शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 

विषयः- मराठी 

घटक- कार्यात्मक व्याकरण

उपघटक- विरामचिन्हे

प्रश्न 20 गुण 40

-----------------------------

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका  विषयः- मराठी   घटक- कार्यात्मक व्याकरण  उपघटक- विरामचिन्हे





1/20
प्रश्न १ ला –खालील वाक्यात पूर्णविराम असलेले वाक्य शोधा ?
१) घंटा वाजली.
२) उतारा वाचला का?
३) केवढा हा साप!
४) तु नियमित अभ्यास करतो का ?
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
2/20
प्रश्न २ रा- उद्योगी माणूस समाधानी असतो. दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह आलेले आहे?
1) स्वल्पविराम
२) अल्पविराम
३) पूर्णविराम
४) प्रश्नचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
3/20
प्रश्न ३ रा- वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्हे वापरतात?
१) स्वल्पविराम
२) अर्धविराम
३) अपूर्णविराम
४) अवतरण चिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
4/20
प्रश्न ४ था- दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययानी जोडली जातात अशा वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरतात?
1) अर्धविराम (;)
2) स्वल्पविराम (,)
३) पूर्ण विराम (.)
४) दुहेरी अवतरण चिन्ह ("--")
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
5/20
प्रश्न ५ वा- पुढील विरामचिन्ह केव्हा वापरतात? (,)
१) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास
२) उत्कट भावना व्यक्त करताना
३) विधान पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी
४) बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखविण्यासाठी
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
6/20
प्रश्न ६ वा- संगणक आहे परंतु (;)आंतरजाल जोडणी नाही. वरील वाक्यातील कंसातील विरामचिन्हाचा पर्याय निवडा.
१) अर्धविराम
२) पूर्णविराम
३) प्रश्नचिन्ह
४) अपसारणचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
7/20
प्रश्न ७ वा- खालील विरामचिन्हापैकी अपसारण विरामचिन्ह असलेला पर्याय निवडा.
१) :
2) ;
3) –
4) !
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
8/20
प्रश्न ८ वा- दोन शब्द जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात?
1) उद्गारचिन्ह
२) प्रश्नचिन्ह
३) अपसारण चिन्ह
४) संयोगचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
9/20
प्रश्न ९ वा- शब्दाचा संक्षेप्त दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात?
1) अपसारणचिन्ह
२) अर्धविराम
३) पूर्णविराम
४) अपूर्णविराम
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
10/20
प्रश्न १० वा- खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह दिलेले नाही ते शोधा व खालील पर्याय निवडा. तिने शर्यत जिंकली पण बक्षीस मिळाले नाही.
१) उद्गारचिन्ह
२) अवतरणचिन्ह
३) अर्धविराम
४) स्वल्पविराम
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
11/20
प्रश्न ११ वा- पुढील वाक्यात कोणती विरामचिन्हे येतात? वडील म्हणाले रामायण कोणी लिहले आहे का तुला ठाऊक
१) स्वल्पविराम, दुहेरी अवतरण, अर्धविराम व प्रश्नचिन्ह
२) स्वल्पविराम, एकेरी अवतरण, अर्धविराम व प्रश्नचिन्ह
३) स्वल्पविराम, दुहेरी अवतरण, प्रश्नचिन्ह
४) वरील सर्वच बरोबर
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
12/20
प्रश्न १२ वा- संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
१) अर्धविराम
२) स्वल्पविराम
३) अपूर्णविराम
४) अपसारणचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
13/20
प्रश्न १३ वा- योग्य विरामचिन्ह वापरलेला पर्याय शोधा.
१) माणूस म्हणाला. ही गाय माझीच आहे.
२) माणूस म्हणाला, “ही गाय माझीच आहे?”
3) माणूस म्हणाला, “ही गाय माझीच आहे.?”
4) माणूस म्हणाला; ही गाय माझीच आहे.
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
14/20
प्रश्न १४ वा- ओहो---- किती उंच इमारत आहे. या वाक्यात रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येईल?
१) पूर्णविराम
२) उद्गारवाचक चिन्ह
३) अर्धविराम चिन्ह
४) प्रश्नार्थक चिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
15/20
प्रश्न १५ वा- पुढील वाक्यात किती वेळा विरामचिन्ह द्यावे लागेल? सूर्यफूल सोयाबीन करडई जवस शेंगदाणा ही गळिताची धान्ये आहेत.
१) तीन वेळा
२) चार वेळा
३) पाच वेळा
४) सहा वेळा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
16/20
प्रश्न १६ वा- ‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
1) संयोगचिन्ह
२) अपसारणचिन्ह
३) स्वल्पविराम
४) अपूर्णविराम
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक २
17/20
प्रश्न १७ वा- ‘अपूर्णविरामास’ लागू पडणारे विधान कोणते ते ओळखा.
१) दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडण्यापूर्वी हे विरामचिन्ह वापरतात
२) दोन शब्द जोडताना हे विरामचिन्ह वापरतात.
३) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास
४) यापैकी नाही.
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
18/20
प्रश्न १८ वा- आमच्या शाळेत गुलाब जाई जुई शेवंती मोगरा चाफा आणि जास्वंदीची फुलझाडे आहेत. या वाक्यात किती वेळा स्वल्पविराम येईल?
१) पाच वेळा
२) सहा वेळा
३) तीन वेळा
४) दोन वेळा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
19/20
प्रश्न १९ वा- “किती फसव्या वाटा आहेत या” या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल?
1) प्रश्नचिन्ह
२) उद्गार चिन्ह
३) पूर्णविराम
४) अर्धविरामचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
20/20
प्रश्न २० वा- खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह पुन्हा पुन्हा आले आहे? -संजू, रंजिता, गौरी, शिवाय, सचिन तुम्ही आमच्या गटात आहात.
1) स्वल्पविराम
२) उद्गार चिन्ह
३) पूर्णविराम
४) अर्धविरामचिन्ह
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
Result:
अ.क्र विषय लिक
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका १ सोडवा
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका २ सोडवा
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका ३ सोडवा