Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका


केंद्रप्रमुख भरती पात्रता- 

अ) जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

ब) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

क) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

ड) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील. 

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf- 





अ) बुध्दिमत्ता व अभियोग्यता- अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. प्रश्न संख्या १०० गुण १००

ब) शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-  १) भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय- १० प्रश्न १० गुण २) शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य - १० प्रश्न १० गुण ३) माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक)- १५ प्रश्न १५ गुण ४) अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती -१५ प्रश्न १५ गुण ५)  माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन - २० प्रश्न २० गुण ६) विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान - १५ प्रश्न १५ गुण ७) संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) -  १५ प्रश्न १५ गुण.

केंद्रप्रमुख भरती जाहिरात - 

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदांचा व इतर तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंर्भात परीपत्रक काठण्यात आले आहे. केंद्रप्रमुख वेतन श्रेणी एस १५ ४१८०० १३२३०० असते. शासन निर्णय दि. २/१२/२०२२ नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे जाहीर करण्यात आसेली आहेत. रिक्त पदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 


केंद्रप्रमुख भरती 2023 

सराव प्रश्नपत्रिका - 

माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE)


1/15
प्रश्न १ ला- Student Portal वर कोणत्या नोंदी कराव्या लागतात?
१) शाळेच्या
२) शिक्षकांच्या
३) संचमान्यतेच्या
४) विद्यार्थींच्या
2/15
प्रश्न २ रा- Student Portal ला लॉगीन केल्यानंतर School Details मध्ये कोणत्या नोंदी असतात?
१) विद्यार्थी माहिती
२) शाळेतील शिक्षकांची माहिती
३) शाळा प्रमुख (मुख्याध्यापक ) माहिती
४) वर्गखोलीची माहिती
3/15
प्रश्न ३ रा- Principal's Mobile Number and Principal's Date of Birth ही माहिती विद्यार्थी पोर्टल ला आवश्यक असते कारण-
१) password maintenance
२) School maintenance
३) Student maintenance
४) वरील सर्वांसाठी
4/15
प्रश्न ४ था- शाळेत दाखल झालेल्या किंवा प्रवेश घेतलेल्या मुलांची नोंद कोणत्या पोर्टल वर कराल?
1) School Portal
2) Student Portal
3) MDM Portal
4) Sachmanayata Portal
5/15
प्रश्न ५ वा- Student Portal विद्यार्थी माहिती भरताना असी माहिती चुकली असेल तर ती आपण खालीलपैकी कोणत्या Tabचा वापर कराल ?
1) Student pramoshion
2) Update Student
3) Transfer request
4) aadhar update
6/15
प्रश्न ६ वा- एखादा विद्यार्थी सतत गैरहजर असल्यास त्या विद्यार्थीला Student Portal वर --------
१) Drop Box मध्ये टाकावे
२) डिलीट करावे
३) Out Of School करावे
४) Remove करावे
7/15
प्रश्न ७ वा- Student Portal वर -
१) वर्गाची तुकडी बनवता येते
२) वर्गाची तुकडी बनवता येत नाही
३) तुकडी बनवता येते पण डिलीट करता येत नाही
४) तुकडी बनवता येते व ती डिलीट करता येते
8/15
प्रश्न ८ वा- दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत आलेल्या मुलांना घेण्यासाठी तुम्ही Student Portal वरील कोणती सुविधा वापराल?
1) Out of school
2) Student Request
3) Drop Box
4) student Request aprove
9/15
प्रश्न ९ वा- समोरील शाळेच्या शेवटच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आपल्या शाळेत घेण्यासाठी तुम्ही Student Portal वरील कोणती सुविधा वापराल?
१) Transfar Request
2) Transfar Request Aprove
3) Attach Student
4) Attach Student Aprove
10/15
प्रश्न १० वा- एखादा विद्यार्थी मयत अथवा दुसऱ्या राज्यात स्थलांतरीत झाला असेल तर---
१) Student Portal वर ठेवावा.
२) त्याला ट्रॉप बॉक्स मध्ये टाकावे
३) Out Of School करावे
४) Out Of School करून डिलीट करावे
11/15
प्रश्न ११ वा- तेच विद्यार्थी डिलिट करता येतात जे--
१) Aadhar Update केलेले नाहीत
२) Request Aprove केलेले आहेत
३) ड्रॉप बॉक्स व Out Off School आहेत
४) वरील सर्व
12/15
प्रश्न १२ वा- Student Pramoshion म्हणजे-
१) विद्यार्थींना दुसऱ्या शाळेत पाठवणे
२) विद्यार्थींना दुसऱ्या वर्गात पाठवणे
३) विद्यार्थींना Out Of School करणे
४) वरील सर्व
13/15
प्रश्न १३ वा- Student Portal वर तयार होणारा विद्यार्थी आयडी हा ---- ने सुरू होतो.
१) शाळेचा युडायस
२) दाखल वर्ग
३) दाखल वर्ष
४) हाजेरी क्रमांक
14/15
प्रश्न १४ वा- विद्यार्थी पोर्टल वर New Entry Tab वापरून कोणत्या मुलांची नोंद करता येते?
१) इयत्ता १ लीत शिकणाऱ्या मुलांची
२) दुसऱ्या शाळेतून आलेल्या मुलांची
३) वयानुरूप प्रवेश दिलेल्या व नोंद न झालेल्या मुलांची
४) वरील सर्व
15/15
प्रश्न १५ वा- वयानुरूप प्रवेश दिलेल्या व नोंद न झालेल्या मुलांची नोंद करण्यासाठी लागणारी New Entry Tab कोणत्या लॉगीन वरून देता येते?
१) शाळा लॉगीन
२) केंद्रप्रमुख लॉगीन
३) गटशिक्षणाधिकारी लॉगीन
४) वरीलपैकी नाही
Result:
@@@@

आपणास हे ही आवडेल.
अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका 1सोडवा