भाषेला ज्याच्या-ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे  अलंकार असे म्हणतात.

कधी दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर कधी विरोध दाखवून, कधी नाद निर्माण करणारे शब्द वापरून, तर कधी एखादी कल्पना वाजवीपेक्षा  अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.

भाषेचे सौंदर्य ज्यामुळे खुलते, ज्यामुळे भाषेची शोभा वाढते, तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त होणारा आशयार्थ अधिक प्रभावी होतो अशा चित्तवेधक शब्दरचनेला अलंकार असे म्हणतात. 

अलंकार उदाहरण -

माणसांच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असते ही साधी कल्पना कवीने चमत्कारीक पध्दतीने अलंकाराच्या मदतीने  मांडली आहे.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे |

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे ||

वरील ओळी आपण पाहिल्या वरील ओळीत कवीने माणसाच्या  आयूष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना सुध्दा किती मोहक व अर्थपूर्ण झाली आहे.

अलंकार म्हणजे कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा होय. मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.

अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत: १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दांच्या बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.

 

मराठी अलंकार शब्दालंकार व अर्थालंकार

१) उपमा:- दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन
केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.”
 
दोन वस्तूंतील साम्य दाखवण्यासाठी सम,समान,परी,परीस सारख्या शब्दांचा वापरा केल्यास उपमा अलंकार होतो.

२) उत्प्रेक्षा:- उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की)

३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे)उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ‘अपन्हुती‘ हा अलंकार
होतो.”
 

४) रूपक:-   उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

५) अतिशयोक्ती:- अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. 

६) दृष्टान्त:- एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.

उदा:
लहानपण दे गा देवा,
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर,
त्यासी अंकुशाचा मार

७) अनुप्रास:- एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होतेतेव्हा अनुप्रास
अलंकार होतो.

उदा:
गडद निळे गडद निळे

जलद भरुनि आले 

शितलतनु चपलचरण

अनिलगण निघाले

८) चेतनगुणोक्ती:-  “जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन
(सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे
माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा ‘चेतनगुणोक्ती‘ हा अलंकार होतो.”

 ९) श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा
शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

Feq-

मराठी अलंकार किती आहेत?

अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत: १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार. यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत.


उपमेय आणि उपमान म्हणजे काय?

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात 'उपमेय' असे म्हणतात. 'मुख कमलासारखे सुंदर आहे' या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून 'मुख' हे 'उपमेय' आहे. उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला 'उपमान' असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून 'कमल' हे तेथे 'उपमान' आहे.


उपमा व उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय उदाहरणासह स्पष्ट करा?

उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्‍न असतो. उदा० ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.

यमक अलंकार म्हणजे काय ?


खालील चाचणी सोडवा सर्व प्रश्न सोडवल्यानंतर Submit बटणवर क्लिक करून आपले गुण पहा. 



