मराठी म्हणी:- मराठी म्हणी म्हणजे मराठी भाषेतल्या अशा वाक्यांचा संग्रह, जे वाक्ये जीवनातील विविध अनुभव, ज्ञान, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे दर्शन घडवतात. या म्हणी साधारणपणे काही शब्दांमध्येच मोठे अर्थ व्यक्त करतात आणि जीवनातील सत्य, अनुभव, किंवा शिकवण मांडतात.

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ Marathi Mahani tyache Arth

उदाहरणार्थ:

  • अति तिथे माती - जास्ती करणे नेहमी नुकसानकारक असते.

  • नाचता येईना अंगण वाकडे - स्वतःच्या अपयशाचा दोष परिस्थितीला देणे.

  • ज्याचे जळते त्यालाच कळते - दुःखाची खरी व्यथा तोच जाणतो ज्याला ते भोगावे लागते.

या म्हणी आपल्या दैनंदिन जीवनात, संवादात, आणि शिक्षणात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. त्या आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या समृद्धतेचा एक अविभाज्य भाग आहेत. 

म्हणींचे भाषेतील महत्त्व हे अत्यंत अभिजात आहे. म्हणी हे कोणत्याही भाषेच्या समृद्धतेचे आणि विविधतेचे जिवंत उदाहरण आहेत. मराठी भाषेमध्ये म्हणींचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे:

1. संस्कृतीचे प्रतिबिंब:

म्हणींमध्ये एका विशिष्ट समाजाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. त्या समाजाच्या जीवनशैली, मूल्ये, आणि परंपरा म्हणींमध्ये उतरलेल्या असतात. उदाहरणार्थ, 'अति तिथे माती' ही मराठी म्हण आपल्या समाजातील संयमाचे महत्त्व दर्शवते.

2. भाषेची श्रीमंती:

म्हणी भाषा अधिक समृद्ध आणि रंगतदार बनवतात. त्या बोलण्यात आकर्षकता आणतात आणि संवादातील अर्थपूर्णतेला वर्धित करतात. 'नाचता येईना अंगण वाकडे' सारख्या म्हणी भाषेच्या सौंदर्यात भर टाकतात.

3. जीवनशिक्षण:

म्हणींच्या माध्यमातून जीवनाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये शिकवली जातात. 'थेंब-थेंब तळे साचते' ही म्हण सातत्याचे महत्त्व पटवून देते. अशा म्हणी जीवनातील महत्वपूर्ण धडे सोप्या आणि प्रभावी पद्धतीने व्यक्त करतात.

4. सांस्कृतिक वारसा:

म्हणींमध्ये आपल्या पूर्वजांच्या अनुभवांचे, ज्ञानाचे, आणि शिकवणीचे सार असते. त्या आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख आणि सन्मान टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ही म्हण आपला अन्नाच्या प्रति आदर दाखवते.

5. सामाजिक चेतना:

म्हणी समाजातील विविध विषयांवर जागरूकता आणतात. 'जेथे गोड तिकडे माखळ' ही म्हण समाजातील असामाजिक घटकांच्या उपस्थितीची जाणीव करून देते. त्या समाजातील विचारांना आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहित करतात.

6. भाषा शिक्षण:

विद्यार्थ्यांना भाषेच्या शिक्षणात म्हणींचा उपयोग उपयुक्त ठरतो. त्यांना नवनवीन शब्दांची ओळख करून देण्यासाठी आणि भाषेचे गहन ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणी मदत करतात. 'उंटावरून शेळ्या हाकणे' ही म्हण विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रहात भर घालते.

7. संवाद कौशल्य:

म्हणींचा वापर संवाद कौशल्य वाढवण्यास मदत करतो. त्या संवादात निपुणता आणि प्रभावशीलता आणतात. 'डोंगरावरून वडाची सावली' याप्रमाणे म्हणी संवादात व्यक्त होण्याची कौशल्ये वृद्धिंगत करतात.

या सर्व कारणांमुळे म्हणींचे भाषेतील महत्त्व अमूल्य आहे. त्या आपल्या भाषेचा सजीव आणि समृद्ध भाग आहेत, ज्या आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडवतात. त्यामुळे मराठी म्हणींचा वारसा जतन करते.  

