कोणतीही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सरावाची आवश्यकता असते. असा सराव केल्यानंतरच आपणास यश संपादन होत असते. आपण नेहमी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिकाशिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संग्रह , ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा – सराव प्रश्नपत्रिका संच शोधत असता यावर आधारीत सराव प्रश्नपत्रिका सोडवा.



5th 8th class Scholarship exam practice Paper| 5 वी 8 वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका विषय मराठी घटक - वाक्य व वाक्याचे प्रकार


शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 
विषयः- मराठी  घटक- कार्यात्मक व्याकरण
उपघटक- वाक्याचे प्रकार 

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी  एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.
केवल वाक्य - ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात 
 उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला. वरील वाक्यात एकेकच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी' ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.

 मिश्र वाक्य-  एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात. उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे. 

संयुक्त वाक्य-  दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदा- आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो.

वाक्यसंश्लेषण (वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.

1➤ प्रश्न १ ला –ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्यास ------ असे म्हणतात ?

2➤ प्रश्न २ रा –ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यास ------- असे म्हणतात ?

3➤ प्रश्न ३ रा –वाक्यातील विधान जर होकारार्थी असेल तर त्या वाक्यास काय म्हणतात ?

4➤ प्रश्न ४ था– शकुनी मामाचा अभिनय वाखाणण्यासारखाआहे. या वाक्याचा प्रकार ओळखा?

5➤ प्रश्न ५ वा –खालीलपैकी नकारार्थी वाक्य ओळखा?

6➤ प्रश्न ६ वा- खालीलपैकी संयुक्त वाक्य कोणते?

7➤ प्रश्न ७ वा – खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते?

8➤ प्रश्न ८ वा –संयुक्त वाक्याचे वैशिष्ट्ये कोणते?

9➤ प्रश्न ९ वा-‘लहानांनीथोरांचा आदर करावा.’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

10➤ प्रश्न १० वा- विधानार्थी वाक्याचा पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

11➤ प्रश्न ११ वा- पुढीलपैकी संयुक्त वाक्य कोणते ते ओळखा ?

12➤ प्रश्न १२ वा- खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ?

13➤ प्रश्न १३ वा-‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्वराज्य निर्माण केले.’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

14➤ प्रश्न १४ वा- पुढीलपैकी मिश्र वाक्य नसलेला पर्याय कोणता ?

15➤ प्रश्न १५ वा- ‘मी देशाची पंतप्रधान झाली तर!’ या वाक्याचा प्रकार कोणता?

16➤ प्रश्न १६ वा- ‘त्याने चोरी केली म्हणून पोलीसाने त्यास पकडले.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

17➤ प्रश्न १७ वा- पुढीलपैकी केवल वाक्य कोणते?

18➤ प्रश्न १८ वा- पुढील वाक्याचा प्रकार कोणता? ‘तुम्हाला संपत्ती हवी ;की सुख हवे’?

19➤ प्रश्न १९ वा- पुढे दिलेल्या पर्यायातून मिश्र वाक्याचा पर्याय शोधा.

20➤ प्रश्न २० वा- खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘प्रथम क्रमांक यावा यास्तव त्याने खूप अभ्यास केला.’

21➤ प्रश्न २१ वा- पुढीलपैकी होकारार्थी वाक्य कोणते?

22➤ प्रश्न २२ वा- खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते ?

23➤ प्रश्न २३ वा- पुढीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

24➤ प्रश्न २४ वा- करूणरूपी वाक्य म्हणजे काय?

25➤ प्रश्न २५ वा- ज्या वाक्यात एकच उद्देशव एकच विधेय असते त्या वाक्याला -------- असे म्हणतात.

Your score is