scholarship exam class 8 question paper शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी घटक शब्दसंपत्ती समानार्थी शब्द

scholarship exam class 8 question paper सोडवून सराव करण्यासाठी आपणास उपयुक्त ठरतील असे सराव पेपर मी देत आहे.  शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी घटक शब्दसंपत्ती समानार्थी शब्द यावर आधारीत कांही सराव प्रश्न आपण सोडवू शकता.  शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी घटक शब्दसंपत्ती समानार्थी शब्द यावरील प्रश्न सोडवल्यानंतर आपणास सर्वात शेवटी आपला निकाल पाहता येईल. आपणास हे पेपर कसे वाटतात ते आवश्य कळवा. 

scholarship exam class 8 question paper  शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी घटक शब्दसंपत्ती समानार्थी शब्द

शिष्यवृत्ती परीक्षा ८ वी घटक शब्दसंपत्ती समानार्थी शब्द





1/15
'वनिता' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
1) स्वामिनी
2) कामिनी
3) मानिनी
4) यामिनी
Explanation: स्पष्टीकरण : वनिता या शब्दाला, महिला, स्त्री, नारी, ललना, कामिनी हे समानार्थी शब्द आहेत. उत्तर: पर्याय क्र. 2
2/15
खालील पर्यायातील 'नृप' या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता ?
1) नरेश
2) भूपाळ
3) महिपती
4) महेश
Explanation: स्पष्टीकरण :'नृप' या शब्दासाठी- राजा, भूपती, भूपाळ, नरेश, महिपती हे समानार्थी शब्द आहेत. महेश या शब्दाचा समानार्थी शब्द शंकर आहे. उत्तर : पर्याय क्र. 4
3/15
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. मालकाने नोकरावर (भरवसा) ठेवून आज दिवसभर दुकानाचा कारभार त्याच्यावर सोपविला.
1) कवडसा
2) विश्वास
3) मनसुबा
4) लालसा
Explanation: स्पष्टीकरण: भरवसा या शब्दाला विश्वास व खात्री हे समानार्थी शब्द आहेत. उत्तर : पर्याय क्र. 2
4/15
4. पुढील पर्यायातील समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळख.
1) वर्षा -पाऊस
2) सीमा -शीव
3) तृषा-लालसा
4) कस्तुरी-संकोच
Explanation: स्पष्टीकरण: वर्षा-पाऊस, तृषा-लालसा, सीमा शीव हे समानार्थी शब्द आहेत. परंतु कस्तुरी या शब्दाला अबीर हा समानार्थी शब्द आहे. उत्तर : पर्याय क्र. 4
5/15
'अद्री' या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायांतून निवडा ?
1) पृथ्वी
2) गिरीधर
3) शहर
4) पर्वत
Explanation: स्पष्टीकरण :अद्री या शब्दाला नग, गिरी, अचल, शैल, पर्वत हे समानार्थी शब्द आहे. उत्तर: पर्याय क्र. 4
6/15
'डोळा' या शब्दाचा 'प्रतिशब्द' खालील पर्यायातून ओळखा?
1) अप्रुप
2) तडाग
3) चक्षु
4) पर्ण
Explanation: स्पष्टीकरण :अप्रुप -विशेष प्रकारचे, तडाग- तलाव, पर्ण- पान, चक्षु- डोळा. उत्तर: पर्याय क्र. 3
7/15
खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा,
1) पत्र
2) पल्लव
3) पल्लवी
4) पर्ण
Explanation: स्पष्टीकरण :वरील पर्यायापैकी पत्र, पल्लव व पर्ण हे तीन पर्याय पान या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. उत्तर पर्याय क्र. 3
8/15
खालील पर्यायातील 'अगाध' या शब्दासाठी समानार्थी असलेल्या शब्दाचा पर्याय निवडा
1) ज्येष्ठ
2) श्रेष्ठ
3) अमर्याद
4) अवेळी
Explanation: स्पष्टीकरण: ज्येष्ठ -मोठा, श्रेष्ठ-अग्रगण्य, अवेळी -अचानक 'अगाध' या शब्दाला पर्याय क्र. ३ मधील 'अमर्याद -हा समानार्थी शब्द आहे. उत्तर पर्याय क्र. 3
9/15
'हात' या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय समानार्थी आहेत?
1) पाणि
2) व्रण
3) दिनकर
4) कर्ण
Explanation: स्पष्टीकरण :'हात' या शब्दासाठी हस्त, कर पाणि, भुजा, बाहू हे समानार्थी शब्द आहेत. व्रण= इजा आणि दिनकर =सूर्य. उत्तर : पर्याय क्र. 1
10/15
पुढील पर्यायातील 'हरिण' या शब्दासाठी समानार्थी असलेला पर्याय कोणता ?
1) कुंजर
2) कुरंन
3) सारंग
4) गज
Explanation: स्पष्टीकरण: हरिण या शब्दाला मृग, सारंग व कुरंग हे समानार्थी शब्द आहेत. तर कुंज आणि गज हे शब्द हत्तीसाठी समानार्थी शब्द वापरले जातात. उत्तर: पर्याय क्र. 3
11/15
दिलेल्या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. सहोदर :
1) उदर
2) भर्ता
3) भ्राता 
4) अमर
Explanation: स्पष्टीकरण: सहोदर या शब्दाचा समानार्थी शब्द भ्राता हा आहे म्हणून पर्याय क्रमांक ३
12/15
खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा.
1) पट -अंबर
2) अली- मधुप
3) अन-घन
4) खुबी-नक्षी
Explanation: स्पष्टीकरण: वरीलपैकी विसंगत जोडी आहे 4) खुबी-नक्षी उत्तर पर्याय क्रमांक ४
13/15
खालीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी ओळखा.
1) बहिष्कार= सहकार
2) मानस =मन
3) मुभा= लाभ
4) रोष=गर्व
Explanation: स्पष्टीकरण - वरीलपेकी केवळ मानस-मन ही एकच जोडी बरोबर आहे इतर पर्याय चूक आहेत म्हणून उत्तर -पर्याय क्रमांक २
14/15
गटात बसणारा शब्द ओळखा. गहन, अगाध, अमर्याद-
1) ढग
2) अप्रूप
3) ईश
4) अगम्य
Explanation: स्पष्टीकरण - वरील गहन, अगाध, अमर्याद- या गटात बसणारा शब्द म्हणजे अगम्य उत्तर पर्याय क्रमांक 4
15/15
खाली दिलेल्या वाक्यातील एका शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून निवडा. "माधुरीच्या आईला मुलीच्या लग्नाची काळजी लागली.
1) दुहिता
2) जनक
3) तिमीर
4) समारंभ
Explanation: स्पष्टीकरण - या वाक्यातील माधुरीच्या आईला मुलीच्या लग्नाची काळजी लागली. एका शब्दाचा समानार्थी शब्द दुहिता उत्तर - पर्याय क्रमांक १
Result:
@@@@@@@

अ.क्रविषयलिक
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका १सोडवा
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका २सोडवा
शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका ३सोडवा


आपणास हे ही आवडेल