जवाहर नवोदय विद्यालय (JNV) ही देशातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे, जिथे विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळते. प्रवेशासाठी होणारी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता व क्षमतांचा कस लावणारी असते. त्यामुळे या परीक्षेची तयारी व्यवस्थितपणे केली तर यश मिळवणे सोपे होऊ शकते.
राव प्रश्नपत्रिका वापरण्यासाठी टिपा
- दैनिक सराव: दररोज ठराविक वेळ सरावासाठी द्या. यामुळे नियमितता येते.
- वेळेचा योग्य उपयोग: सराव करताना घड्याळ वापरून ठरलेल्या वेळेत प्रश्नपत्रिका सोडवा.
- स्वत:चे विश्लेषण: उत्तरपत्रिका तपासून चुका समजून घ्या आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करा.
- विविध स्त्रोत वापरा: पुस्तके, ऑनलाइन प्रश्नपत्रिका, तसेच शिक्षकांकडून मिळालेली मदत घ्या.
सराव प्रश्नपत्रिका कोठे सापडतील?
- ऑनलाइन स्त्रोत: जवाहर नवोदयच्या अधिकृत वेबसाइटवर नमुना प्रश्नपत्रिका मिळतात.
- पुस्तके व गाईड: स्थानिक पुस्तक दुकानांमध्ये विविध प्रकाशकांची सराव पुस्तके उपलब्ध असतात.
- शाळा व अभ्यासवर्ग: अनेक शाळांमध्ये विशेष मार्गदर्शन कक्ष असतात, जिथे अशा प्रश्नपत्रिका मिळतात.
पालक व शिक्षकांसाठी सूचना
- विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या: सराव करताना आत्मविश्वास वाढवा.
- कठोर परिश्रमाची सवय लावा: नियमितपणे त्यांची प्रगती तपासा आणि मार्गदर्शन द्या.
- ताण कमी करा: मुलांवर जास्त दडपण न आणता अभ्यासाला प्रोत्साहन द्या.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्वरूप हे संयुक्त प्रश्नपत्रिका असते. 100 गुणाची एकच प्रश्नपत्रिका असून प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिलेला असतो. गुणांची विभागणी ही खालील प्रमाणे केलेली असते.
अ) विभाग पहिला- मानसिक क्षमता चाचणी - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात. या सर्व भागात प्रत्येक भागात चार चार प्रश्न विचारलेले असतात. असे एकूण 40 प्रश्न दिलेले असतात. हे सर्व प्रश्न आकृती वर आधारीत विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वेगवेगळ्या सूचना दिलेल्या असतात.
ब) विभाग दुसरा- अंकगणित - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये अंकगणित या घटकावरील मुलभूत क्षमता जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, आकडेमोड, अंकवाचन, अंकावरील क्रिया या वरील प्रश्न विचारलेले असातात. या प्रश्नांचा उद्देश आपले अंकज्ञान तपासणे हा असतो. यासाठी 20 प्रश्न 25 गुणासाठी विचारलेले असतात.
क) विभाग तिसरा- भाषा - Navodaya Vidyalaya Question Paper मध्ये भाषा विषयावर 20 प्रश्न हे 25 गुणासाठी विचारलेले असतात. भाषा या घटकाचा उद्देश हा वाचन व आकलन क्षमता तपासणे हा असतो आपली आकलन व वाचन क्षमता कशी आहे ते तपासले जाते. भाषा विषयातील चार परिच्छेद विचारलेले असतात. आपणास परिच्छिद काळजीपूर्वक वाचन करून त्यावर विचारलेले प्रश्न सोडवायचे असतात.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
अंकगणित सरावप्रश्नपत्रिका
सोडवा
अंकगणित सरावप्रश्नपत्रिका
सोडवा
0 Comments