Ghoshticha Guruvar Bhag 3 | गोष्टींचा गुरूवार भाग- 3|सशाचे कान झालेत लांब
सशाचे कान झालेत लांब
पांढरा पांढरा ससा, देवाजवळ राहायचा,
हरणाच्या रथातून फिरायचा-
इवल्या इवल्या कानांचा
आणि गुंजासारख्या डोळ्यांचा.
एकदा देवाने सशाला बोलावले
आणि त्याला काम सांगितले,
“नारद बसले आहेत बागेत,
त्यांना घेऊन इकडे ये पळत !”
सशाने ऐकले-
'नारळ पडले आहेत बागेत; त्यांना घेऊन इकडे ये पळत.'
ससा धांदरट फार !
ससा खूप जोरात पळाला
आणि एकदाचा बागेत आला.
'नारळ तर झाडाला,
ते लागायचे कसे हाताला ?'
नारळ काही पडेना, झाडावर चढता येईना !
ससा बसला रडत. देव आला बागेत.
देवाने विचारले,
ससेराव, ससेराव, का रडता ?
नारळाच्या झाडाआड का दडता ? "
ससा म्हणाला, "नारळ काही पडेना !
झाडावर चढता येईना !
नारळ आणू कसा ? "
देव म्हणाला, "मी बोलावले नारदाला आणि तू ऐकलेस 'नारळाला ! ' ऐकत नाहीस नीट, थांब, कान तुझे करतो लांब.”
देवाने ओढले सशाचे कान तेव्हापासून ते झालेत लांब !
मागील भाग खालिलप्रमाणे
अ.क्र |
गोष्टीचे नाव |
ऐका |
१ |
वाचनाचा
गुरूवार |
|
२ |
वाचनाचा
गुरूवार |
|
३ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ३ |
४ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ४ |
५ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ५ |
६ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ६ |
७ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ७ |
८ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ८ |
९ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ९ |
१० |
वाचनाचा
गुरूवार |
भाग १० |
११ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग ११ |
१२ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग १२ |
१३ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग १३ |
१४ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग १४ |
१५ |
वाचनाचा
गुरूवार |
भाग १५ |
|
|
|
0 Comments