मराठी म्हणी व त्यावरील प्रश्न -



1/25
. 'कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिचे दोष काढण्यात अर्थ नसतो, ती गोड मानून घेणेच हिताचे असते' या वाक्याला समर्पक म्हण खालीलपैकी कोणती ?
दिव्याखाली अंधार
ओळखीचा चोर जीवे न सोडे
दृष्टी आड सृष्टी
यापैकी नाही
Explanation: यापैकी नाही
2/25
अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे, या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती?
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
तळेराखी तो पाणी चाखी
दैव देते, कर्म नेते
पालथ्या घड्यावर पाणी
Explanation: दैव देते, कर्म नेते
3/25
रिक्त जागा भरा. वासरात........ गाय शहाणी. १
लहान
Option 2
लंगडी
अंध
Explanation: लंगडी
4/25
रिक्त जागा भरा. केळी खाता हरकले........ देता चरकले.
साक्ष
पैसे
हिशोब
वेगळे उत्तर
Explanation: हिशोब
5/25
रिकाम्या जागा भरा. : पडत्या फळाची.......
रास
आज्ञा
साल
गोड़ी
Explanation: आज्ञा
6/25
रिकाम्या जागा भरा. पाची बोटे .......... नसतात.
सारखी
लांब
लहान
वेगळे उत्तर
Explanation: सारखी
7/25
रिकाम्या जागा भरा. दाम करी.........
चांदणे
घाम
काम
राम
Explanation: काम
8/25
. रिक्त जागा भरा. कोल्हा........ राजी.
लवकर
काकडीला
जलद
उशीराने
Explanation: काकडीला
9/25
म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा : बावळी मुद्रा देवळी निद्रा.
गुणवान असल्याचे भासवणारे गुणी असतातच असे नाही.
सारे वैभव गेले तरी खुणा शिल्लक राहतात.
दिसण्यात बावळट पण व्यवहार चतूर माणूस.
दिसण्यास श्रीमंत पण प्रत्यक्षात तिचा अभाव
Explanation: दिसण्यात बावळट पण व्यवहार चतूर माणूस.
10/25
'केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी' म्हणजे....?
अत्यंत दारिद्र्याची अवस्था असणे.
जेवताना चैनी केल्यास घरात काही शिल्लक राहत नाही.
जीवनातील विसंगत सगळीकडेच असते. घरीही आणि बाहेरही
थोड्या मोबदल्यात बराच फायदा मिळवणे.
Explanation: अत्यंत दारिद्र्याची अवस्था असणे.
11/25
खालील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा. आईने राजेशला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुकती जाणीव करून दिल्याबरोबर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला. म्हणतात ना-
जसे करावे तसे भरावे
हिंमत मर्दा तर मदत खुदा
शहाण्याला शब्दाचा मार
लेकी बोले सुने लागे
Explanation: शहाण्याला शब्दाचा मार
12/25
पुढील वाक्याकरिता योग्य म्हण निवडा. - भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक ढोंगीपणाची.
नाव मोठं लक्षण खोटं
उथळ पाण्याला खळखळाट फार
ओठात एक पोटात एक
भपका भारी खिसा भारी
Explanation: नाव मोठं लक्षण खोटं
13/25
'दगडावरील रेघ' या म्हणीतून काय प्रतीत होते?
पक्का निर्णय
सुंदर शिल्प
डळमळीत निर्णय
अर्धे वचन
Explanation: पक्का निर्णय
14/25
पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. 'विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर'
विंचवाचे ओझे त्याच्या पाठीवर असते.
शरिराप्रमाणे आहार घेऊन फिरणे.
गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे
नवऱ्या पाठोपाठ बिऱ्हाड येणे.
Explanation: गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे
15/25
म्हण पूर्ण करा - 'शिकविलेली बुद्धी आणि....... फार काळ टिकत नाही'
बांधलेली दोरी
बांधलेले घोडे
बांधलेली शिदोरी
यापैकी नाही.
Explanation: बांधलेली शिदोरी
16/25
खालील प्रश्नात शब्दसमूहासाठी दिलेल्या चार म्हणींपैकी जी म्हण योग्य ठरेल अशी म्हण असणारा पर्याय लिहा. 'फक्त एक दिवसात ही इतकी कामे तो कशी करणार हे त्याचे त्यालाच माहित!
एक ना धड भाराभर चिंध्या
इकडे आड तिकडे विहिर
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास
रात्र थोडी सोंगे फार
Explanation: रात्र थोडी सोंगे फार
17/25
पाचामुखी परमेश्वर म्हणजे .......
पाच तोंडाचा देव
पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे
पुष्कळ लोक जे बोलतात ते खोटे
यापैकी नाही
Explanation: पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे
18/25
तळे राखील तो पाणी चाखील म्हणजे ?
तळे राखणाऱ्याला त्याचे पाणी मिळेल.
आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.
पाणी मिळविण्यासाठी काम केले पाहिजे
प्रत्येकाने काही मिळविण्यासाठी काम केले पाहिजे.
Explanation: आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.
19/25
पुढील म्हण पूर्ण करा 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या ........सदर'
चिंचा
सरी
बाभळी
परी
Explanation: बाभळी
20/25
'नम्रतेने, विनयशीलतेने चांगल्या गोष्टी साध्य होतात.' या वाक्याचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण निवडा. १) २) ३) √ ४)
प्रयतनांती परमेश्वर
दाम करी काम
मुंगी होऊन साखर खावी
ताकाला जाऊन भांडे लपविण
Explanation: मुंगी होऊन साखर खावी
21/25
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
लाकूडतोड्याचा जीव कुऱ्हाडीवर
कुऱ्हाडीचा दांडा उभाच असावा
सारे वैभव गेले. तरी त्याच्या खुणा शिल्लक राहतात
आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणीभूत
Explanation: आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारणीभूत
22/25
"खाई त्याला खवखवे" या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण कोणती ? १) २) ३) ४) √
चोराच्या मनात चांदणे
गर्वांचे घर खाली
ज्यांच्या हाती ससा तो पारधी
कर नाही त्याला डर नाही
Explanation: कर नाही त्याला डर नाही
23/25
. 'कोल्हा काकडीला राजी' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा ?
कोल्ह्याला काकडी आवडते.
क्षुद्र माणसे क्षुद्र मोबदल्याने खूश होतात.
क्षुद्र माणसे क्षुद्र मोबदल्याने खूश होत नाहीत.
काकडीसाठी कोल्हा जगतो.
Explanation: क्षुद्र माणसे क्षुद्र मोबदल्याने खूश होतात.
24/25
वेसन घालणे याचा अर्थ.....
वारंवार बजावून सांगणे
खूप दुःख देणे
मर्यांदा घालणे
हौस पुरवणे
Option
Explanation: मर्यांदा घालणे
25/25
'चोराच्या मनात चांदणे' या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.
१) मन चिंती ते वैरी न चिंती
ओळखीचा चोर जीवें न सोडी
खाई त्याला खवखवे
असंगाशी संग अन् प्राणाशी गाठ
Explanation: खाई त्याला खवखवे
Result:

