Pages

Whatsup

 

 Whatsup पोस्ट

मी विविध Whatsup च्या ग्रुपवर केलेल्या पोस्ट वाचण्यासाठी पोस्टच्या समोर क्लीक करा व पोस्टचे वाचन करा.व आपली प्रतिक्रिया द्या.काही मदत हवी असल्यास मेल अथवा Whatsup करावे. 

01 संगणक विकत घेताना   .........                                          वाचा 

02  प्रींन्टर  विकत घ्यायचा आहे का 1    ...                             वाचा 

 03 प्रींन्टर  विकत घ्यायचा आहे का 2                                    वाचा      

04  नविन सञा़त काम करताना                                           वाचा

05 मोफत SMS कसे पाठवावेत                                          वाचा

06 Google.com वर माहिती कशी सोधावी.                         वाचा

07  फोटोची Size कशी कमी करावी.                                 वाचा 

                              


​गुगल वर शोधताना
 

गुगल.कॉमवर आपण बर्‍याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर हजारो वेबसाईटची यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे  सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो. मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो. विचारलेल्या माहितीची असंख्य पाने दाखविल्यावर आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो.
गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो.

. आपल्या प्रश्नामध्ये ' + ' चिन्हाचा वापर करावा समजा गुगल.कॉमवर आपणास (मराठी वेबसाईट (म्हणजेच मराठी वेबसाईट शोधायचे असल्यास Google.com  वर Marathi + website ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
.आपल्या प्रश्नामध्ये ' - ' चिन्हाचा वापर करावा समजा जर आपणास गुगल.कॉमवर 'Nitin' असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये Nitin samudre' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगल.कॉमला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर 'Nitin - samudre' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल.कॉम येणार्‍या उत्तरामध्ये 'samudre' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी
दाखवेल.

. आपल्या प्रश्नामध्ये ' ~ ' चिन्हाचा वापर करावा : गुगल.कॉमवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखिल गुगल.कॉम दाखवितो.
. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीह एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगल.कॉमवर त्या वेबसाईटचे नाव आणि
आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल.कॉम फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती
शोधून उत्तर देतो. उदा. ' site: ni3samudre.blogspot.in mobile ' असे दिल्यास गुगल.कॉम फक्त ni3samudre.blogspot.in वर mobile हा शब्द शोधेल.

. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचे असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल.कॉम त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास गुगल.कॉम त्या शब्दाची माहिती असलेल्याच
वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ' define: Computer ' असे शोधल्यास गुगल.कॉम
' Computer '
या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमूळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच
प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का? ते शोधण्यासाठी ' related: '
या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.ni3samudre.blogspot.in/ ' असे शोधल्यास गुगल.कॉम ' http://www.ni3samudre.blogspot.in ' प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची यादी देईल
.
. जसाच्यातसा शब्ध शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगल.कॉमवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा)Double Inverted Commas) म्हणजेच " " याचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर " nitinsamudre email " असे शोधल्यास ज्यापानावर हे दोन्ही शब्द एखत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
. आपल्या प्रश्नामध्ये ' * ' चिन्हाचा वापर करावा गुगल.कॉमवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पुर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधीत इतरही शब्द सापडल्यास ती देखिल दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ' * ' चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर 'friend* ' असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends , friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखिल उत्तरामध्ये विचार करतो.

. आपल्या प्रश्नामध्ये ' ? ' चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? ' चिन्हाचा वापर करावा. उदा. ' fri??d ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम त्या प्रश्नचिन्हाच्या
जागी योग्यती अक्षरे घेवून त्या माहितीची पाने दाखवितो.

१०. आपल्या प्रश्नामध्ये ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस जर आपणास दोन शब्दाना मिळून एकत्रिच सर्च करायचे असते त्या वेळी ' AND अथवा OR ' शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल.कॉम मध्ये सर्च करताना ' School And collage ' सर्च केल्यास गुगल.कॉम ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND 'शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.
  आपणास हवी असलेली माहिती पाहण्यासाठी  माझ्या Bolg  ला भेट द्या.
कळावे

श्री.नितिन बाजीराव समुद्रे

जिल्हा पालघर


Mobile 08156048686

 

 

Post a Comment

2 Comments