Setu abhyas uttar Chachani Question Paper
Setu abhyas uttar Chachani pdf Bridge course question Paper Pdf सेतू अभ्यास उत्तर चाचणी pdf सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी pdf सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी पेपर शोधत असता. कारण आपणास सेतू अभ्यासक्रम राबवत असताना वीस दिवसानंतर सेतू चाचणी क्रमांक२ व सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी setu abhyas kram uttar chachani घ्यावयाची आहे. आपण यशस्वीपणे सेतू अभ्यासक्रम राबवल्यानंतर सेतू चाचणी पेपर २ घ्यावयाची आहे. सेतू चाचणी १ आपण घेती असेल अगदी त्याच प्रमाणे सेतू चाचणी २ घ्यावयाची आहे.
सेतू अभ्यास का राबवला का राबवला? -
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ २४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सेतू अभ्यास छापील स्वरुपात देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्य शाळा व्यवस्थापनासाठी सेतू अभ्यास परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/ संस्था करू शकतात.
सेतू अभ्यास स्वरूप-
१. सदर सेतू अभ्यास हा २० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आलेला आहे.
३. सदर सेतू अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहे.
४. सदर सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.
५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही विषयांनी ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.
६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर सेतू अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.
सेतू उत्तर चाचणी कालावधी-
पूर्व चाचणी - दि. ३० जून ते ३ जुलै २०२३
२० दिवसांचा सेतू अभ्यास- दि. ४ जुलै ते २६ जुलै २०२३.
उत्तर चाचणी - दि. २७ ते ३१ जुलै २०२३
इयत्ता २ री सेतू उत्तर चाचणी पेपर
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|---|---|
१ | भाषा | डाऊनलोड |
२ | गणित | डाऊनलोड |
३ | इंग्रजी | डाऊनलोड |
इयत्ता 3 री सेतू उत्तर चाचणी पेपर
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|---|---|
१ | भाषा | डाऊनलोड |
२ | गणित | डाऊनलोड |
३ | इंग्रजी | डाऊनलोड |
४ | विज्ञान | डाऊनलोड |
५ | सा. शास्त्रे | डाऊनलोड |
इयत्ता 7 वी सेतू उत्तर चाचणी पेपर
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|---|---|
१ | भाषा | डाऊनलोड |
२ | गणित | डाऊनलोड |
३ | इंग्रजी | डाऊनलोड |
४ | विज्ञान | डाऊनलोड |
५ | सा. शास्त्रे | डाऊनलोड |
इयत्ता 8 वी सेतू उत्तर चाचणी पेपर
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|---|---|
१ | भाषा | डाऊनलोड |
२ | गणित | डाऊनलोड |
३ | इंग्रजी | डाऊनलोड |
४ | विज्ञान | डाऊनलोड |
५ | सा. शास्त्रे | डाऊनलोड |
इयत्ता 9 वी सेतू उत्तर चाचणी पेपर
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|---|---|
१ | भाषा | डाऊनलोड |
२ | गणित | डाऊनलोड |
३ | इंग्रजी | डाऊनलोड |
४ | विज्ञान | डाऊनलोड |
५ | सा. शास्त्रे | डाऊनलोड |
इयत्ता १० वी सेतू उत्तर चाचणी पेपर
अ.क्र | विषय | डाऊनलोड |
---|---|---|
१ | भाषा | डाऊनलोड |
२ | गणित भाग १ | डाऊनलोड |
३ | गणित भाग २ | डाऊनलोड |
४ | इंग्रजी | डाऊनलोड |
५ | विज्ञान भाग १ | डाऊनलोड |
६ | विज्ञान भाग २ | डाऊनलोड |
७ | सा. शास्त्रे | डाऊनलोड |
टिप- वरील सर्वमाहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र, पुणे याच्या वेंबसाईटवर देखील आहे केवळ कमी वेळात व माहिती लवकर आपणापर्यंत देण्याच्या उद्देशाने आपणासाठी दिली आहे. सर्व श्रेय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र, पुणे यांचे आहे.
1 Comments
9518902936
ReplyDelete