Scholarship exam questions and answers इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका 

विषयः- मराठी

शिष्यवृत्ती सराव प्रश्नत्रिका विषयः- मराठी घटक- आकलन उपघटक- सुसंगत वाक्याचा परिच्छेद

आपण सतत scholarship question paper 2021 pdf, 5th scholarship question paper 2021 pdf download, 5th  scholarship question paper 2021 pdf answer key,  इयत्ता पाचवी इंग्रजी पेपर, इयत्ता आठवी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका 2020, 5वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम, इयत्ता पाचवी स्कॉलरशिप 2021, इयत्ता आठवी स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका 2021, स्कॉलरशिप सराव प्रश्नपत्रिका व उत्तर याविषयी शोधत असता. शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये यश संपादन करावयाचे असेल तर अधिकाधिक सराव आवश्यक असतो. 

अधिक सरावासाठी आपणास अधिक scholarship question paper ची व घटकावर आधारीत परिक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची माहिती असावी लागते. scholarship question paper मध्ये कोणत्या घटकावर कसे व किती गुणाचे प्रश्न विचारले जातात. scholarship question paper मधील प्रश्नांचे स्वरूप कसे असते. ते प्रश्न कसे सोडवावीत याविषयीची आपणास कल्पना असायला हवी तरच आफण अशा प्रश्नांचा, घटकांचा सराव करून अधिकाधिक गुण मिळवू शकतो. scholarship question paper यासाठी आपणास सरावासाठी व अभ्यासात मदत व्हावी या उद्देशाने मी प्रत्येक घटकावर आधारीत सराव प्रश्नपत्रिका देत आहे. आशा करतो आपणास त्यांची नक्की मदत होईल.

सर्व प्रश्न सोडवल्यानंतर SUbmit बटणवर क्लिक करून आपले मार्कस पहा. 


 खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा. 

 

जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आज इथे शाळा तर उदया तिथे. तिने चंग बांधला. काही झालं तरी मुलांना शिकवायचं. तिने तडक शहर गाठलं. शहरात झोपडीवजा घर बांधले. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास घेतला. धुण्या-भांड्यांची कामे मिळवली. थोडी स्थिरावल्यावर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश घेतला.इंदूने हलाखीच्या परिस्थितीत घरकामांबरोबर कधी कधी, केळी विकून मुलांच्या फी चा प्रश्न सोडवला. पण कधी कुणापुढे हात पसरला नाही.मुलांनाही आईची धडपड दिसत होती. त्यांनीही मन लावून अभ्यास केला.आज इंदूची दोन मुलं उच्चशिक्षण घेत आहेत तर छोटा शालेय शिक्षणाबरोबर कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे. त्यांच्यासाठी पावशेर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाऱ्या आईचं मुलांच्या प्रगतीत मोठे योगदान आहे.

1/15
प्रश्न १ ला उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा. अ) इंदूने कोणता चंग बांधला ?
शहर गाठण्याचा
कामे मिळविण्याचा
मुलांना शिकविण्याचा
शहरात घर बांधण्याचा
Explanation: अ) इंदूने कोणता चंग बांधला ? मुलांना शिकविण्याचा
2/15
प्रश्न २ रा उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा. आ) इंंदूला एकूण किती मुले आहेत?
Explanation: आ) इंंदूला एकूण किती मुले आहेत? ३
3/15
प्रश्न ३ रा उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचा योग्य पर्याय निवडा. आ) 'हात पसरणे' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता ?
मदत करणे
सहाय्य करणे
व्यायम करणे
ओंजळ करणे
Explanation: आ) 'हात पसरणे' या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ कोणता ? मदत करणे
4/15
प्रश्न ४ था पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाची निवड करा. हे फळ खूप गोड आहे.
गोड
खूप
आहे
फळ
Explanation: पुढील वाक्यातील नाम ओळखा व योग्य पर्याय क्रमांकाची निवड करा. हे फळ खूप गोड आहे. फळ
5/15
प्रश्न ५ वा गटात न बसणारा शब्द ओळखा. १) राजा २) सिंह ३) घर ४) कोल्हा
राजा
सिंह
घर
कोल्हा
Explanation: घर - बाकी सर्व प्राणी आहेत.
6/15
प्रश्न ६ वा खालील नामाचे अचूक अनेक वचन निवडा. घर
घरी
घरात
घरे
घरून
Explanation: घरे
7/15
प्रश्न ७ वा खालील वाक्याचा काळ ओळखा वा! काय छान गाणे म्हटलेस तू!
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
साधाकाळ
Explanation: भूतकाळ
8/15
प्रश्न ८ वा खालील वाक्याचा काळ ओळखा. बाबा पोथी वाचत आहेत.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
साधाकाळ
Explanation: वर्तमान काळ
9/15
प्रश्न ९ वा पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल
.
;
!
?
Explanation: . - पूर्णविराम
10/15
प्रश्न १० वा चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखा.
मला गाणे आवडते.
ती काय करते.
गौरी छान गाते.
त्याने भाषण दिले.
Explanation: ती काय करते.
11/15
प्रश्न ११ वा खालील वाक्यातील उद्देश ओळखा. मधुराने रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली.
मधुराने
रसाळ
रसाळ जांभळे
खाल्ली
Explanation: मधुराने
12/15
प्रश्न १२ वा पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.
सौसार
सन्सार
सऊसार
संसार
Explanation: संसार
13/15
प्रश्न १३ वा खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कोणत्या वाक्प्रचाराचा वापर कराल. होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी शाळेला-----
हात चालवणे
हात दाखविणे
हात देणे
हात मारणे
Explanation: हात देणे
14/15
प्रश्न १४ वा पुढील म्हणींचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. बैल गेला अन् झोपा केला.
बैल मेल्यावर त्यासाठी निवारा करणे.
एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर वाईट वाटणे.
एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर आनंद वाटणे.
एखादी गोष्ट घडून गेल्यावर उपाय योजना करणे.
Explanation: एखादी गोष्ट घडून गेल्यावर उपाय योजना करणे.
15/15
प्रश्न १५ वा योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा. पाय घसरून पडल्याने सचिनचा पाय -------
मोडणे
मोडला
मोडतात
मोडेल
Explanation: मोडला
Result: