काळ व काळाचे प्रकार:
Scholarship Exam परीक्षेमध्ये मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात काळ व काळाचे प्रकार या घटकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत तसेच त्यावरील सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत.
काळ व काळाचे प्रकार:
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
१) वर्तमान काळ
२) भूतकाळ
३) भविष्यकाळ
वर्तमान काळ-
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. उदा. मी ईमेल लिहतो. वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार आहेत.
अ) साधा वर्तमानकाळ
ब) अपूर्ण वर्तमानकाळ
क) पूर्ण वर्तमानकाळ
ड) रीती वर्तमानकाळ
भूतकाळ:
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी ईमेल लिहिला. भूतकाळचे 4 उपप्रकार आहेत.
अ) साधा भूतकाळ
ब)अपूर्ण भूतकाळ
क) पूर्ण भूतकाळ
ड) रीती भूतकाळ
भविष्यकाळ:
क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे हे दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग होतो. उदा. मी ईमेल लिहिन. भविष्यकाळाचे 4 उपप्रकार आहेत.
अ) साधा भविष्यकाळ
ब) अपूर्ण भविष्यकाळ
क) पूर्ण भविष्यकाळ
ड) रीती भविष्यकाळ
खालील नमूना प्रश्न सोडवा म्हणजे परीक्षेत कश्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात याविषयी आपणास कल्पना येईल व आपला काळ व काळाचे प्रकार या घटकाचा अभ्याय होईल
काळ व काळाचे प्रकार सराव प्रश्न
अ) साधा भूतकाळ
ब)अपूर्ण भूतकाळ
क) पूर्ण भूतकाळ
ड) रीती भूतकाळ
काळ कसे ओळखायचे?
उत्तर - वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात. वाक्यातीलील क्रियापदावर काळ ओळखता येतो.
काळ म्हणजे काय?
उत्तर- वाक्यातील क्रिया कोणत्या वेळी घडत आहे ,याचा बोध जो होतो ,त्याला काळ असे म्हणतात.
भूतकाळाचे किती प्रकार आहेत?
उत्तर- जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. भूतकाळचे 4 उपप्रकार आहेत.
अ) साधा भूतकाळ
ब)अपूर्ण भूतकाळ
क) पूर्ण भूतकाळ
ड) रीती भूतकाळ
3 Comments
Iayfan Shaikh
ReplyDeleteIayfan Shaikh
ReplyDeleteसमर्थ
ReplyDelete