कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या घटकावर प्रश्न विचारलेले असतात.  scholarship exam class 8 question paper सोडवून सराव करण्यासाठी आपणास उपयुक्त ठरतील असे सराव पेपर मी देत आहे.  शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर आधारीत कांही सराव प्रश्न आपण सोडवू शकता.  शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी  यावरील प्रश्न सोडवल्यानंतर आपणास सर्वात शेवटी आपला निकाल पाहता येईल. आपणास हे पेपर कसे वाटतात ते आवश्य कळवा. 

कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

नाम म्हणजे काय-

एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात.

सर्वनाम म्हणजे काय-

व्याख्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात.

विशेषण म्हणजे काय

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगला मुलगा, काळा बैल, पाच मणी वगैरे.

विशेषण म्हणजे काय –

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे.

कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 


1/15
प्रश्न 1 ते 3-साठी पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचा पर्याय निवडा. हे फळ खूप गोड आहे.
1) गोड
2) खूप
3) आहे
4) फळ 
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात उत्तर- पर्याय क्रमांक 4
2/15
पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचा पर्याय निवडा. 'अचानक जोराचा पाऊस सुरू झाला.
1) सुरू
2) पाऊस
3) अचानक
4) जोराचा
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात उत्तर- पर्याय क्रमांक 2
3/15
पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाचा पर्याय निवडा. किती सुंदर आहे ते दृश्य!
1) दृश्य
2) ते
3) सुंदर
4) किती
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात. उत्तर- पर्याय क्रमांक 1
4/15
खालील गटात नाम असलेला पर्याय शोधा.
1) समई
2) आणली
3) त्याने
4) स्वच्छ
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात.गटात नाम असलेला पर्याय समई उत्तर- पर्याय क्रमांक 1
5/15
खालील गटात नाम असलेला पर्याय शोधा.
1) पाय 
2) तो
3) पडला
4) घसरून
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात.गटात नाम असलेला पर्याय पाय उत्तर- पर्याय क्रमांक 1
6/15
खालील गटात नाम असलेला पर्याय शोधा.
1) कडेला
2) उग्र
3) हरवला
4) चेंडू
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात.गटात नाम असलेला पर्याय चेंडू उत्तर- पर्याय क्रमांक 4
7/15
ढील वाक्यातील सर्वनाम ओळखा व त्याचा योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. प्र. 7. नियमित अभ्यास करील त्याला मोठे बक्षीस मिळेल.
1) करील
2) मोठे
3) त्याला
4) अभ्यास
Explanation: व्याख्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वरील वाक्यात नामाऐवजी त्याला हा शब्द वापरला आहे. उत्तर- पर्याय क्रमांक 3
8/15
पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा व त्याचा योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा.आपण ईसाकच्या घरी खेळायला जाऊ.
1) खेळायला
2) घरी
3) जाऊ
4) आपण
Explanation: व्याख्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वरील वाक्यात नामाऐवजी आपण हा शब्द वापरला आहे. उत्तर- पर्याय क्रमांक 4
9/15
पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा व त्याचा योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा.त्याने घरातील सर्व सफाई केली.
1) सर्व
2) घरातील
3) त्याने
4) सफाई
Explanation: व्याख्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वरील वाक्यात नामाऐवजी त्याने हा शब्द वापरला आहे. उत्तर: पर्याय क्र. 3
10/15
पुढील वाक्यात गाळलेल्या जागी योग्य सर्वनाम निवडा............काल आजोबांबरोबर फिरायला गेलो होतो.
1) तू
2) तुम्ही
3) आम्ही
4) मला
Explanation: नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वरील वाक्यात आम्ही काल आजोबांबरोबर फिरायला गेलो होतो. उत्तर: पर्याय क्र. 3
11/15
पुढील वाक्यात गाळलेल्या जागी योग्य सर्वनाम निवडा.थंडीने..........कुडकुडत होता.
1) त्याला
2) तो
3) त्यांनी
4) मला
Explanation: नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वरील वाक्यात थंडीने तो कुडकुडत होता. उत्तर: पर्याय क्र. 2
12/15
पुढील वाक्यात गाळलेल्या जागी योग्य सर्वनाम निवडा. अचानक आवाज आला, 'बाळ.......लागलं का रे?'
1) तुला
2) तू
3) मी
4) आम्ही
Explanation: नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. वरील वाक्यात अचानक आवाज आला, 'बाळतुला लागलं का रे?' उत्तर: पर्याय क्र. 1
13/15
खालील वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचा गोल निवडा. सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते.
1) दिवशी
2) छान-छान
3) कपड़े
4) घातले
Explanation: नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. उत्तर: पर्याय क्र. 2
14/15
खालील वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचा गोल निवडा. बिचारे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते.
1) पाणी
2) तळमळत
3) होते
4) बिचारे
Explanation: नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. उत्तर: पर्याय क्र. 4
15/15
खालील वाक्यातील विशेषण ओळखून योग्य पर्याय क्रमांकाचा गोल निवडा. मला गोष्टीची पुस्तके वाचायला आवडतात.
1) मला
2) आवडतात
3) गोष्टींची
4) पुस्तके
Explanation: नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. उत्तर: पर्याय क्र. 3
Result:
@@@@@


अ.क्रविषयलिक
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका १सोडवा
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका २सोडवा
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका ३सोडवा



आपणास हे ही आवडेल