पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चा नवीन अभ्यासक्रम राज्य सरकारणे लागू केला आणि त्यानुसार सर्व परीक्षा पध्दती बदलली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित आणि परीक्षा परिषदेच्या नमूना प्रश्नपत्रिकेनुसार 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका आपणास सरावासाठी उपल्बध करून देत आहे. आशा करतो आपणास पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका नक्की उपयुक्त ठरतील.
सदर शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर 1 मध्ये मराठी (प्रथम भाषा) (50 गुण) व गणित (100 गुण) या विषयांवर एकूण 150 गुणांची संयुक्त प्रश्नपत्रिका असते. आपणास या वेबसाईटवर परीक्षा परिषदेच्या नमुन्यानुसार प्रश्नपत्रिकाआणि सरावासाठी अन्य प्रश्नपत्रिका अशा सर्व नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासह उपल्बध होतील ज्यामधून आपण भरपूर सराव करू शकता. या सर्वच सराव प्रश्नपत्रिकांत मराठी (प्रथम भाषा) व गणित या दोन्ही विषयांचा समावेश आहे. या प्रश्नपत्रिका शिक्षकांनी तयार केल्या असून, त्यांची रचना तंतोतंत परीक्षा परिषदेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. आपणास नक्की उपयुक्त ठरतील.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम –
पेपर पहिला यामध्ये आपणास मराठी (प्रथम भाषा) (50 गुण) व गणित (100 गुण) या विषयांवर एकूण 150 गुणांची संयुक्त प्रश्नपत्रिका असते. प्रथम त्याविषयाचा घटक निहाय अभ्यासक्रम समजून घेवू. गणित mathematics विषयामध्ये एकूण ७ घटक आहेत. या घटकावर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले असतात. हे सात घटक व त्यामधील उपघटक तसेच त्याचा भारांश खालिलप्रमाणे असतो. यानुसार कोणता घटक अधिक अभ्यासावा. कोणता घटक आपण सहज सोडवू शकतो याची आपणास कल्पना येईल. त्याप्रमाणे आपण नियोजन करून अभ्यास करावा.
१) संख्याज्ञान - A) आंतराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे B) दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन C) अंकाटी स्थानिक किंमत, दर्शनी किंमत व विस्तारीत मांडणी D) मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे E) संख्यांचा चढता उतरता क्रम व तुलना G) १ ते १०० संख्यावर आधारीत प्रश्न H) सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या , संयुक्त संख्या , त्रिकोणी संख्या , चौरस संख्या भारांश १२ %
2) संख्याविरील क्रिया - अ) बेरीज (सात अंकी संख्यापर्यंत ) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे आ) वजाबाकी (सात अंकी संख्यापर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दीक उदाहरणे इ) गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत) ई) भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्यापर्यंत) उ) पदावली व अंकक्षरांचा उपयोग ऊ) संख्यांचे विभाजन (अवयव) विभाज्य ( एक ते १० पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या) भारांश २०%
3) अपूर्णांक - १) व्यवहारी अपूर्णांक - अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता -उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ब) अंशाधिक , छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक - परस्पर रूपांतर क) समतूल्य अपूर्णांक २) दशांश अपूर्णंक - अ) वाचन, लेखन ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग क) बेरीज वजाबाकी.
४) मापन/महत्त्वमापन - १) लांबी, वस्तुमान धारकता (दशमान परिमाण) - परस्पर रूपांतर बेरीज , वजाबाकी, व शाब्दिक उदाहरणे २) कालमापन ः घड्याळ (मध्यान्हपूर्व व माध्यान्होत्तर ) तास, मिनिटे, सेकंद - परस्पर रूपांतर, बेरीज वाजबाकी व शाब्दिक उदाहरणे. ३) दिनदर्शिका ४) कालमापन (रीम, दस्ता) ४) नाणी नोटा (रुपये-पैसे) परस्पर रूपांतर मुलभूत क्रियावर आधारीत खरेदी विक्री संबंधित उदाहरणे.
५) व्यवहारीक गणित - नफा-तोटा, शेकडेवारी , सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारीत उदाहरणे)
६) भूमिती- १) कोन व कोनाचे प्रकार २) समांतर व लंब रेषा ३) त्रिकोण, चौरस , बाजू, शिरोबिंदू ४) वर्तूळ - त्रिज्या, व्यास, केंद्र, परिघ, आंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळकंस ५) परिमिती - त्रिकोण, आयात, चौरस, बहूभूजाकृती ६) क्षेत्रफळ- आयात चौरस ७) त्रिमिती वस्तू व घडणी ८) आकृतीबंंध ९) इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू , पृष्टे)
७) चित्रालेख - चित्ररूप माहितीचे आकलन
शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका
सराव प्रश्नपत्रिका - 1
पेपर 1: गणित
(वेळ : ३0 मिनिटे ) इयत्ता ५ वी
(प्रश्न - 25) एकूण गुण: 50
विभाग २ : गणित (25 प्रश्न; 50 गुण)
शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाच्या सूचना
शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी दिलेल्या काही सूचनांचे वाचन करा नंतर सरावप्रश्नपत्रिका सोडवायला सुरवात करावी. आशा करतो आपणास नक्की उपयुक्त ठरतील. खालील सूचना वाचन करा.
1) सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य असतील. एकही प्रश्न आपणास सोडता येणार नाही.
२) दिलेल्या प्रश्नाचे वाचन करा चारही पर्याय पहा व अचूक पर्यायाची निवड करा.
३) आपणास दिलेल्या वेळेतच आपली प्रश्नपत्रिका सोडवून पूर्ण करा.
४) सर्व प्रश्न सरावासाठी घेतलेले नमूना प्रश्न आहेत. केवळ आपला सराव व्हावा या उद्देशाने हे प्रश्न आहेत.
५) एखादा प्रश्न आपणास समजला नाही तर कृपया आपल्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घ्यावी.
६) प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर शेवटी आपणास View Score बटण दिसेल त्यावरून आफणास निकाल पाहता येईल तसेच अचूक उत्तरे देखील पाहता येतील.
अशाप्रकारे वरील घटकांवर आधारीत ७५ प्रश्न १५० गुणासाठी विचारले जातात. स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न ३०%, मध्यम स्वरूपाचे प्रश्न ४०%, कठिण स्वरूपातील प्रश्न ३०% प्रश्न असे स्वरूपात विचारले जातात. यासाठी आपणास भारांशावर आधारीत घटकावर अधिक लक्ष देऊन भरपूर सरावा करणे आपेक्षित असते. आापणास मराठी विषयातील कोणत्या घटक सोपा व कोणता घटक अवघड जातो ते मला खाली कमेंट करून कळवा.
0 Comments