केंद्रप्रमुख भरती सराव प्रश्नपत्रिका

घटक मराठी व्याकरण प्रश्न २५ गुण २५

 




1/25
रामने आईला एकही पत्र अलिकडे लिहिले नाही. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा.
A. रामने
B. लिहिले नाही
C. आईला एकही पत्र
D. अलिकडे
2/25
'ती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे.' अलंकार ओळखा.
A. असंगती
B. श्लेष
C. व्यतिरेक
D. पर्यायोक्ती
3/25
'ताप थांबला का तिचा' या वाक्याच्या शेवटी कोणता विरामचिन्ह येईल?
A. प्रश्नचिन्ह
B. अर्धविराम
C. अपूर्णविराम
D. उद्गारचिन्ह
4/25
17. खालीलपैकी कोणता शब्द हा फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेला नाही?
A. रसद
B. लेझीम
C. सरकार
D. कविता
5/25
'मिलींद' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
A. भ्रमर
B. अभी
C. अली
D. भुंगा
6/25
संकेतार्थ नसलेले वाक्य ओळखा.
A. चांगला अभ्यास केलास तर उत्तम यश मिळेल.
B. तू आता अभ्यास केलास तरी चालेल.
C. अभ्यास केला नाहीस तर नापास होशील.
D. मुलांनो, चांगला अभ्यास करा.
7/25
'चामुंडा' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
A. श्रीमंत स्त्री
B. भांडखोर स्त्री
C. शिकलेली स्त्री
D. यापैकी नाही
8/25
जगाच्या अंतापर्यंत - या शब्दासमुहाबद्दल योग्य शब्द लिहा.
A. विनाशकाल
B. कल्पांती
C. कल्पकअंत
D. कल्पकज्ञ
9/25
करावे तसे---- ही म्हण पूर्ण करा.
A. मरावे
B. जगावे
C. भरावे
D. हारावे
10/25
'कूस बदलणे' या वाक्याचा अर्थ सांगा.
A. पक्ष बदलणे
B. गाव बदलणे
C. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळणे
D. वर्ग बदलणे
11/25
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A. विक्षीप्त
B. वीक्षीप्त
C. विक्षिप्त
D. वीक्षित
12/25
विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?
A. बालकवि
B. कुसुमाग्रज
C. गोंविदाग्रज
D. केशवकुमार
13/25
तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायचा थांबलो. या वाक्याचा प्रकार कोणता?
A. विकल्पबोधक संयुक्त वाक्य
B. मिश्र संयुक्त वाक्य
C. परिणामबोधक संयुक्त वाक्य
D. समुच्चयबोधक संयुक्त वाक्य
14/25
खालीलपैकी स्वर संधीचा सामासिक शब्द कोणता?
A मुनीच्छा
B षड्रिपू
C. उच्छेद
D. सच्चरित्र
15/25
पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
A. पक्षी
B. झाड
C वर
D. बसतो
16/25
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
A. उंची
B. शरद
C. पुस्तक
D. झाड
17/25
'पन्नास' या शब्दाची जात ओळखा.
A. सर्वनाम
B. विशेषण
C. क्रियापद
D क्रियाविशेषण
18/25
'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.
A. श्रावण
B. श्रवणी
C. श्रवणीय
D. श्रावणमास
19/25
'शी! काय हे कपडे तुझे!' या वाक्याचा प्रकार सांगा.
A. विरोधदर्शक
B संबोधनदर्शक
C तिरस्कारदर्शक
D शोकदर्शक
20/25
खालील पुल्लिंगी शब्द ओळखा.
A. काया
B. पागोटे
C. इमारत
D. रुमाल
21/25
'भाषा' या नामाचे अनेकवचन लिहा.
A. भाषी
B. भाषा
C. भाषाणो
D. भाषाणी
22/25
शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो, या वाक्यातील गौण वाक्याचा प्रकार ओळखा.
A. काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य
B. नाम वाक्य
C. कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य
D. विशेषण वाक्य
23/25
'तो (ऐटीने) चालतो' अधोरेखित शब्दाचा उपपदार्थ ओळखा.
A. कार्यकारण
B. रीत
C. निमित
D प्रयोजन
24/25
'शिपायाने चोरास पकडले' याचा प्रयोग ओळखा.
A. कर्तरी
B. कर्मणी
C. सकर्मक भावे
D. अकर्मक भावे
25/25
'गल्लोगल्ली' या शब्दाचा समास ओळखा.
A. तत्पुरुष
B. अव्ययीभाव
C. द्विग्
D. इंद्र
Result:
@@@@@


आपणास हे ही आवडेल.

अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका 1सोडवा