राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा अनुक्रमे इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठी दोन पेपर असून पेपर १ मध्ये मराठी व गणित असे दोन विषय व पेपर २ मध्ये इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी असे दोन विषय अशा एकूण ४ विषयांचा समावेश आहे
विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. पाठांतर पद्धतीला फाटा देऊन विद्यार्थ्यानि प्रत्येक उपघटक समजून घेऊन अभ्यासावा अशी सराव प्रश्नपत्रिकेची रचना आहे. प्रत्येक उपघटकावर ३०% प्रश्न सोपे,४०% प्रश्न मध्यम व ३०% प्रश्न कठीण स्वरुपाचे आहेत. इयत्ता ८ वी साठी काही प्रश्न असे आहेत की ज्यांचे दोन पर्याय अचूक आहेत. असे प्रश्न सोडविताना विद्याथ्र्यांनी त्या प्रश्नांचे दोन्ही पर्याय रंगवावेत असे अपेक्षित आहे. त्यानुसार सराव चाचणी बनवण्यात आलेली आहे.
अशा प्रश्नांच्या बाबतीत स्वतंत्रपणे तशी सूचना सराव प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे. सराव प्रश्नपत्रिकेमध्ये कमाल २०% प्रश्न अशा प्रकारचे असतील. सराव प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक उपघटकाची मांडणी शक्यतो सोप्या भाषेत, पुरेशा उदाहरणांसह करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात आलेला आहे. सरावासाठी दिलेल्या प्रश्नांच्या बरोबर उत्तरांची सूची सराव प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे.
प्रत्येक घटक व उपगटक निहाय सराव प्रश्नपत्रिका आपणास सोडवण्यासाठी दिलेल्या आहेत. आपण घटका/ उपघटकाच्या समोरील सोडवा यावर क्लिक करून सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता.
पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)
सराव प्रश्नपत्रिका
विषय- बुध्दीमत्ता
उपघटक | लिंक |
अ) सुचनापालन, वर्णन व मजकूर | |
ब) भाषाज्ञान | |
क) इंग्रजी अक्षरमाला | |
अ) शब्दसंग्रह | |
आ) आकृत्या | |
इ) संख्या | |
ई) इंग्रजी वर्णमाला | |
अ) शब्दसंग्रह | |
ब) आकृती | |
क) संख्या | |
ड) इंग्रजी वर्णमाला | |
अ) संख्या | |
ब) आकृत्या | |
क) चिन्हे | |
ड) चुकीचे पद ओळखणे | |
इ) इंग्रजी वर्णमाला | |
अ) आकृत्या अंक अक्षरे | |
अ) अक्षरांचा वापर | |
ब) चिन्हांचा वापर | |
क) अंकाचा वापर | |
अ) अंक वापर | |
ब) अक्षरे वापर | |
क) आकृती वापर | |
अ) अंक | |
ब) अक्षरे | |
क) आकृती | |
अ) वय वेळ तर्क अनुमान काढणे | |
ब) अभाषिक घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे | |
क) संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे | |
१) रांगेतील स्थान | |
२) दिशावरील प्रश्न | |
३) दिनदर्शिका | |
४) वेन आकृती | |
५) गणिती कोडी | |
१) अपूर्ण आकृती पूर्ण करणे | |
२) तंतोतंत आकृती ओळखणे | |
३) घडीच्या आकृत्या | |
४) लपलेली आकृती शोधणे | |
सराव पेपर साठी |
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
0 Comments