मराठी म्हणी व त्यांचे अर्थ Marathi Mahani tyache Arth
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ Marathi Mahani tyache Arth आपणास विविध परीक्षेत विचारले जातात. काही म्हत्वाचे मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आपणासाठी दिले आहेत. ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. अशा विविध म्हणी मराठी भाषेत प्चलित आङेत. मराठी म्हणी व त्यांचे अर्थ Marathi Mahani tyache Arth आपणास माहिती असणे खूप आश्यक आहे. भाषा विषयात म्हणींना व त्याच्या अर्थाला खूप म्हत्व असते.
म्हनी म्हणजे काय?
उत्तर- ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
म्हणी कशाला म्हणतात?
उत्तर- कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
मराठीत म्हणी चा अर्थ काय आहे?
उत्तर- मराठी भाषेत म्हण म्हणजे सामान्यतः अनुभवले सांगणारे किंवा सल्ला देणारे, बऱ्याच लोकांना माहीत असलेले एक लहान वाक्य .किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
भाषेत म्हणींचे उपयोग काय आहेत?
उत्तर- मराठी भाषेत म्हणीचे पुढील उपयोग होतात- ज्ञान देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी, नैतिकता शिकवण्यासाठी किंवा बळकट करण्यासाठी, वाद घालण्यासाठी, परस्पर तणाव दूर करण्यासाठी, समजून घेण्यात मदत करण्यासाठी किंवा इतरांना सांत्वन देण्यासाठी किंवा प्रेरणा देण्यासाठी म्हणीचा उपयोग होत असतो.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ -
Marathi Mahani tyache Arth काही मराठी भाषेतील म्हणी व त्याचे अर्थ खालील प्रमाणे .
म्हणी व त्याचे अर्थ
म्हण | अर्थ |
---|---|
थोराचे दुखणे आणि मणभर कुंथणे :- | मोठ्यांच्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते |
थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे :- | आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे |
थोडक्यात गोडी, फारात लबाडी :- | कोणतीही गोष्ट मर्यादेतच करावी, मर्यादेबाहेर केल्यास वाईटपणा येतो |
थेंबे थेंबे तळे साचे थोडे-थोडे:- | साठविल्यास पुढे मोठा संचय निर्माण होतो |
थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते:- | थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटतात |
राजा बोले, दळ हाले :- | राजाच्या हुकुमाप्रमाणे कारभार चालतो सामर्थ्यशाली व्यक्तीच्याच बेलण्याला महत्त्व असते |
राजाची राणी ती पाटलाची मेहुणी:- | कितीही संपत्ती प्राप्त झाली तरी मूळची गरिबी विसरू नये |
राञ थोडी, सोंगे फार :- | कामे पुष्कळ, पण वेळ थोडा |
रंधावे तसे खावे - | जशी कृती तसे फळ |
राव गेले रणी आणि भागुबाईची पर्वणी :- | मोठ्या सोकांच्या गैरहजेरीत क्षुद्र माणसं आपली शान दाखवितात |
म्हण | अर्थ |
---|---|
रानशी घर, कोशी बि-हाड :- | गरिबीचा संसार |
रांधा वाढा, उष्टी काढा:- | एकसारखे काम करीत राहणे |
राजा बोले दल हाले, काजी बोले दाढी हाले: - | सामर्थ्यशाली व्यक्तीच्याच म्हणण्याला महत्त्व असते |
राज्याअंती नरक आणि नरकाअंती राज्य:- | दृढ किंवा पापे केल्याशिवाय राज्य मिळत नाही कामि राज्य चालविणे व टिकविणे युद्ध किंवा पापे केल्याशिवाय शक्य नाही |
ऋण फिटेल, पण हीन फिटत नाही :- | कर्ज फेडता येते, उणेपणा घालविता येत नाही |
राजाचे पोडे आणि खासदार उडे :- | वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची |
रिकामा डौल आणि घराला नाही कौल :- | पोकळ बडेजाव दाखविणे |
राजाला दिवाळी काय कामाची?:- | ज्यांच्याकडे रोजच दिवाळीचा थाट असतो त्यांना दिवाळीचे महत्त्व वाटत नाही |
रिकामा व्यापारी कपाळावर हात मारी:- | काम माणसाने नसलेला माणूस नशिबाला बोल लावतो |
रिकामे मन आणि कुविचाराचे धन :- | काम नसले की मनात नाना त-हेचे वाईट विचार येतात |
म्हण | अर्थ |
---|---|
रिकाम्या देवळावर कावळ्याची वस्ती:- | घरधनी घरी नसल्यास चोराचे फावते |
रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी :- | उद्योगी स्वभावाची व्यक्ती मोकळ्या वेळात काही ना काही कामे करीतच असते, मग ते निरर्थक का असेनात. |
रुचेल ते बोलावे आणि पचेल ते खावे :- | सर्वाना आवडेल असे बोलावे व आपल्याला पचेल तेवढेच खावे |
लग्नाला गेली आणि बारशाला आली :- | अति संथ गतीने चालणारी स्त्री |
रोजचे मढे त्याला कोण रडे :- | तीच ती गोष्ट वारंवार होऊन लागली म्हणजे त्यात स्वारस्य राहत नाही |
लग्ग्राला वीस आणि वाजंत्र्याला तीस :- | मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यासाठी अधिक खर्च |
रोगी मेल्यावरी वैद्य आला घरी:- | गरज संपल्यावर उपाय करण्यास प्रवृत्त करणे वरातीमागून घोडे |
यावच्चंद्रदिवाकरौ :- | सूर्य चंद्र असेपर्यंत म्हणजेच अनंतकाळा पर्यंत |
याचे दार, त्याचे दार, उठ मेल्या खेटर मार :- | दुसऱ्याच्या दारी जाऊन अपमान करून घेणे |
रोम एका दिवसात बांधले गेले नाही:- | कोणत्याही गोष्टीसाठी विशिष्ट अवधी लागतो एकदमच काही ती होत नाही |
येलपाडी गौरा, म्हातारा नवरा :-थोडेसे काही झाले की त्याविषयी खूप सांगणे
येरे उंबरा पड तोंडात:- दैवावर विसंबून राहणे
येरे गोट्या पड माझ्या पाया:- जाणूनबुजून एखादे संकट ओढवून घेणे
येगे कळी बैस माझ्या नळी/पाटकोळी :-भांडण उकरून काढणे
येरे माझ्या मागल्या :-मागचीच पुनरावृत्ती
येरे बोरा, पड माझ्या तोंडा :-अतिशय आळशी असणे
ये धोंड्या, पड पायावर :-मुद्दाम नको ते काम उपस्थित करून नुकसान करून घेणे
येईना अन् जाईना, माझ नाव मैना अंगी कसलेही गुण नसताना मोठेपणा मिरवण्याची हौस
येत्याच्या चार वाटा, जात्याच्या बारा वाटा :- पैसा मोजक्याच मार्गाने मिळतो, पण खर्च अनेक मार्गानी होतो
रक्त रक्ताला अंतर देत नाही:- नात्याला नाते विसरत नाही
रंग जाणे रंगारी :-ज्याची विद्या त्यालाच माहीत
रक्ताचे पाणी सुखाची कहाणी :- कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही
रडून मान आणि पडून दंडवत :- रडून रडून काम साधणारा मनुष्य
रडती बायको व हसता पुरुष यांची संगत नसावी:- रडणाऱ्या स्त्रीची व हसणाऱ्या माणसाची संगती करू नये, कारण ते फसवतात
रडत राऊत, काय चालवील औत :-ज्या माणसाला दुसऱ्याच्या आधाराशिवाय चालता येत नाही, तो शेती कसा करील
रंग झाला काळा, अजून नाही गेला चाळा:- म्हातारपण आले तरी रंगेलपणा गेला नाही
रक्तापोटी गारगोटी :-उत्तम मनुष्याची कुलक्षणी संतती
रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते :-सरळ मागनि काम न केल्यास फार त्रास होतो
राईचा भाव रात्री गेला:- नेहमी सारखीव परिस्थिती नसते
राईचा पर्वत करणे :- मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे, पराचा कावळा करने मोहरीएवढ्या गोष्टीचा मोठा गवगवा करणे
राखणदार दारात अन चोर शिरला घरात :- निष्काळजीपणाने काम करणे
रागाची स्वारी अश्वाच्या पाठीवर :- राग फार काळ टिकत नाही
0 Comments