मराठी म्हणी सराव  प्रश्नपत्रिका 

1/25
'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा अर्थ सांगणारा पर्याय निवडा.
खोल पाण्यात बुढणे
खड्ड्यात पाय अडकणे
खड्डयातून वर न येता येणे
अधोगतीला लागून जास्त खाली जाणे
Explanation: अधोगतीला लागून जास्त खाली जाणे
2/25
अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. १) २) ३) √ ४)
खाईन तर तुपाशी
तळे राखी तो पाणी चाखी
दैव देते, कर्म नेते
पालथ्या घड्यावर पाणी
Explanation: दैव देते, कर्म नेते
3/25
'आईबापांचे गुण तेच मुलांचे गुण' या अर्थाची म्हण ओळखा-
खाण तशी माती
खाई त्याला खवखवे
कोल्हा काकडीला राजी
आयजीच्या जीवावर बायजी उदार
Explanation: खाण तशी माती
4/25
रभा लाईभु ळका लायखा यामध्ये कोणती म्हण दडली आहे?
खाई त्याला खवखवे
खोट्याच्या कपाळी गोटा
खायला काळ भुईला भार
कोल्हा काकडीला राजी
Explanation: खायला काळ भुईला भार
5/25
'करावे तसे भरावे' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
जेवढे सांडले आहे तेवढे भरावेच लागेल.
बऱ्यावाईट कृत्यानुसार बरेवाईट परिणाम भोगावे लागतात.
कोणाचे नुकसान केले तर भरपाई करून घ्यावी लागते.
काही न करण्याऱ्याला शिक्षा भोगावी लागत नाही
Explanation: बऱ्यावाईट कृत्यानुसार बरेवाईट परिणाम भोगावे लागतात.
6/25
'धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही.' या अर्थाची म्हण ओळखा.
दूरुन डोंगर साजरे
टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही.
मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची
चढेल तो पडेल.
Explanation: मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची
7/25
'भिकेची हंडी शिक्याला चढत नाही' या म्हणीचा अर्थ शोधून पर्याय लिहा.
भिकेची हंडी शिक्यावर कधीही ठेवू नये.
दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रिच असतो.
उपकार करायचे नसतील तर अपकार करू नयेत.
भिकेची झोळी शिक्यावर बसत नाही.
Explanation: दुसऱ्यावर अवलंबून असणारा सदा दरिद्रिच असतो.
8/25
खालीलपैकी कोणत्या जोड्या चुकल्या आहेत? अ) चोराच्या मनात चांदणे -खाई त्याला खवखवे ब) कामापुरता मामा -ताकापुरती आजीबाई. क) शेरास सव्वाशेर -चोरावर मोर, ड) बाप तसा बेटा- खाण तशी माती.
१ व ३
२ व ४
केवळ ३
वरीलपैकी एकही नाही
Explanation: वरीलपैकी एकही नाही
9/25
'राव गेले रणी भागुबाईची पर्वणी' याचा योग्य अर्थ ओळखा. १) २) . ३) √ ४)
बड्या घरच्या सर्व लोकांना मान दिला जातो.
धनिक लोक आश्रिताला उगाचच महत्त्व देतात
मोठ्या लोकंच्या गैरहजेरीत क्षुद्र माणसे आपले ज्ञान दाखवितात.
मोठ्यांच्या गैरहजेरीत छोट्यांनी शान दाखवू नये,
Explanation: मोठ्या लोकंच्या गैरहजेरीत क्षुद्र माणसे आपले ज्ञान दाखवितात.
10/25
वडाची साल पिंपळाला' या म्हणीचा योग्य पर्याय निवडा.
एखाद्याचे दोष दाखविणे.
एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे
दोष लपविण्यात युक्ती योजणे.
एकाचे गुण दुसऱ्याला चिकटवणे.
Explanation: एकाचे दोष दुसऱ्यावर ढकलणे
11/25
हात दाखवून .......... ही म्हण पुर्ण करा?
लक्षण
अवलक्षण
लक्षण्य
पळणे
Explanation: अवलक्षण
12/25
'गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ', या म्हणीच्या योग्य अर्थाच पर्याय निवडा ?
गाढवांमुळे मोठे नुकसान होते
ऐनवेळी अपेक्षाभंग होणे
अविचाराने वागणे
मुर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृत्य करणार
Explanation: मुर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचीच कृत्य करणार
13/25
कुऱ्हाडीचा दांडा'......... म्हण पूर्ण करा.
घरोघरी मांडा
धारदार फार
गोतास काळ
मजबूत फार
Explanation: गोतास काळ
14/25
बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
तिरळा मनुष्य
दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य
चमत्कारिक मनुष्य
दिसण्यात भोळा परंतु दुष्ट मनुष्य
Explanation: दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य
15/25
हा सूर्य हा जयद्रथ या म्हणीचा अर्थ कोणता?
सूर्यालाच जयद्रथ असे म्हणतात
सूर्य व जयद्रथ दोन्हीही प्रकार देतात
एकीकडे रोग दुसरीकडे उपचार
पुराव्यानिशी सत्य दाखवून देणे
Explanation: पुराव्यानिशी सत्य दाखवून देणे
16/25
'जसे करावे तसे भरावे' म्हणजे काय ?
आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे
पापाला प्रायश्चित्त मिळणे
जेवढे नुकसान तेवढे भरपाई
वाईटाचे फळ वाईट मिळणे
Explanation: आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे
17/25
'काखेत कळसा गावाला वळसा' म्हणजे काय ?
काखेत कळसी घेवून गावाला फेरी मारणे
एकाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे
वस्तू जवळच असूनही ती शोधीत फिरणे
नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्वीकारणे
Explanation: वस्तू जवळच असूनही ती शोधीत फिरणे
18/25
म्हणी पूर्ण करा. 'ऐकावे जनाचे-------
करावे सर्वांचे
करावे मनाचे
करावे कोणाचे
यापैकी नाही
Explanation: करावे मनाचे
19/25
जो दुसऱ्यावर विश्वासला.........
तो बुडाला
त्याचा विश्वास उडाला
त्याचा कार्यभाग बुडाला
यापैकी नाही
Explanation: त्याचा कार्यभाग बुडाला
20/25
'आग रामेश्वरी '.........
बंब जोगेश्वरी
बंब सोमेश्वरी
बंब रामेश्वरी
यापैकी नाही
Explanation: बंब सोमेश्वरी
21/25
पुढील म्हण पूर्ण करा. जळत्या घराचा ----?
पडता ढाचा
ढळता ढाचा
पोळता वासा
गळता वासा
Explanation: पोळता वासा
22/25
पिकते तेथे विकत नाही या म्हणीचा अचुक पर्याय कोणता ?
मिळेल त्यावर संतोष मानणे
निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते
कुठेही काही विकले जात नाही
कुठेही काहीही पिकते
Explanation: निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते
23/25
टाकीचे घाव....... म्हण पूर्ण करा.
पाय पसरावे
पाणी भरून
सोसल्यावाचून देव पण येत नाही
कुत्रा चाव
Explanation: सोसल्यावाचून देव पण येत नाही
24/25
म्हण व त्याचा अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखा.
आले अंगावर घेतले शिंगावर -आपलाच दोष लक्षात न येणे.
कुडी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार
पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा - थोड्या फायद्यासाठी खूप कष्ट घेणे.
केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी -अत्यंत दरिद्री अवस्था.
Explanation: आले अंगावर घेतले शिंगावर -आपलाच दोष लक्षात न येणे.
25/25
'श्री' च्या मागोमाग 'ग' येतो. या म्हणीचा अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा.
गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत.
संपत्ती बरोबर गर्व येतो.
संगती प्रमाणे वर्तन
गजानना पाठोपाठ गौरी येतात.
Explanation: संपत्ती बरोबर गर्व येतो.
Result: