कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या घटकावर प्रश्न विचारलेले असतात. scholarship exam class 8 question paper सोडवून सराव करण्यासाठी आपणास उपयुक्त ठरतील असे सराव पेपर मी देत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर आधारीत कांही सराव प्रश्न आपण सोडवू शकता. शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी यावरील प्रश्न सोडवल्यानंतर आपणास सर्वात शेवटी आपला निकाल पाहता येईल. आपणास हे पेपर कसे वाटतात ते आवश्य कळवा.
नाम म्हणजे काय-
एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात.
सर्वनाम म्हणजे काय-
व्याख्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात.
विशेषण म्हणजे काय
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगला मुलगा, काळा बैल, पाच मणी वगैरे.
विशेषण म्हणजे काय –
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे.
कार्यात्मक व्याकरण शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
1/15
नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा. ..........वारा
1) मुसळधार
2) सोसाट्याचा
3) धो-धो
4) लखलखीत
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 2
2/15
नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा. .........गाणे
1) सळसळती
2) आवडले
3) शूर
4) सुरेल
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 4
3/15
नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा. ........भाजी
1) स्वस्त
2) हसरी
3) पेटती
4) पडका
Explanation: उत्तर: पर्याय क्र. 1
4/15
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा व योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा.बोलका शाम आज गप्प होता.
1) बोलका
2) होता
3) गप्प
4) शाम
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख्य असतो वाक्यामध्ये क्रियापदं नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही. उत्तर: पर्याय क्र. 2
5/15
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा व योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. दिनूला तुम्ही कुठं पाहिलं का रे?
1) रे
2) कुठं
3) तुम्ही
4) पाहिलं
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख्य असतो वाक्यामध्ये क्रियापदं नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही. उत्तर: पर्याय क्र. 4
6/15
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा व योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. लताला छान गाणे गाता येते.
1) येते
2) गाणे
3) लताला
4) छान
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख्य असतो वाक्यामध्ये क्रियापदं नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही. उत्तर: पर्याय क्र. 1
7/15
खालील वाक्यांना योग्य क्रियापदाची निवड करा. त्याला राजाचा आश्रय..........
1) केला
2) मिळाला
3) नांदवला
4) काढला
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख्य असतो वाक्यामध्ये क्रियापदं नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही. उत्तर: पर्याय क्र. 2
8/15
खालील वाक्यांना योग्य क्रियापदाची निवड करा. राहूल एकटाच जड पावलांनी घरी यायला .........
1) गेला
2) जातो
3) चालला
4) निघाला
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख्य असतो वाक्यामध्ये क्रियापदं नसेल तर ते वाक्य अर्थपूर्ण होत नाही. उत्तर: पर्याय क्र. 4
9/15
खालील वाक्यांना योग्य क्रियापदाची निवड करा. सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या ...........
1) टाकल्या
2) कडाडल्या
3) वाजवल्या
4) आणल्या
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उत्तर: पर्याय क्र. 3
10/15
खालील वाक्यांना योग्य क्रियापदाची निवड करा. प्रत्येकाने गरजूंना यथाशक्ती मदत.......
1) करतात
2) करत असतात
3) करतो
4) करावी
Explanation: वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उत्तर: पर्याय क्र. 4
11/15
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा विदुषकाने (सुंदर) काम केले.
1) नाम
2) क्रियापद
3) सर्वनाम
4) विशेषण
Explanation: नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. उत्तर: पर्याय क्र. 4
12/15
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा (वेलीला) भारी वाईट वाटले
1) विशेषण
2) नाम
3) सर्वनाम
4) क्रियापद
Explanation: एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात. डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या आणि गुणांच्या नावांनासुद्धा नाम असे म्हणतात. उत्तर: पर्याय क्र. 2
13/15
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा वाघोबांनी (भयंकर) डरकाळी फोडली.
1) विशेषण
2) क्रियापद
3) सर्वनाम
4) नाम
Explanation: नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. उत्तर: पर्याय क्र. 1
14/15
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा (त्यांनी) माझ्याकडून त्या पत्राचे उत्तर लिहून घेतले,
1) क्रियापद
2) नाम
3) सर्वनाम
4) विशेषण
Explanation: नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. उत्तर: पर्याय क्र. 3
15/15
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा तिकडे (आम्ही) वेळेवर पोहोचलो.
1) नाम
2) विशेषण
3) क्रियापद
4) सर्वनाम
Explanation: नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला 'सर्वनाम' असे म्हणतात. उत्तर: पर्याय क्र. 4
@@@@@@
अ.क्र | विषय | लिक |
---|
१ | शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका १ | सोडवा |
२ | शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका २ | सोडवा |
३ | शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका ३ | सोडवा |
1 Comments
Mayuri madhav Dhakarge
ReplyDelete