Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका
Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे.
केंद्रप्रमुख भरती पात्रता-
अ) जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा. म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
ब) उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी. एस. सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
क) प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी बगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.
ड) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष . विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी राहील पात्र राहतील.
केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम -
घटक | उपघटक | प्रश्न संख्या | गुण |
---|
बुध्दिमत्ता व अभियोग्यता | अभियोग्यता तार्किक क्षमता वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, फल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इ. बुध्दिमत्ता, आकलन, वर्गीकरणे, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ. | १०० | १०० |
शालेय शिक्षणातील कार्य नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह | भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतूदी, संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय | १० | १० |
| शिक्षणक्षेत्रात काम करणान्या प्रमुख संस्था संघटन व त्यांचेशालेय शिक्षणातील कार्य | १० | १० |
| माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक) | १५ | १५ |
| अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती | १५ | १५ |
| माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन | २० | २० |
| विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेष करुन इंग्रजी विषयज्ञान | १५ | १५ |
row8 col 1 | संप्रेषण कौशल्य (समाज संपर्क साधने) | १५ | १५ |
एकुण | | २०० | २०० |
@@@@
केंद्रप्रमुख भरती 2023
सराव प्रश्नपत्रिका -
माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)
शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL U-DISE)
1/15
प्रश्न १ ला- UDISE म्हणजे
१) Unified District Information Statefor Education
२) District Information System for Education
३) Unified District Information System for Education
४) वरील सर्व
2/15
प्रश्न २ रा - Udise कोणी सुरू केले ?
1) Department of School Education, Ministry of education, Govt. of India
Department of School Education, Ministry of education, Govt. of Maharashtra
3) Department of School Education, Ministry of education, Govt. of Goa
4) वरील सर्व
3/15
प्रश्न ३ रा - Udise चा मुख्या उद्देश काय?
1) भारतातील शासकीय शाळांची माहिती गोळा करणे
2) भारतातील सर्व शाळांवर देखरेख ठेवणे
3) भारतातील सर्व पुर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या शाळांची माहिती गोळा करणे
4) वरील सर्व
4/15
प्रश्न ४ था - शाळांना युडास क्रमांक देण्यामागचा मुख्य उद्देश काणता -
१) प्रत्येक शाळांना एक ओळख म्हणून क्रमांक देणे.
२) अचूक माहिती संकलन करणे
३) माहितीचे विशलेषण करता यावे
४) वरील सर्व
5/15
प्रश्न ५ वा- Udise Portal चा वेबपत्ता --
१) https://udiseplus.gov.म०स
२) https://udiseplus.in/
३) https://udiseplus.gov.in/
४) वरील सर्व
6/15
प्रश्न ६ वा- युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस (UDISE+) ही शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या सर्वात मोठ्या व्यवस्थापन माहिती प्रणालींपैकी एक आहे ज्यामध्ये ------ मुलांचा समावेश आहे.
१) 14.89 लाख शाळा, 95 लाख शिक्षक आणि 26.5 कोटी
२) 10.89 लाख शाळा, 85 लाख शिक्षक आणि 16.5 कोटी
३) 11.89 लाख शाळा, 35 लाख शिक्षक आणि 16.5 कोटी
४) 21.89 लाख शाळा, 98 लाख शिक्षक आणि 36.5 कोटी
7/15
प्रश्न ७ वा- संपूर्ण प्रणाली ऑनलाइन आहे आणि ----- पासून रिअल-टाइममध्ये डेटा संकलित करत आहे.
१) 2015-16
२) 2018-19
३) 2019-20
४) 2021-22
8/15
प्रश्न ८ वा- UDISE+ ला ------ पर्यंतचे औपचारिक शिक्षण देणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांमधून माहिती गोळा करण्यात येते.
१) १ ली ते १०
२) १ ली ते १२ वी
३) पूर्वप्राथमिक ते १२ वी
४) फक्त शासकीय पूर्वप्राथमिक ते १२ वी
9/15
प्रश्न ९ वा - डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संकलित केलेली माहिती, UDISE+ चा वापर--- करण्यासाठी केला जातो.
१) नियोजन, संसाधन वाटप
२) विविध शिक्षण-संबंधित कार्यक्रम राबविण्यासाठी
३) प्रगतीचे मूल्यांकन
५) वरील सर्व
10/15
प्रश्न १० वा- Udise Code हा -- -- असतो.
१) 11-digit code
२) 10-digit code
३) 12 -digit code
४) 06 -digit code
11/15
प्रश्न ११ वा- UDISE कोड हा 11-अंकी कोड आहे जो शाळेच्या ------- स्थानावर आधारित एक अद्वितीय ओळख क्रमांक म्हणून कार्य करतो.
१) राजकीय
२) सामाजिक
३) भौगोलिक
४) विभागीय
12/15
प्रश्न १२ वा- शाळेला युडास प्राप्त करण्यासाठी तुम्ही विहित नमुन्यातील अर्ज कोणाकडे कराल?
१) जिल्हा MIS
२) राज्य MIS
३) भारत सरकार MIS
४) शालेय शिक्षण मंत्री
13/15
प्रश्न १३ वा- बरोबर विधान निवडा.
१) UDISE कोड हा कायमस्वरूपी स्वरूपाचा असतो
२) एकदा विशिष्ट शाळेला नियुक्त केल्यानंतर तो बदलला जाऊ शकत नाही.
३) फक्त अ बरोबर
४) अ आणि ब बरोबर
14/15
प्रश्न १४ वा- Udise Portal ला खालीलपैकी कोणती Login असते -
१) Block Entry User, Block Level
२) District Level
३) State Level
४) वरील सर्व
15/15
प्रश्न १५ वा- Udise नुसार Repeater are student म्हजे ---
१) परीक्षांमध्ये अयशस्वी होणे इत्यादी मुळे त्याच वर्गात प्रवेश राहणे
२) पुनरावृत्ती करणारे असे विद्यार्थी आहेत जे विविध कारणांमुळे एकाच वर्गात एका वर्षापेक्षा जास्त काळ शिकत आहेत.
३) साधारण एक वर्षाच्या गॅपनंतर एकाच शाळेत आणि त्याच वर्गात पुन्हा प्रवेश घेणे
४) वरील सर्व
@@@@
आपणास हे ही आवडेल.
अ.क्र | सराव प्रश्नपत्रिका | लिंक |
---|
१ | सराव प्रश्नपत्रिका १० | सोडवा |
२ | सराव प्रश्नपत्रिका ९ | सोडवा |
३ | सराव प्रश्नपत्रिका ८ | सोडवा |
४ | सराव प्रश्नपत्रिका ७ | सोडवा |
५ | सराव प्रश्नपत्रिका ६ | सोडवा |
६ | सराव प्रश्नपत्रिका ५ | सोडवा |
७ | सराव प्रश्नपत्रिका ४ | सोडवा |
८ | सराव प्रश्नपत्रिका ३ | सोडवा |
९ | सराव प्रश्नपत्रिका २ | सोडवा |
१० | सराव प्रश्नपत्रिका 1 | सोडवा
|
0 Comments