नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

विभाग III- भाषा (प्रश्न 61 ते 80)
Navodaya Vidyalaya Question Paper is an exam paper that students take to get admission into Navodaya Vidyalayas, which are government-run residential schools for students from rural areas. The paper tests the student's knowledge in subjects like Mathematics, Science, Social Science, English, and Hindi. It has multiple-choice, short answer, and long answer questions of moderate difficulty. Teachers and subject experts make the paper to be fair and unbiased. The exam helps to determine a student's academic abilities and is an important factor in the admission process for Navodaya Vidyalayas.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 

सराव प्रश्नपत्रिका 

Navodaya Vidyalaya Question Paper

विभाग III- भाषा (प्रश्न 61 ते 80)

सूचना : या विभागात चार उतारे आहेत. प्रत्येक उतान्यानंतर पाच प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरचा प्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्नाकरिता (1). (2), (3) आणि (4) असे क्रमांक असलेली चार संभाव्य उत्तरे आहेत. यांपैकी केवळ एक उत्तर बरोबर आहे. तुम्हाला बरोबर असलेले उत्तर निवडायचे आहे आणि तो क्रमांक प्रश्नाशी संबंधित क्रमांकासमोरील चौकटीत उत्तर इंग्रजी अंकात क्रमांक लिहायचा आहे.


उतारा -1

कडुनिंबाचा वृक्ष जसा जुना होईल, तसतसा त्याच्या खोडातील आतील भाग सुगंधित होत जातो. कडुनिंबाच्या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. कारण त्याला कीड लागण्याची भीती नसते. शेतात कडुनिंबाची झाडे लावल्याने जमिनीचा कस कायम राहतो. तसेच जंतुसंसर्गाला प्रतिबंध होवू शकतो.

कडुनिंब जखम भरून येण्यासाठी उपयुक्त असतो. जंतुसंसर्ग झाला तर कडुनिंबाच्या पानांच्या काढयाने जखम अगोदर धुवून घेऊन नंतर कडुनिंबाची पाने मधासह वाटून तयार झालेला लगदा जखमेवर बांधला जातो. विषबाधेवर विशेषतः सापाच्या विषावर कडुनिंबाचा पाला अतिशय प्रभावी असतो. कडुनिंबाची पाने खाऊन वर त्या व्यक्तीला ती पाने कडू लागली नाही, तर त्याचा अर्थ साप चावून विषबाधा झाली आहे असे समजावे. अशा प्रथा प्रचलित आहेत. यावर पाल्याचा रस देण्याची पद्धत आहे.




1/5
कडुनिंबाच्या वयाचा त्याच्या खोडावर काय परिणाम होतो ?
1) खोड काळे होत जाते.
2) खोडावरील कीड वाढते.
3) खोडाच्या आतील भाग सुगंधित होत जातो.
4) खोड सुकते
2/5
बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला कीड लागू नये म्हणून
1) सागाचे लाकूड वापरतात.
2) कडुनिंबाचे लाकूड वापरतात.
3) वडाचे लाकूड वापरतात.
4) आंब्याचे लाकूड वापरतात.
3/5
शेतात कडुनिंबाची झाडे लावावीत, कारण
1) त्यामुळे पक्षी येत नाहीत.
2) जंतुसंसर्ग होत नाही.
3) जमिनीचा कस कायम राहतो.
4) जमिनीचा कस वाढतो.
4/5
कोणता प्राणी चावल्यावर कडुनिंबाचा पाला गुणकारी समजून खातात ?
1) कुत्रा
2) विंचू
3) साप
4) लांडगा
5/5
'विरोध' समानार्थी शब्द सांगा.
1) प्रभावी
2) कडू
3) विष
4) प्रतिबंध
Result:

उतारा -1

23 मार्च, 1931 ची पहाट. लाहोरचा प्रचंड तुरुंग, सर्वत्र गंभीर वातावरण शस्त्रधारी सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. सकाळचे सात वाजलेले.थोड्याच वेळात फासावर चढवले जाणारे तीन क्रांतिकारक गंभीर वातावरणात 'इन्किलाब झिंदाबाद', 'इन्किलाब झिंदाबाद' अशा घोषणा देत होते.

समोर साक्षात मृत्यू उभा असताना निर्भयपणे क्रांतीचा जयजयकार करणारे हे वीर पुरुष कोण होते ? ते होते भारतभूमीचे सुपुत्र भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणारे श्रेष्ठ क्रांतिकारक.

1/5

भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना किती वाजता फाशी दिली ?
1) संध्याकाळी सात
2) सकाळी सात
3) सकाळी आठ
4) दुपारी बारा
2/5
क्रांतिकारक कोणत्या घोषणा देत होते ?
1) वंदे मातरम्
2) भारत माता की जय
3) इन्किलाब झिंदाबाद
4) जय हिंद
3/5
23 मार्च, 1931 ला कोणाला फाशी दिली ?
1) भगतसिंग
2) सुखदेव
3) राजगुरु
4) भगतसिंग, सुखदेव, राजगुरु
4/5
क्रांतिकारकासमोर कोण उभे होते ?
1) इंग्रज
2) जेलर
3) मृत्यु
4) खासदार
5/5
'चोख' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा..
1) गंभीर
2) कडेकोट
3) साक्षात
4) वीर
Result: