Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

Kendrapramukh Bharti 2023 बाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेव्दारे निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. शासनामार्फत केंद्रप्रमुख भरतीसाठीचा शासन निर्णय केंद्रप्रमुख भरती gr निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये केंद्रप्रमुख भरती परीक्षा स्वरूप कसे असेल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम pdf कसा असेल याविषयीची माहिती देखील त्यामध्ये देण्यात आलेली आहे. 

Kendrapramukh Bharti 2023 केंद्रप्रमुख भरती 2023 सराव प्रश्नपत्रिका

कूटप्रश्न

बुध्दीमतेतील 'कूटप्रश्नया घटकांतर्गत दिशावेन आकृतीरांगेतील स्थानदिनदर्शिकागणिती कोडी यांसारख्या उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे.

या उपघटकांमधील प्रश्न विदयार्थ्यांच्या विचारशक्तीस चालना देणारे असतात. निर्णयक्षमताआकलन क्षमतासुसंगत विचार करण्याची कुवततर्क यांसारख्या बाबींचा शोध घेण्यास हा घटक अत्यंत उपयुक्त आहे.

या घटकाशी मैत्री होण्यासाठी विदयार्थ्यांनी अधिकाधिक उपघटक निहाय सराव करणे आवश्यक आहे.

'कूटप्रश्नया घटकांतर्गत दिशावेन आकृतीरांगेतील स्थानदिनदर्शिकागणिती कोडी यांसारख्या उपघटकांचा भरपूर सराव करणे आवश्यक आहे. त्याशिवाय या घटकावरील सर्व गुण मिळणे कठिण आहे. चला या घटकावरीस प्रश्नांचा सराव करूया.

उपघटक - रांगेतील स्थान

'कूटप्रश्नया घटकांतर्गत दिशावेन आकृतीरांगेतील स्थानदिनदर्शिकागणिती कोडी यांसारख्या उपघटकांचा करताना पहिला घटक आहे रांगेतील स्थान.

केंद्रप्रमुख भरती 2023 

सराव प्रश्नपत्रिका -  उपघटक - रांगेतील स्थान







1/15
प्र. 1. 57 पटसंख्या असणाऱ्या वर्गातील मुलांच्या हजेरीपत्रकात मध्यभागी येणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?
1) 29
2) 31
3) 28
4) 30
2/15
प्र. 2. एका जिन्याच्या 26 व्या पायरीवर राहुल उभा आहे. ती पायरी जिन्याची मधली पायरी असल्यास, एकूण पायऱ्या किती?
1) 52
2) 53
3) 51
4) 55
3/15
प्र. 3. सभामंडपातील एका रांगेतील निळया खुर्चीचा पुढून 32 वा आणि मागून 23 असल्यास त्या रांगेतील खुर्च्या किती ?
1) 55
2) 56
3) 53
4) 54
4/15
प्र. 4. 74 मुलांमध्ये अथर्व शेवटून 29 व्या स्थानावर उभा असल्यास तो पुढून कितव्या स्थानी असेल?
1) 45
2) 46
3) 44
4) 47
5/15
प्र.5. वीजबील भरणा करणाऱ्यांच्या रांगेत सविताच्या पुढे 20 आणि मागे 35 व्यक्ती असल्यास, त्या रांगेत व्यक्ती किती ?
1) 55
2) 54
3) 56
4) 57
6/15
प्र. 6. कुंड्यांच्या रांगेत हिरव्या रंगाच्या कुंडीचा डावीकडून 29 वा आणि उजवीकडून 15 वा क्रमांक असल्यास मधल्या कुंडीचा क्रमांक कितवा असेल ?
1) 22
2) 21
3) 23
4) 20
7/15
प्र. 7. कवायतीसाठी उभ्या असलेल्या विदयार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विदयार्थी आहेत, त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत. जर एका रांगेत 21 विद्याथी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते?
1) 441
2) 168
3) 509
4) 609
8/15
प्र.8. एका शिडीच्या वरुन अकराव्या पायरीवर ध्रुव उभा असून त्याच्या खालील तिसऱ्या पायरीवर उभा असेला रोहित मध्यभागी आहे. तर वरुन 5 व्या आणि खालून 8 व्या क्रमांकाच्या पायन्यांदरम्यान किती पायऱ्या आहेत?
1) 27
2) 14
3) 18
4) 16
9/15
प्र.9. एका रांगेत हर्ष आठव्या स्थानावर उभा असून त्याच्या आधी तिसऱ्या स्थानावर शार्दूल उभा आहे. शार्दुलनंतर पाचव्या स्थानी आराध्य उभा असल्यास शार्दुल व आराध्य दरम्यान किती मुले आहेत ?
1) 4
2) 6
3) 5
4) 3
10/15
प्र.10. 72 चित्रांच्या मालिकेत वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती, हरिण या पाच प्राण्यांची चित्रे क्रमशः लावल्यास 63 व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्याचे चित्र येईल?
1) वाघ
2) हत्ती
3) कोल्हा
4) सिंह
11/15
प्र.11. रस्त्याच्या कडेने लावलेल्या लगतच्या तीन बीजेच्या खांबांतील अंतर 100 मी. आहे. तर त्या रस्त्याच्या कडेने लावलेल्या 5 व्या वीजेच्या खांबापासून 30 वा विजेचा खांब किती अंतरावर आहे ?
1) 1 किमी 300 मी
2) 1250 मी
3) 2.25 किमी
4) 12.5 किमी
12/15
प्र.12. 30 मी x 15 मी आयताकृती मैदानाच्या कडेने 1.5 मी अंतरावर एक खांब रोवल्यास त्या संपूर्ण मैदानाभोवती किती खांब रोवावे लागतील?
1) 64
2) 66
3) 58
4) 60
13/15
प्र.13. एका रांगेत राहुलचा सुरुवातीपासून 17 वा क्रमांक असून हमीद त्याच्यापुढे 7 व्या स्थानावर आहे. शंतनु हमीदच्या मध्ये चौथ्या स्थानावर असून शेवटूनही चौथ्या स्थानावर आहे. तर खालीलपैकी अचूक विधाने कोणती ?
1) राहुल शेवटच्या स्थानावर आहे.
2) मधल्या मुलाचा क्रमांक पाचवा आहे
3) हमीद मध्यभागी आहे.
4) हमीद - शंतनु दरम्यान 5 मुले आहेत.
14/15
प्र. 14. एका रांगेत ऐश्वर्याच्या मागे सहा मुली सोडून 25 मुली उभ्या आहेत व पुढे 8 मुली उभ्या असल्यास पुढून 18 व्या मुलीचा शेवटून क्रमांक कितवा?
1) 41
2) 39
3) 43
4) 40
15/15
प्र. 15. एका रांगेत दोन मुलांनंतर तीन मुली या प्रमाणे 32 मुले-मुली उभी केल्यास मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अगर कमी आहे ?
1) 4 ने कमी
2) 5 ने कमी
3) 4 ने जास्त
4) 5 ने जास्त
Result:
@@@@

आपणास हे ही आवडेल.

अ.क्रसराव प्रश्नपत्रिकालिंक
सराव प्रश्नपत्रिका १०सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ९सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ८सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ७सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ६सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ५सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ४सोडवा
सराव प्रश्नपत्रिका ३सोडवा
सराव प्रश्नपत्रिका २सोडवा
१०सराव प्रश्नपत्रिका 1सोडवा