कोणतीही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये यश संपादन करावयाचे असेल तर त्यासाठी सरावाची आवश्यकता असते. असा सराव केल्यानंतरच आपणास यश संपादन होत असते. आपण नेहमी शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका , शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका संग्रह , ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा – सराव प्रश्नपत्रिका संच शोधत असता यावर आधारीत सराव प्रश्नपत्रिका सोडवा.
शब्द
- विकारी (सव्यय)
- - नाम
- - सर्वनाम
- - विशेषण
- - क्रियापद
- अविकारी अव्यय
- - क्रियाविशेषण
- - शब्दयोगी
- - उभयान्वयी
- - केवलप्रयोगी
नाम
नामाचे प्रकार
- सामान्यनाम
- विशेषनाम
- भाववाचकनाम
- धातुसाधित नाम
1) सामान्यनाम : एकाच जातीच्या पदार्थाला समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्यनाम. उदा. नदी, पर्वत, शहर इ.
2) विशेषनाम : या नामाने जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो त्यास विशेषनाम म्हणतात.
उदा. गंगा, हिमालय, कोल्हापूर.
3) भाववाचक नाम : ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला 'भाववाचक' नाम किंवा धर्मवाचक नाम असे म्हणतात.
उदा. पाटिलकी, गुलामगिरी, गोडवा.
सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नामे ही एकमेकांचे कार्य करतात तसेच विशेषणे, अव्यये, धातुसाधिते यांचा वापर ही नामासारखा करण्यात येतो.
4) धातुसाधित नाम : उदा. श्रीयशचे (वागणे) मोठे प्रेमळ असते. वरील वाक्यामध्ये वागणे या शब्दाने नामाचे कार्य केले आहे वरील नाम है 'वाग' मूळ धातूपासून झालेले आहे म्हणून त्यांना धातूसाधित नाम असे म्हणतात. धातुसाधित नामाची आणखी काही उदाहरणे: (पोहणे) हा चांगला व्यायाम आहे.
नामाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी :
1) सामान्य नामाचे अनेकवचन होते पण विशेष नामाचे अनेकवचन होत नाही.
सामान्य नाम : मूल-मुले, झाड- झाडे, फूल - फुले
विशेष नाम : सूर्य-सूर्य ,गौरव-गौरव,मीना- मीना
2) भाववाचक नामाचे सुद्धा अनेकवचन होत नाही.
उदा. सौंदर्य, श्रीमंती, पाटिलकी, भव्यता.
3) सामान्य नामे, विशेष नामे यांना प्रत्यय लागून आवश्यक नामे तयार होतात.
नवल - नवलाई,
गुलाम- गुलामगिरी
सुंदर- सुंदरता, सौंदर्य
गोड - गोडी, गोडवा
4) भाववाचक नामांचाही उपयोग विशेषनामांसारखा होतो. ती विशेषनामाचे कार्य करतात.
1) (विश्वास) हा माझा चांगला मित्र आहे.
मराठी व्याकरण शब्दाच्या जाती नाम व नामाचे प्रकार - सराव प्रश्नपत्रिका
पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
विषय- बुध्दीमत्ता
उपघटक | लिंक |
अ) सुचनापालन, वर्णन व मजकूर | |
ब) भाषाज्ञान | |
क) इंग्रजी अक्षरमाला | |
अ) शब्दसंग्रह | |
आ) आकृत्या | |
इ) संख्या | |
ई) इंग्रजी वर्णमाला | |
अ) शब्दसंग्रह | |
ब) आकृती | |
क) संख्या | |
ड) इंग्रजी वर्णमाला | |
अ) संख्या | |
ब) आकृत्या | |
क) चिन्हे | |
ड) चुकीचे पद ओळखणे | |
इ) इंग्रजी वर्णमाला | |
अ) आकृत्या अंक अक्षरे | |
अ) अक्षरांचा वापर | |
ब) चिन्हांचा वापर | |
क) अंकाचा वापर | |
अ) अंक वापर | |
ब) अक्षरे वापर | |
क) आकृती वापर | |
अ) अंक | |
ब) अक्षरे | |
क) आकृती | |
अ) वय वेळ तर्क अनुमान काढणे | |
ब) अभाषिक घनाकृती ठोकळे त्रिकोण चौकोन मोजणे | |
क) संख्यांच्या मांडणीतील सुत्र ओळखणे | |
१) रांगेतील स्थान | |
२) दिशावरील प्रश्न | |
३) दिनदर्शिका | |
४) वेन आकृती | |
५) गणिती कोडी | |
१) अपूर्ण आकृती पूर्ण करणे | |
२) तंतोतंत आकृती ओळखणे | |
३) घडीच्या आकृत्या | |
४) लपलेली आकृती शोधणे | |
सराव पेपर साठी |
0 Comments