Maharashtra Police Bharti 2023 Practice Question Paper 7 

Maharashtra Police Bharti 2023 Practice Question Paper सोडवू शकता. आपणास कोणत्याही परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सरावाची खूप आवश्यकता असते. Maharashtra Police Bharti याला अपवाद नाही. आपणास जर Maharashtra Police Bharti 2023 मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर साव हा करावाच लागेल.त्यासाठी आपणास Maharashtra Police Bharti 2023 Practice Question Paper देत आहे या च्या मदतीने आपण आधिकाधिक सराव करू शतता. सर्वप्रथम आपण अभ्यासक्रम समजून घेऊ.

Maharashtra-Police-Bharti-2023-Practice-Question-Paper

Maharashtra Police Bharti 2023 syllabus- 

महाराष्ट्र पोलीस भरतीचे दोन टप्पे असतात एक म्हणजे शारीरिक चाचणी व दुसरी लेखी परीक्षा. मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी घेण्यात येते.महत्वाचे म्हणजे शारीरिक योग्यता चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार हेच संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकास दहा या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलावण्यास पात्र असतात.

मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी- 

शारीरिक चाचणी पुरुषशारीरिक चाचणी महिला
1600 मीटर धावणे :- 20 गुण800 मीटर धावणे :- 20 गुण
100 मीटर धावणे :- 15 गुण100 मीटर धावणे :- 15 गुण
गोळाफेक :- 15 गुणगोळाफेक :- 15 गुण
एकूण गुण :- 50 गुणएकूण गुण :- 50 गुण


महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा  अभ्यासक्रम-

पोलिस भरती लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल. एक प्रश्न व त्याला अनुसरून चार पर्याय दिलेले असतील.  परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. उमेदवारांना 90 मिनिट एवढा कालावधी असेल, या दिलेल्या कालावधील सर्व प्रश्न सोडवायचे असता. परीक्षा मराठी भाषेतच घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे. एकुण १०० असतील.वेळ ९० मिनेटे असेल. तेव्हा या परीक्षेचा विषय निहाय गुण विभागणी पाहू.

अ.क्रविषयप्रश्नगुण
(१)गणित२५२५
(२)मराठी२५२५
(३)सामान्य ज्ञान२५२५
(४)बुद्धिमता चाचणी२५२५
(५)एकूण गुण१००१००


पोलीस भरती लेखी परीक्षा अभ्यासक्रम 2023


पोलीस भरती अभ्यासक्रम 2023
1) भूगोल (Geography) - • संपूर्ण भारताचा भूगोल • महाराष्ट्राचा भूगोल
2) इतिहास (History) - • 1857 चा उठाव • भारताचे व्हाईसरॉय • समाज सुधारक • राष्ट्रीय सभा • भारतीय स्वतंत्र लढा • ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ • 1909 कायदा • 1919 कायदा • 1935 कायदा • हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
3) पंचायत राज- • ग्राम प्रशासन • समिती व शिफारसी • घटना दुरुस्ती • ग्रामसभा व ग्रामपंचायत • ग्रामसेवक • पंचायत समिती • जिल्हा परिषद • मुख्य कार्यकारी अधिकारी CEO • गटविकास अधिकारी BDO • नगर परिषद / नगरपालिका • महानगरपालिका • ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन
4) सामान्य विज्ञान– • विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय • शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर • शोध व त्यांचे जनक • शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
5) राज्यघटना- • भारतीय राज्यघटना • राष्ट्रपती • लोकसभा • राज्यसभा • विधानसभा • विधानपरिषद • वैशिष्ट्ये • मूलभूत कर्तव्य • मूलभूत अधिकार • मार्गदर्शक तत्त्वे • राज्यपाल • मुख्यमंत्री • उपराष्ट्रपती • पंतप्रधान • संसद
6) सामान्य ज्ञान- • विकास योजना:- संपूर्ण विकास योजना • पुरस्कार- महाराष्ट्राचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबंधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार • क्रीडा • खेळ व खेळाची संबंधित चषक • प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ • खेळ व खेळाडूंची संख्या • खेळाचे मैदान व ठिकाण • खेळ संबंधित चिन्हे व प्रतिके • महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे • आशियाई स्पर्धा • राष्ट्रकुल स्पर्धा • क्रिकेट स्पर्धा
7) मराठी- • समानार्थी शब्द • विरुद्धार्थी शब्द • अलंकारिक शब्द • लिंग • वचन • संधी • मराठी वर्णमला • नाम • सर्वनाम • विशेषण • क्रियापद • काळ • प्रयोग • समास • वाक्प्रचार • म्हणी
8) गणित- • संख्या व संख्याचे प्रकार • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार • कसोट्या • पूर्णांक व त्यांचे प्रकार • अपूर्णांक व त्यांचे प्रकार • मसावि आणि लसावि • वर्ग व वर्गमूळ • घन व घनमूळ • शेकडेवारी • भागीदारी • गुणोत्तर व प्रमाण • सरासरी • काळ-काम-वेग • दशमान पद्धती • नफा-तोटा • सरळव्याज व चक्रवाढ व्याज • घड्याळावर आधारित प्रश्न • घातांक व त्यांचे नियम
9) बुद्धिमत्ता चाचणी- • संख्यामालिका • अक्षर मालिका • वेन आकृत्या वर आधारित प्रश्न • सांकेतिक भाषा • सांकेतिक लिपी • देशावर आधारित प्रश्न • नातेसंबंध • घड्याळावर आधारित प्रश्न • तर्कावर आधारित प्रश्न


 

@@@@

Police Bharti 2023 Practice Question Paper

1/25
'भांगडा' हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
A. पंजाब
B. राजस्थान
C. केरळ
D. तामिळनाडू
2/25
एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौ. सेंमी आहे, तर त्याची लांबी किती ?
A. 18
B. 16
C. 14
D. 22
3/25
खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही ?
A. चित्रा
B. बारी
C. वैर
D. रानगंगा
4/25
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ........ होय.
A. राज्य विधिमंडळ
B. कार्यकारी मंडळ
C. संसद
D. न्यायमंडळ
5/25
8% सरळ व्याजाने 10 वर्षे मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल ?
A. रु.2000
B. रु.3000
C. रु.2200
D. रु.2600
6/25
माहिती तंत्रज्ञान संदर्भाने 'पीटूपी (P2P)' चा संबोधनाचा अर्धकाय होतो?
A. पीयर-टू-पीयर
B. परसन-टू-परसन
C. पब्लिक-टू-पब्लिक
D. प्रायव्हेट-टू-पब्लिक
7/25
मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. वेट लिफ्टिंग
B. नेमबाजी
C. बॉक्सिंग
D. टेबल टेनिस
8/25
जर सुरत हे औरंगाबादपेक्षा मोठे असेल, मुंबई हे पुण्यापेक्षा मोठे असेल, पुणे हे सुरतपेक्षा मोठे असेल तर सर्वात मोठे शहर कोणते ?
A. मुंबई
B. पुणे
C. सूरत
D. औरंगाबाद
9/25
महाराष्ट्रात...... शहरात पोलीस आयुक्तालय नाही.
A. नाशिक
B. अमरावती
C. सोलापूर
D. उस्मानाबाद
10/25
SRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?
A. रायगड
B. शिवनेरी
C. पुरंदर
D. लोहगड
11/25
'डोळा' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
A. अक्ष
B. चक्षू
C. लोचन
D. दृश्य
12/25
. दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ---- अव्यय असे म्हणतात.
A. शब्दयोगी
B. केवलप्रयोगी
C. उभयान्वयी
D. क्रियाविशेषण
13/25
अनेकवचनी शब्द ओळखा.
A. महा
B. शाळा
C. गळा
D. विळा
14/25
आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
A. क्षय
B. डायरीया
C. अॅनिमिया
D. बेरीबेरी
15/25
1/8 + =1/12 = ?
A. 2/4
B. 5/24
C. 2/8
D. 3/6
16/25
संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात ?
A. तद्भव
B. तंतोतंत
C. मूळ शब्द
D. तत्सम
17/25
विद्यार्थी मुलगे आहेत. सर्व मुलगे खेळाडू आहेत. वरील विधानांवरून कोणता निष्कर्ष निश्चतिपणे निघतो ?
A. सर्व खेळाडू मुलगे आहेत
B. सर्व मुलगे विद्यार्थी आहेत
C. सर्व खेळाडू विद्यार्थी आहेत
D. सर्व विद्यार्थी खेळाडू आहेत
18/25
LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
A. संरक्षण
B. विमा
C. विमान वाहतूक
D. दूरसंचार
19/25
'दिवसेंदिवस' हा शब्द कोणत्या समास प्रकारात मोडतो ?
A. अव्ययीभाव
B तत्पुरुष
C. द्वंद्व
D. बहुव्रीही
20/25
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
A. प्रात्यक्षिक
B. प्रत्यक्षीक
C. प्रात्यक्षीक
D प्रत्यक्षिक
21/25
त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेइतका आहे, जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4 : 5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनाचे माप किती असेल ?
A. 50°, 30°, 80°
B. 40°, 50°, 90°
C. 20, 250, 135"
D. 48°, 60°, 320
22/25
खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
A. नदी
B. कणीस
C. देखावा
D. झाड
23/25
खालीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक आहे ?
A. गुडघा
B. स्टेशन
C. बाजरी
D. वांगे
24/25
'विद्यापीठ कायदा' कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे?
A. हंटर कमिशन
B. सॅडलर कमिशन
C. रॅली कमिशन
D. वूड्स कमिशन
25/25
'ळ' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
A. उष्मे
B. स्पर्श
C. महाप्राण
D. स्वतंत्र
Result:
@@@@@