Ghoshticha Guruvar Bhag 4

गोष्टींचा गुरूवार भाग- ४

जीत

गोष्टींचा गुरूवार या उपक्रमात प्रत्येक गुरूवारी आपणास एक गोष्ट दिली जाणार आहे. ती गोष्ट आपण ऐकू शकता. तीच गोष्ट आपण खालिल दिली असेल त्याचे वाचन सुध्दा करू शकता. प्रथम श्रवण करा नंतर ती वाचन करा. यामुळे वाचन कसे करावे हे तुम्ही शिकाल. त्यानंतर त्याचप्रमाणे वाचन करून वाचनाचा व श्रवणाचा सराव करू शकाल.

Ghoshticha Guruvar Bhag 4


Gosthicha-Guruvar-Bhag-1-गोष्टींचा-गुरूवार-भाग-१ला-आमची-शिल्लक


खालिल प्ले बटणवर क्लिक करून कथा ऐका.
 

जीत

                           - शंकर पाटील

माळ माणसांनी भरून गेला होता. बघावे तिकडे माणूस होते. आसपासच्या चार गावचे लोक शर्यत बघायला माळावर गोळा झाले होते. वेळ होत आली तशी एकेक गाडी येऊन उभी राहू लागली. गावच्या तुका पाटलाचीही गाडी येऊन उभी राहिली. तसे गाडीभोवती गराडा घालून

Ghoshticha Guruvar Bhag 3 | गोष्टींचा गुरूवार भाग- ४|जीत

 

लोक उभे राहिले. खुळ्यासारखे गाडीकडे बघत राहिले. तुकाने आपला म्हातारा हर्ष्या बैल गाडीला जोडला होता. जोडीच्या तरण्या खिलारी खोंडाबरोबर इर्ष्या उभा होता आणि लोक टक लावून त्याच्याकडे बघत राहिले होते. ऐन उमेदीत हयाने शर्यती जिंकल्या होत्या हे लोकांना माहीत होते. त्याचे गुण सगळ्यांना माहीत होते. साऱ्या गावात तो नावाजलेला बैल होता हे खरे, पण आता त्याचे वय झाले होते. अंगात दम नव्हता, अंगावर धड मास नव्हते, त्याची हाडे दिसत होती. बैल पार थकला होता आणि तोंडावर तजेला नव्हता. जोडीच्या खिलारी खोंडाबरोबर तो कसा पळणार हीच चिंता लोकांना पडली होती आणि सारे लोक मनातून तुका पाटलाला शिव्या देत उभे होते. त्या खुळ्याने म्हाताऱ्या बैलाला का जोडावे, हेच त्यांना कळत नव्हते.

 

Ghoshticha Guruvar Bhag 3 | गोष्टींचा गुरूवार भाग- ४|जीत

हळूहळू सगळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. कुणाची जोडी जागच्या जागी नाचत होती. कुणाचं खोंड डिरक्या फोडत होते. कुणी गर्दन वाकवून शिंगे लावत होते तर कुणी पायाने खालची जमीन उकरत होते. हर्ष्याचा जोडीदारही गप उभा राहत नव्हता. पण सारे लोक हर्ण्याकडे बघत उभे होते. हर्ण्याचे पळणे त्यांना ठाऊक होते. त्याची चलाखी साऱ्यांना माहीत होती. उभ्या गाडीला तो कधी थयथय नाचायचा नाही. डिरकी टाकायचा नाही. शिंगे हलवायचा नाही. पण एकदा गाड्या सुटल्या आणि चाके खडाडली म्हणजे त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे. चांके वाजतील तसा तो उसळी घेत जायचा. त्याला कधी उसकावे लागायचे नाही- मारावे लागायचे नाही. तशीच वेळ आली तर जोडीच्या बैलालाही गुंडाळून घेऊन तो एकटाच धावायचा.

हर्ण्या असा धावायचा हे खरे. पण आता त्याचे वय झाले होते. बाजाराला. जत्रेला जाताना एखादी चुणूक दाखवणे निराळे आणि शर्यतीचे काम निराळे. हे काम आता कसे काय झेपणार ही चिंता लोकांना लागली होती आणि तुका निश्चित होता. हर्ण्या म्हातारा झाला असला तरी त्याच्यावर त्याचा भरवसा होता. लोक काळजीने त्याच्या गाडीकडे बघत होते आणि तुका खुशाल हसऱ्या चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत होता.

इशारा झाला. गाड्या उधळल्या. चाके खडाडली. हर्ण्याच्या कानांत वारे शिरले आणि कळा खाणारा म्हातारा बैल उमद्या घोड्यागत लांबलचक उडी घेऊ लागला. त्याचा पाय जमिनीला ठरेनासा झाला. जोडीचा खिलारी खोंड मागे पडू लागला. बघता बघता गाड्यांमागून गाड्या तोडल्या जाऊ लागल्या. एक वावटळ सुटल्यागत गाडी पुढे जाऊ लागली. बाकीचे गाडीवान पालथे पडून बैलांना हाणू लागले आणि सारे लोक खुळे होऊन बघत राहिले.

 


गाड्या लांब जाऊन दिमेनाशा झाल्या; तसे हर्ण्याविषयीचे बोलणे सुरू झाले. गाड्या मागे फिरण्याची वेळ भरत आली तसा सगळा माळ टाचा वर करून बघत उभा राहिला. झाडांचे शेंडेही माणसांनी फुलून गेले. लांबून आवाज कानावर येऊ लागला आणि डगरींवर, झाडांवर चढून लोक बघू लागले. तोच एका झाडावरून कोणीतरी ओरडले- म्हाताऱ्या बैलाचीच गाडी आली; गाडी आली !

माणसे माळावर पळून खेळू लागली. लोकांना दम निघेनासा झाला. हर्ष्याला बघायला सारे पुढे पळू लागले; तोवर तुका पाटलाची गाडी जवळ आली. दोनतीन गाड्या सारख्या घासून येत होत्या. सारखी झणापण सुरू झाली. बैल फेसळून गेले होते. चाके खडाडत होती आणि हर्ष्या सारखा घोड्यागत धावत होता. कुणाचीच गाडी मागून जवळ येऊ देत नव्हता. सीमा जवळ आली, तसा त्याच्या तोंडातून फेस खाली गळत होता. पुढच्या दोन्ही पायांवर त्याची धार सारखी लोंबत होती. तरीही त्याला आपल्या जिवाची पर्वा नव्हती. मागच्या गाडीचे चाक वाजेल तसा तो पुढे उडी घेत होता.

त्या तावातच गाडी सीमारेषा ओलांडून दोन कासरे पुढे गेली आणि पाठोपाठ धावत गेलेल्या माणसांनी गाडीभोवती गराडा घातला. पालये पडून लोक हर्ण्याला बघत राहिले.



आपणास हे ही आडेल

गोष्टींचा गुरूवार

भाग

पहा

गोष्टींचा गुरूवार

भाग १

ऐका

गोष्टींचा गुरूवार

भाग २

ऐका

गोष्टींचा गुरूवार

भाग ३

ऐका