स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र केंद्रीय कार्यकारी मंडळ

आज आपण स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र  संसदीय शासन पद्धतीची ओळख पाहणार आहोत. इयत्ता आठवी च्या इतिहास व नागरीकशास्च्र विषयामध्ये नागरीकशास्त्राचे इकुण सहा पाठ दिलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र संसदीय शासन पद्धतीची ओळख यापाठावरील स्वाध्याय Swadhay आभ्यासणार आहोत. नागरीकशास्त्र विषयातील पाठ पुढीलप्रमाणे आहेत. पाठ पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख, पाठ दुसरा भारताची संसद, पाठ तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ, पाठ चौथा भारतातील न्यायव्यवस्था, पाठ पाचवा राज्यशासन आणि पाठ सहावा नोकरशाही.
 
स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र केंद्रीय कार्यकारी मंडळ

स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र केंद्रीय कार्यकारी मंडळ

१. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. 

 (१) भारतातील कार्यकारी सत्ता ......... यांच्याकडे असते. 

 (राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती) 

(२) राष्ट्रपतीचा कार्यकाल ....... वर्षांचा असतो. 

 (तीन, चार, पाच) 

(३) मंत्रिमंडळाचे नेतृत्व .......... करतात. 

 (पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती) 

२. ओळखा आणि लिहा. 

 (१) राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव -

 (२) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात 

३. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा. 

 (१) महाभियोग प्रक्रिया 

(२) अविश्वास ठराव 

(३) जम्बो मंत्रिमंडळ 

४. थोडक्यात उत्तरे लिहा. 

(१) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा. 

 (२) संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते? 

५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

भारताच्या राष्ट्रपतींची कार्य

स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र केंद्रीय कार्यकारी मंडळ

नागरिकशास्त्र केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय-

1/10
(१) भारतातील कार्यकारी सत्ता ------ यांच्याकडे असते.
(अ) राष्ट्रपती
(ब) प्रधानमंत्री
(क) सभापती
2/10
(२) राष्ट्रपतींचा कार्यकाल ------ वर्षांचा असतो.
(अ) तीन
(ब) चार
(क) पाच
3/10
(३) मंत्रिमंडळाचे नेतृत्व ------- करतात
(अ) पक्षप्रमुख
(ब) प्रधानमंत्री
(क) राष्ट्रपती
4/10
(४) संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी -------- असते.
(अ) लोकसभाध्यक्षांवर
(ब) राष्ट्रपतींवर
(क) उपराष्ट्रपतींवर
5/10
(५) संसदेच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रपतींवर ------- बहुमताने ठराव संमत झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर व्हावे लागते.
(अ) एक तृतीयांश
(ब) दोन तृतीयांश
(क) तीन चतुर्थांश
6/10
(६) भारताच्या संरक्षण दलांचे ------ हे सर्वोच्च प्रमुख असतात.
(अ) प्रधानमंत्री
(ब) उपराष्ट्रपती
(क) राष्ट्रपती
(ड) संरक्षणमंत्री
7/10
(७) मंत्रिमंडळात समावेश होताना ती व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल; तर तिला ------ महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते.
(अ) तीन
(ब) सहा
(क) नऊ
(ड) बारा
8/10
(८) संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या ------- टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, असे निश्चित करण्यात आले.
(अ) दहा
(ब) पंधरा
(क) वीस
(ड) पंचवीस
9/10
(९) जोपर्यंत ------ बहुमत असते तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते.
(अ) विधान परिषदेत
(ब) विधानसभेत
(क) लोकसभेत
(ड) राज्यसभेत
10/10
(१०) मंत्रिमंडळाचे खातेवाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे ------ करतात.
(अ) राष्ट्रपती
(ब) प्रधानमंत्री
(क) लोकसभाध्यक्ष
(ड) राज्यसभेचा सभापती
Result:

२. ओळखा आणि लिहा. 

 (१) राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव - केंद्रीय कार्यकारी मंडळ

 (२) अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा या नावाने ओळखतात - शून्य प्रहर

३. पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा. 

 (१) महाभियोग प्रक्रिया 

उत्तर- महाभियोग प्रक्रिया - संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते, परंतु त्यांचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणारे ठरल्यास राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो. या प्रक्रियेला ‘महाभियोग’ प्रक्रिया असे म्हणतात. राष्ट्रपतींकडून संविधानाचा भंग झालेला असल्यास तसा आरोप कोणतेही एक सभागृह ठेवते व त्या आरोपांची चौकशी दुसरे सभागृह करते. दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने (२/३) ठराव संमत होणे आवश्यक असते. त्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर होतात या सर्व प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात.

(२) अविश्वास ठराव - 

उत्तर - अविश्वास ठराव- मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लोकसभेत जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंतच सरकार कार्य करू शकते. हे बहुमत संसद सदस्यांनी काढून घेतल्यास सरकार किंवा मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही. ‘आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही’ असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. तो बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.

(३) जम्बो मंत्रिमंडळ 

उत्तर- जम्बो मंत्रिमंडळ -  का ? याचा अर्थ खूप मोठे मंत्रिमंडळ. आपल्या देशात मंत्रिमंडळाचा आकार मोठा ठेवण्याकडे कल होता. मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे म्हणून संविधानात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले

४. थोडक्यात उत्तरे लिहा. 

(१) मंत्रिमंडळाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर- 

मंत्रिमंडळाची कार्य
(१) संसदीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ कायद्यांच्या निर्मितीत पुढाकार घेते. त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा करते आणि नंतर ते संसदेच्या सभागृहात मांडले जाते. मंत्रिमंडळ सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेते.
(२) शिक्षण, शेती, उद्योग, आरोग्य, परराष्ट्र व्यवहार अशा अनेक विषयांवर मंत्रिमंडळाला एक निश्चित धोरण किंवा कार्याची दिशा ठरवावी लागते. मंत्रिमंडळाने ठरवलेल्या धोरणाबाबत संसदेला विश्वासात घ्यावे लागते.
(३) मंत्रिमंडळातील मंत्री आपापल्या खात्याचे धोरण संसदेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणून संसदेकडून ते मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात.
(४) मंत्रिमंडळाची मुख्य जबाबदारी धोरणांच्या अंमलबजावणीची असते.
(५) संसदेने धोरणांना किंवा कायद्याच्या प्रस्तावांना मान्यता दिली की मंत्रिमंडळ त्यांची अंमलबजावणी करते.


 (२) संसद मंत्रिमंडळावर कशाप्रकारे नियंत्रण ठेवते? 

संसदीय शासनपद्धतीत संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करत असते. कायद्यांची किंवा धोरणांची निर्मिती, अंमलबजावणी व त्यानंतरच्या काळातही संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. या नियंत्रणाचे काही मार्ग पुढीलप्रमाणे :

(१) चर्चा आणि विचारविनिमय : कायद्याच्या निर्मितीच्या दरम्यान संसद सदस्य चर्चा आणि विचारविनिमय करून मंत्रिमंडळाला धोरणातील अथवा कायद्यातील त्रुटी दाखवून देतात. कायदा निर्दोष होण्याच्या दृष्टीने ही चर्चा खूप महत्त्वाची असते.

(२) प्रश्नोत्तरे : संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी होते. या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक उत्तरे द्यायची असतात.

(३) प्रश्नोत्तरे हा मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा एक  अतिशय प्रभावी मार्ग आहे. शासनावर टीका करणे, विविध समस्यांवर प्रश्न मांडणे हे या दरम्यान होते. 

(४) मंत्र्याच्या उत्तराने समाधान न झाल्यास वाद निर्माण होऊ शकतात. आपला निषेध व्यक्त करण्यासाठी काही वेळेस संसद सदस्य सभात्याग करतात किंवा घोषणा देत सभागृहाच्या मध्यवर्ती ठिकाणी जमा होतात.  

५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

भारताच्या राष्ट्रपतींची कार्य


भारताच्या राष्ट्रपतींची कार्य
संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्येदिली आहेत. त्यांपैकी काही कार्ये पुढीलप्रमाणे
(१) संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असता
(२) लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही
(३) प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात
(४) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात.
(५) राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. युद्ध व शांतता यांबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात
(६) राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारही आहेत. उदा., एखाद्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.
(७) देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात