Pages

Kendrapramukh Bharti Question Paper 9

Kendrapramukh Bharti केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नपत्रिका

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 


Kendrapramukh Bharti Question Paper 8




आपणास हे ही आवडेल- 

 

अ.क्रघटकलिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ पत्रकलिंक
केंद्रप्रमुख सभाव्य जिल्हानिहाय रिक्त पदेलिंक
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रमलिंक
केंद्रप्रमुख फॉर्म कसा भरावालिंक
केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ घटक गुण विभागणीलिंक
Whatsup Groupलिंक


केंद्रप्रमुख भरती 2023 

घटक - भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे   

सराव प्रश्नपत्रिका 


1/15
प्रश्न १ ला- भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?
१) राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व
२) राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते
३) राष्ट्रपती, मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यावयाच्या शपथा
४) यापैकी नाही.
2/15
प्रश्न २ रा- राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात वाद-विवादासंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार कोणाचा आहे?
१) उच्च न्यायालय
२) निवडणूक आयोग
३) संसद
४) यापैकी नाही
3/15
प्रश्न ३ रा- महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्यसंख्या आहे.
१) २८८
२) १९
३) ४८
४) ६७
4/15
प्रश्न ४ था- भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१) ४४
२) ४८
३) ४६
४) ५०
5/15
प्रश्न ५ वा- विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो ?
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती
३) लोकसभेचे सभापती
४) पंतप्रधान
6/15
प्रश्न ६ वा- ---- घटना दुरूस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मुलभूत हक्कामधून वगळण्यात आले.
१) ४२
२) ४४
३) ४५
४) ४६
7/15
प्रश्न ७ वा- 'सत्यमेव जयते' हे बोधवाक्य या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे.
१) ऋग्वेद
२) मनुस्मृती
३) भगवद्गीता
४) मंडुकोपनिषद
8/15
प्रश्न ८ वा- घटनाकारांचे मते, भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे -- हे होय.
१) घटनेचा मसुदा
२) मुलभूत अधिकार
३) घटनेचा सरनामा
४) मार्गदर्शक तत्त्वे
9/15
प्रश्न ९ वा- राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
१) राष्ट्रपती
२) महान्यायवादी
३) उपराष्ट्रपती
४) पंतप्रधान
10/15
प्रश्न १० वा- महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या आहे.
१) ७८
२) २३८
३) २८८
४) ५४५
11/15
प्रश्न ११ वा- लोकसभेचा कार्यकाळ वर्षे असतो.
१) ५ वर्षे
२) ६ वर्षे
3) स्थायी
४) वरील सर्व
12/15
प्रश्न १२ वा- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात ?
१) डॉ. राजेंद्रप्रसाद
२) डॉ. आंबेडकर
३) पं. नेहरू
४) महात्मा गांधी
13/15
प्रश्न १३ वा- भारताच्या घटनासमितीचे प्रमुख हे होते.
१) जवाहरलाल नेहरू
२) डॉ. आंबेडकर
३) सरदार पटेल
४) डॉ. राजेंद्रप्रसाद
14/15
प्रश्न १४ वा- घटनेच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या आता किती आहे?
१) १८
२) २०
३) २२
४) २४
15/15
प्रश्न १५ वा- देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती?
१) सर्वोच्च न्यायालय
२) संसद
३) कार्यकारी मंडळ
४) केंद्रीय लोकसेवा आयोग
Result:
@@@@


आपणास हे ही आवडेल.
अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा


 


Post a Comment

0 Comments