स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र नोकरशाही
१. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(१) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते.
(२) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे.
(२) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे.
३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा.
(२) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा
सनदी सेवांचे प्रकार
नागरिकशास्त्र नोकरशाही स्वाध्याय-
१. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा.
(१) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. - बरोबर
(२) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. - चूक
दुरूस्त विधान- केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) देशातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात.
२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे.
उत्तर- नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधींपासून वंचित राहून नयेत म्हणून सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण ही तरतूद करण्यात आली आहे
(२) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे.
उत्तर- नोकरशाही राजकीयदृष्ट्या तटस्थ असते. याचा अर्थ असा की कोणत्याही पक्षाचे शासन अधिकारावर येवो, त्या शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी नोकरशाहीने त्याच कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. त्या संदर्भात सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाहीत अथवा आपल्या राजकीय मतांनुसार काम करायचे नाही. एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळे सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षाचे सरकार अधिकारावर येते. पहिल्या सरकारची काही धोरणे हे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
३. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर- उत्तर- मंत्री व खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदांवरील व्यक्ती, यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात यावरही त्या-त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. खात्यासंबंधी निर्णय मंत्री घेतात, परंतु त्यांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती सनदी सेवक देतात. सनदी सेवकांचे अर्थात नोकरशाहीचे माहितीवर पूर्ण नियंत्रण असते. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे हे सनदी सेवकच सांगू शकतात. धोरणांच्या यशापयशाचा इतिहासही त्यांना माहीत असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद राखल्यास व परस्परांच्या संबंधात विश्वास, पारदर्शकता असल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होऊ शकतो. यावरून आपणास समजेल की खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागील मंत्री व सनदी सेवकांची भूमिका महत्वाची असते.
(२) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा.
उत्तर- नोकरशाहीने धोरणांच्या अंमलबजावणीतून अनेक बदल सामान्य नागरिपर्यंत आणले आहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकाचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठी योजना इ. बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते; म्हणून नोकरशाहीमुळे राजकीय व्यवस्थेला स्थैर्य लाभते.
४. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा
सनदी सेवांचे प्रकार
अ) आखील भारतीय सेवा -उदा. भारतीय प्रशासकिय सेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय वन सेवा
आ) केंद्रीय सेवा -उदा. भारतीय विदेश सेवा, महसूल सेवा
क) राज्य सेवा (राज्यशासन) उदा- गटविकास अधिकारी, तहसीलदा
0 Comments