शब्दांचे असे आठ प्रकार आहेत त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात. बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. शब्दांच्या आठ जातींपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद ही चार विकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होतो. क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी व केवलप्रयोगी ही चार अविकारी आहेत म्हणजेच त्यांच्यात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. विकारी व अविकारी यांना अनुक्रमे सव्यय व अव्यय असे म्हणतात.
१) नाम – वाक्यात येणा-या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात
असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे
म्हणतात.
२) सर्वनाम – जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामांच्या ऐवजी
येतात त्यांना सर्वनाम असे म्हणतात.
३) विशेषण- जे शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगतात व त्यांचे
क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात
४) क्रियापद- जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात
त्यांना क्रियापद असे म्हणतात.
५) क्रियाविशेषण- जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना
क्रियाविशेषण असे म्हणतात.
६) शब्दयोगी अव्यय – जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व
वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
७) उभयान्वयी अव्यय – जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडतात
त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. (१) समूच्ययबोधक
उभयान्वयी अव्यय, (२) विकल्पबोधक उभयान्वय, (३) न्यूनत्वबोधक अव्यय, (४) परिणामबोधक अव्यय
८) केवलप्रयोगी अव्यय – जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त
करतात त्यांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
१. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यये २. शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये
३. आश्चर्यकारक
केवलप्रयोगी अव्यये ४. प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये ५.
संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यये ६. विरोधीदर्शक केवलप्रयोगी अव्यये ७.
तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यये ८. संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यये ९.
मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यये
5 Comments
वाव अमेझिंग
ReplyDeleteवाव अमेझिंग
ReplyDeleteKhalate teacher
DeleteSuperb
ReplyDeleteTouch teacher
ReplyDelete