपूर्ण असेल तर शाळेचे
पूर्ण पता अचूक पणे नमूद करा ठिकाण लैंडमार्क रस्ता पेठ गाव, तालुका जिल्हा
व पिनकोड ( ६ अंकी) या अचूकपणे नमूद करा ५ पिनकोड नमूद करताना तो ४ ने सुरू होईल
याची खात्री करा.
६. संपर्क माहितीमध्ये
मुख्याध्यापकांचा दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूक नमूद करा
७ शाळेत निवासी सोय असल्यास Yes
व नसल्यास No हा पर्याय Hostel Facility
Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
८. आपला शाळेचा Email ID अचूकपणे नमूद
करा.
९ पडताळणीसाठी त्याच्या खालील रकान्यात
तोच Email ID पुन्हा अधूकपणे नमूद करा.
१० वरील सर्व माहिती योग्यरित्या
भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा,
११] Submit बटनावर
क्लिक केल्यानंतर शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- भरण्यासाठी Proceed to pay
हा पर्याय उपलब्ध होईल.
१२] Proceed to pay या बटनावर क्लिक केल्यास ऑनलाईन पद्धतीने शाळा सलग्नता शुल्क
भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट
कार्ड व एटीएम पिन, इंटरनेट बँकिंग असे पर्याय उपलब्ध
होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन शुल्क भरावे.
१३ चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरण्याचा
पर्याय उपलब्ध नाही, याची नोंद घ्यावी.
१५ शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर ईमेलवर व मोबाईलवर Payment Successful असा मेसेज येईल. आणि Transaction Details स्क्रीनवर दिसतील.
१६ Transaction Details Download करा व Print काढा.
१७ आपण नमूद केलेल्या शाळेच्या Email ID व मोबाईल वर शाळा लॉगीनये User Name व Password प्राप्त होईल...
१८ शाळा नोंदणी केल्याशिवाय
विद्याथ्यांची नोंदणी करता येणार नाही.
B. School Profile ची माहिती भरणे.
१ शाळेच्या Email ID व मोबाईलवर प्राप्त झालेल्या User Name व Password
द्वारे लॉगीन करावे.
२. लॉगीन केल्यांनतर School
Profile ची माहिती भरण्याबाबतचा फॉर्म उपलब्ध होईल.
३. सदर फॉर्म मध्ये School
UDISE Code, School Name, Principal/Head Master Mobile No.
Email या क्रमाने सदरच्या शाळेची माहिती automatically
येईल. जी माहिती आलेली नसेल/ अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.
४ शाळेचे माध्यम (School
Medium) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
५. शाळेचा Area (Rural/Urban)
Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
६ शाळेचा Syllabus Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
७. School Type Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
८ शाळेचा टेलीफोन नंबर अचूकपणे नमूद करा.
९ शाळेचा पता ठिकाण/ लँडमार्क, गाव, अचूकपणे नमूद करा.
१० तालुका, जिल्हा
व पिन कोड SARAL वरुन Auto generate झालेला आहे.
११ Upload Principal's / Head
Master's Photo with Signature मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी
अपलोड करण्याची कार्यपद्धती ८.५ सें.मी.
x ४.५ से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या
शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ Kb ते १०० kb या आकारामध्ये बसेल याची खात्री करून
घ्यावी.
१२ वरील सर्व माहिती योग्यरित्या
भरल्यानंतर Save या बटनावर क्लिक करा.
१३ एकदा भरलेली शाळेची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी
एकच असेल.
अशा प्रकारे आपण शाळा नोंदणी पुर्ण करावी व त्यानंतर विद्यार्थी फॉर्म भरण्यास सुरवात करावी.
0 Comments