1/20
प्रश्न १ ला – पुढीलपैकी शब्दालंकार कोणता ?
१) उपमा अलंकार
२) दृष्टांत अलंकार
३) उत्प्रेक्षा अलंकार
४) यमक अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
2/20
प्रश्न २ रा- आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे ! या ओळीतील अलंकार कोणता?
१) चेतनागुणोक्ती अलंकार
२) यमक अलंकार
३) उपमा अलंकार
४) उत्प्रेक्षा अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
3/20
प्रश्न ३ रा- उपमेय हे जणू उपमानच आहे . असे जेथे वर्णिलेले असते तेथे---- हा अलंकार होतो.
१) उत्प्रेक्षा अलंकार
२) उपमा अलंकार
३) यमक अलंकार
४) अनुप्रास अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
4/20
प्रश्न ४ था- कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास ------ हा अलंकार होतो.
१) श्लेष अलंकार
२) यमक अलंकार
३) उत्प्रेक्षा अलंकार
४) उपमा अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
5/20
प्रश्न ५ वा- ही आजते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा | याद्यरचनेत पुढीलपैकी कोणता अलंकार आहे?
१) अनुप्रास अलंकार
१) अनुप्रास अलंकार
३) उपमा अलंकार
४) उत्प्रेक्षा अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
6/20
प्रश्न ६ वा- पुढीलपैकी कोणत्या अलंकार प्रकारात ‘सारखा, जसा, जेवि, सम, गत, परी, समान’ यासारखे साम्यदर्शक शब्द आलेले असतात?
१) उत्प्रेक्षा अलंकार
२) यमक अलंकार
३) दृष्टांत अलंकार
४) उपमा अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 4
7/20
प्रश्न ७ वा- अलंकाराचे प्रमुख प्रकार किती ?
1) २
२) ३
३) ४
४) ५
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
8/20
प्रश्न ८ वा- पुढीलपैकी उत्प्रेक्षा अलंकाराचे उदाहरण कोणते ?
1) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.
२) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
३) हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.
४) आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी.
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
9/20
प्रश्न ९ वा- ‘ मुंबईचे घरे मात्र कबुतराच्या खुराड्यांसारखी ’ या वाक्यरचनेत कोणता अलंकार दिसून येतो ?
१) यमक अलंकार
२) उपमा अलंकार
३) उत्प्रेक्षा अलंकार
४) दृष्टांत अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
10/20
प्रश्न १० वा- ‘ अकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण ’ या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ?
१) यमक अलंकार
२) उपमा अलंकार
३) उत्प्रेक्षा अलंकार
४) दृष्टांत अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
11/20
प्रश्न ११ वा- ‘ मुखकमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यातील उपमान ओळखा.
१) कमल
२) मुख
३) सुंदर
४) आहे
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
12/20
प्रश्न १२ वा- त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. वरील उदाहरणातील उपमेय ओळखा.
१) अक्षर
२) मोती
३) त्याचे
४) सुंदर
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 1
13/20
प्रश्न १३ वा- ‘ विद्या हे पुरूषास रूप बनावे, की झाकले द्रव्यही ‘ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे?
१) यमक
२) उत्प्रेक्षा
३) उपमा
४) चेतनागुणोक्ती
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 2
14/20
प्रश्न १४ वा- खालीलपैकी कोणते उदाहरण यमक अलंकाराचे आहे?
१) असेल तेथे वहात सुंदर दुधासारखी नदी|
२) हा आंबा जणू साखरच.
३) मना सज्जना भक्तिपंथेची जावे| तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे||
4) विद्या हे पुरूषास रूप बनावे, की झाकले द्रव्यही
Explanation: उत्तर- पर्याय क्रमांक 3
15/20
प्रश्न १५ वा- दावी न गर्व, गुण पराचे| खडाग्रास – तुल्य विषयम-व्रत भल्याचे || वरील काव्य पंक्तीमध्ये कोणता अलंकार साधलेला आहे?
१) स्वभावोक्ती
२) यमक
३) उपमा
४) उत्प्रेक्षा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमाक 3
16/20
प्रश्न १६ वा- खालील ओळीतील अलंकार ओळखा - लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार
१) स्वभावोक्ती
२) यमक
३) दृष्टान्त
४) उत्प्रेक्षा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमाक 3
17/20
प्रश्न १७ वा- खालील ओळीतील अलंकार ओळखा - गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले
१) स्वभावोक्ती
२) अनुप्रास
३) दृष्टान्त
४) उत्प्रेक्षा
Explanation: उत्तर- पर्याय क्रमाक २
18/20
प्रश्न १८ वा उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन आलेले असते तेंव्हा ............. अलंकार होतो.
१) रूपक अलंकार
२) उपमा अलंकार
३) उत्प्रेक्षा अलंकार
४) अनुप्रास अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमाक ३
19/20
प्रश्न १९ वा - अलंकार ओळखा - आभाळागत माया तुझी, आम्हांवरी राहू दे !
१) उपमा अलंकार
२) उत्प्रेक्षा अलंकार
३) अतिशयोक्ती अलंकार
४) दृष्टांत अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमाक १
20/20
प्रश्न २० वा - अलंकार ओळखा सदा सर्वदा योग तुझा घडावा I तुझे कारनी देह माझा पडावा II
१) दृष्टांत अलंकार
२) श्लेष अलंकार
३) अनुप्रास अलंकार
४) चेतनागुणोक्ती अलंकार
Explanation: उत्तर- पर्याय क्रमाक ४
Result: