स्वाध्याय इयत्ता आठवी नागरिकशास्त्र भारताची संसद
१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
(१) लोकसभेवर ......... पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात.
(अ) भौगोलिक मतदार संघ
(ब) धार्मिक मतदार संघ
(क) स्थानिक शासन संस्था मतदार संघ
(ड) प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत
(२) भारताचे .......... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
(अ) राष्ट्रपती
(ब) उपराष्ट्रपती
(क) प्रधानमंत्री
(ड) सरन्यायाधीश
२. शोधा आणि लिहा.
(१) लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात. ............
(२) कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे ............. .
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
(२) लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.
४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात?
(२) लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा.
५. कायदानिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.
नागरिकशास्त्र भारताची संसद स्वाध्याय-
२. शोधा आणि लिहा.
(१) लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात. - खासदार
(२) कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे - संसद .
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
उत्तर- राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे कारण- राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले १/३ सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा सतत कार्यरत असते.
(२) लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.
उत्तर- लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. कारण- भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जात भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा. लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात.
४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात?
उत्लोतर- कसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त ५५२ असते. आपल्या देशातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे, म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. अशाप्रकारे लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात
(२) लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा.
लोकसभेच्या अध्यक्षांची कामे |
---|
(१) लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची ‘अध्यक्ष’ म्हणून निवड करतात |
(२) लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालवतात. |
(३) लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. |
(४) अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निःपक्षपातीपणे चालवतात. |
(५) लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेषाधिकार असतात. त्यांची जपणूक अध्यक्ष करणे. |
सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इ |
कायदानिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे |
---|
(१) आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला ‘कायदानिर्मितीची प्रक्रिया’ असे म्हणतात. |
(२) कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जात |
(३) संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात. (१) अर्थ विधेयक (२) सर्वसाधारण विधेयक |
(४) पहिले वाचन : संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. यास विधेयकाचे ‘पहिले वाचन’ असे म्हणतात |
(५) दुसरे वाचन : दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात, तर विरोधक विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात. सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते. |
(६) दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होते. या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात. त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते |
(७) तिसरे वाचन : तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते. |
(८) संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. |
(९) राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो |
0 Comments